राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ चा ट्रेलर प्रदर्शित

Marathi Film 'Dhappa'
Marathi Film ‘Dhappa’

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा‘ मराठी चित्रपट काही तरी वेगळे सांगू पाहत आहे, हे चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर मध्ये बघायला मिळते.
धप्पा‘ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली‘ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयीचा संदेश देणार आहेत. या नाटकाच्या लेखिकेने वेग वेगळ्या पात्रांच्या मदतीने हा संदेश दिला आहे ज्यामध्ये येशू ख्रिस्त या पात्राचा पण समावेश आहे. ज्या वयाच्या मुलांना ‘राजकारण म्हणजे काय?’ असा प्रश्न पडतो ती मुले या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी ‘मिशन झॅप झॅप‘ आखतात त्याचा रंजक प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे.

धप्पा‘ या चित्रपटात अनेक लहान मुलांसह इरावती हर्षे, सुनिल बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘धप्पा‘ या चित्रपटाचे निर्माते सुमितलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत. हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.