‘जवानी झिंदाबाद’ चित्रपटाचा टीजर सोशल मिडीयावर प्रदर्शित

प्रेक्षकांमध्ये चित्रपटांबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी  कधी गाणी तर हटके स्टारकास्ट, कधी वेगळा विषय तर कधी मार्केटिंग स्टेटर्जी कारणीभूत ठरते.  ह्याच बरोबर चित्रपटाचे टाइटल सुद्धा कधी कधी खूप महत्वाचे ठरते.  आता पर्यंत अनेक इंग्लिश, इंग्लिश-मराठी, हिंदी-मराठी असे टाइटल असलेले चित्रपट आपल्याला पहायला मिळाले.   असेच एक हटके टाइटल असलेला ‘जवानी झिंदाबाद’  हा मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

Abhishek Sathe, Ketki Narayan in 'Jawani Zindabad'
Abhishek Sathe, Ketki Narayan in ‘Jawani Zindabad’

‘जवानी झिंदाबाद’ म्हटलं की आपल्या नजरेसमोर तरुणाईचा जल्लोष, उत्साह येतो. नव्या दमाचे कथानक असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  शिव कदम दिग्दर्शित, महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव (पाटील) आहेत.  एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. आजपर्यंत मोठ्या पडद्यावर न आलेल्या संवेदनशील विषयाभोवती गुंफण्यातआलेला आहे.

या चित्रपटातून अभिषेक साठे हा नवा चेहरा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, तर अभिनेत्री केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय यतीन कार्येकर, आसावरी जोशी, मधू कांबीकर, पूर्वा शिंदे, सचीन गवळी, अभ्यंग कुवळेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.  या चित्रपटाची कथा नितीन उत्तमराव साठे यांची असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे.   येत्या १३ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.