‘कवडसा’चे प्रभावी मानसशास्त्रीय सादरीकरण
निर्मोही क्रिएशंस प्रस्तुत, माणूस लिखित, पंकज मिठभाकरे दिग्दर्शित कवडसा हे प्रायोगिक मराठी नाटक रंगभुमीवर अवतरतंय. परक्या, लांबच्या माणसांच्या बाबतीत संशय पिशाच्च मानगुटीवर बसलं तर जोर लावून काढता येतं, आपल्या जवळच्या माणसांविषयी संशय मनात फेर धरायला लागला की मग जे होतं ते आपल्याला कवडसा या नाटकात बघायला मिळते.
संशयग्रस्तता मुख्यतः प्रेमीजनात मोठया प्रमाणावर दिसून येते, सर्वात जवळचं सगळं भावविश्व व्यापलेल्या नात्यात किंचितसा सुद्धा दुरावा मनाला सहन होत नाही, आमचं दोघांच जे घट्ट भावविश्व आहे ते फक्त दोघांचच आहे, होतं आणि राहील असा विश्वास प्रेमीजनाच्या मनात निर्माण होतो, दोन घट्ट मैत्रीणींमध्ये देखील एक मैत्रीण जरा इतर मुलींमध्ये मिसळायला लागली की दुस दुसर्या मैत्रीणीला त्रास होतो, जेव्हा आणखी कुणाबरोबर तरी असाच एकजिन्सीपणा पार्टनर ने अनुभवलाय किंवा अनुभवतोय हे कळतं तेव्हा मग संशयाला सुरुवात होते.
प्रवीण चौगुले, किशोरी पाठक, प्रसाद कुलकर्णी आणि अमोल पाठक अभिनीत या नाटकाला दिग्दर्शकाने दिलेल्या मानसशास्त्रीय सादरीकरणामुळे ते अधिक प्रभावी झाले आहे. प्रकाशयोजना संतोष लोखंडे ह्यांनी केली आहे तर संगीत निखिल लांजेकर, वेशभूषा मेघना मिठभाकरे, रंगभूषा- पंकजा पेशवे आणि नेपथ्य प्रवीण चौगुले ह्यांचे आहे.
निर्मात्यांच्या मते, प्रेक्षकांनी या नाटकातून स्वतःकडे, आपल्या मानसिक प्रश्नांकडे आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या प्रवासाकडे जाणीवपूर्वक पहावे हाच नाटकाचा मुख्य उद्देश.