मराठी चित्रपट ‘छत्रपती शासन’ १५ मार्च रोजी प्रदर्शित
प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ‘छत्रपती शासन‘ सिनेमा येत्या १५ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या विचारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘छत्रपती शासन‘ चित्रपट होय. महाराजांचे विचार हे आजच्या काळात प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी साकारण्यात आलेला प्रयत्न म्हणजे ‘छत्रपती शासन‘. या सिनेमाचा पोस्टर लॉँच सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा.खा.श्री. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकताच पार पडला. उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले आणि खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे यांनी स्वतः केलं असून कथा, संवाद देखील त्यांचेच आहेत.
अभिनेता मकरंद देशपांडे, किशोर कदम, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका असून सायली काळे, धनश्री यादव, किरण कोरे, सायली पराडकर, मिलिंद जाधव यांचा अभिनय देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. गीतकार डॉ. विनायक पवार, नंदेश उमप, दीपक गायकवाड, राजन सरवदे यांच्या लेखणीतून सजलेल्या गाण्यांना नंदेश उमप, रोहित नागभिडे, सचिन अवघडे, अभिजित जाधव, राजन सरवदे यांनी संगीत दिलं आहे. गायक नंदेश उमप, उर्मिला धनगर, जान्हवी प्रभू अरोरा, अभिजित जाधव, राजन सरवदे या गायकांच्या विविधांगी आवाजांचा स्वरसाज सिनेमातील गाण्यांना चढला आहे.