‘तिरसाट (Tirsaat)’ ह्या चित्रपटात दिसणार नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी शिर्के ही फ्रेश जोडी

‘अँटमगिरी (Itemgiri )’ या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे आता ‘तिरसाट (Tirsaat)’ हा चित्रपट घेऊन येत आहेत. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. चित्रपटाच्या पोस्टरवरून ही एक प्रेमकहाणी असल्याचं कळतं. नीरज सूर्यकांत आणि तेजस्विनी  शिर्के ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करत आहे. येत्या २० मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Niraj Suryakant, Tejaswini Shirke, Team 'Tirsaat'
Niraj Suryakant, Tejaswini Shirke, Team ‘Tirsaat’

दिनेश किरवे यांच्या क्लास वन फिल्म्सनं ‘तिरसाट’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अँड. उमेश शेडगे हे सहनिर्माते आहेत. निर्माता दिनेश किरवे यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. पी.शंकरन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं असून चित्रपटाचे संकलन मंगेश जोंधळे यांनी केल आहे. नकार सकारात्मकतेनं पचवला की आयुष्याला अर्थ येतो या आशयसूत्रावर हा चित्रपट बेतला आहे.

'Tirsaat' movie poster, Niraj Suryakant , Tejaswini Shirke
‘Tirsaat’ movie poster, Niraj Suryakant , Tejaswini Shirke