लॉकडाऊन दरम्यान सर्व सिनेमा हॉल बंद असल्यामुळे नविन चित्रपट चाहत्यांसाठी ऑनलाइन हे एकमेव मुख्य माध्यम होते- दरम्यानच्या काळात ह्या प्लॅटफॉर्म वरील प्रेक्षकांच्या संखेत वाढ झाल्याचे आपल्याला दिसते, त्यामुळे ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मसमुळे वेबसिरीजना सुगीचे दिवस आले आहेत असेच म्हणावे लागेल.
Tejas Lokhande, Chandraprakash Yadav, Aajinkya Thakur
सध्याच्या काळात सिनेमांच्या आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे अनेक सिनेमांचे आणि मराठी वेबसिरीज चे चित्रीकरण सुरू करण्यात आले. नवोदित दिग्दर्शक तेजस लोखंडे याने नव्या वेबसिरीजच्या चित्रीकरणाला सुरूवात केली आहे. वेबसिरीजच्या शुटिंग दरम्यानचा एक फोटो नुकताच त्याने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ‘चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट’, चंद्रप्रकाश यादव आणि प्रशांत सावंत हे या वेबसिरीजची निर्मिती करत आहेत. या वेबसिरीजचे सहनिर्माते प्रशांत मधुकर राणे आहेत. तर शिवराज सातार्डेकर हे डिओपी आहेत. यातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
‘अंजली’, ‘दुहेरी’, ‘नकळत सारे घडले’ या लोकप्रिय मालिकांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक तेजस लोखंडे त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी सांगतो, ”ही माझी पहिलीच वेबसिरीज असल्याकारणाने मी खूप उत्सुक आहे. या वेबसिरीजचा विषय माझ्या अत्यंत जवळचा आहे. ही वेबसिरीज करण्यापूर्वी मी ब-याच वेबसिरीज पाहिल्या त्यांचा अभ्यास केला. माझ्या नव्या वेबसिरीजसाठी देवाचे आणि तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहू देत. हीच सदिच्छा.
चंद्र फिल्म ॲंड एंटरटेन्मेंट, चंद्रप्रकाश यादव आणि प्रशांत सावंत ह्यांची निर्मिती असलेली, तेजस लोखंडे दिग्दर्शित आणि अजिंक्य ठाकूर लिखित या नव्या मराठी वेबसिरीजचे चित्रीकरण दणक्यात सुरू झाले आहे. यात कोणकोणते कलाकार असणारं आहेत याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय.
MarathiMovieWorld aka MMW – The leading portal of Marathi cinema, Marathi film, Marathi Natak, Marathi Drama, Marathi Serials, Marathi Entertainment, Movies