‘राधे’च्या निर्मात्याचे ‘नादखुळा म्युझिक’ लेबलव्दारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

Nikhil Namit, Salman Khan, 'Naadkhula Music'
Nikhil Namit, Salman Khan, ‘Naadkhula Music’

सलमान खानच्या हॅलो, बॉडीगार्ड, ओ तेरी, भारत, राधे अशा बिग बजेट बॉलीवूड सिनेमाचा निर्माता निखील नमीतने मराठी सिनेसृष्टीत आपल्या म्युझिक लेबलव्दारे पदार्पण केले आहे. गेली 16 वर्ष बॉलीवूडमध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवल्यावर आता आपल्या नादखुळा म्युझिक लेबलव्दारे निखील नमित मराठी मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज आहे.

मराठीत पदार्पणाविषयी निर्माता निखील नमीत म्हणाले, “नादखुळा म्युझिक लेबल सुरू करण्यामागची प्रेरणा माझे स्वर्गीय वडिल आहेत. भूगोलाचे गाढे अभ्यासक असलेले माझे वडिल, महाविद्यालयाचे मुख्याध्यापक होते.  मुंबई विद्यापीठाच्या भूगोल शाखेचे प्रमुखपदही त्यांनी भुषवलंय.”

Marathi Song Aapli Yaari on Naadkhula Music
Marathi Song Aapli Yaari on Naadkhula Music

निखील नमीतच्या नादखुळा म्यझिक लेबलला प्रशांत नाकती ह्या मराठी सिनेसृष्टीतल्या गुणी, आणि सुप्रसिध्द संगीतकाराची उत्तम साथ मिळालीय.  ‘पोरी तुझ्या नादानं’ आणि ‘माझी बाय गो’ फेम प्रशांत नाकतीच्या गाण्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. त्याच्या गाण्यांना युट्यूबवर सहज करोडोंमध्येच व्ह्युज मिळतात. त्याच्या 17-18 गाण्यांना युट्यूबवर मिलीयनमध्ये व्ह्युज मिळाल्याने आता त्याची ओळख ‘मराठी इंडस्ट्रीतला मिलीयनीयर म्युझिक डायरेक्टर’ अशी होऊ लागली आहे. प्रशांतसोबत मिळून निखील नमितने आता नादखुळा म्युझिक लेबल सुरू केले आहे. आणि त्यांच्या ‘मी नादखुळा’ ह्या पहिल्या गाण्यालाही आत्तापर्यंत साडेसहा लाख व्हयुज मिळाले आहेत