रिंकू राजगुरु बघतीये लग्नासाठी मुले

गणेश पंडित दिग्दर्शित ‘मेकअप’ चित्रपटाचा ट्रेलरमध्ये एकीकडे लग्नासाठी मुले बघत, त्यांचा नकार पचवणारी रिंकू राजगुरू अर्थात पूर्वी दुसरीकडे मात्र बिनधास्त, स्वच्छंदी आयुष्य जगताना दिसतेय. त्यामुळे यातील खरी पूर्वी कोण, ‘मेकअप’वाली पूर्वी कोण आणि मुळात पूर्वीचा हा मेकअप कशासाठी आहे, हे जरा प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आहे.

Rinku Rajguru in 'Makeup'
Rinku Rajguru in ‘Makeup’

प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचे पॅकेज  असणाऱ्या या चित्रपटात प्रतीक्षा लोणकर, मिलिंद सफई, राजन ताम्हाणे, सुमुखी पेंडसे, स्वाती बोवलेकर, तेजपाल वाघ आदी चेहरेही झळकणार असून  ट्रेलर पाहता हा चित्रपट फूल टू धमाल दिसत आहे मात्र यात काही ट्विस्टही दिसत आहेत. हे ट्विस्ट नेमके कोणते आणि स्वप्नातल्या राजकुमाराची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पूर्वीच्या आयुष्यात तिचा ‘हॉट’ राजकुमार येणार का, हे चित्रपट आल्यावरच कळेल. या चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू आणि चिन्मय उदगीरकर यांची फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चिन्मय या सिनेमात पहिल्यांदाच डॉक्टरच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.  हा चित्रपट लवकरच  प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.