योगेश तवार आणि उर्मिला जगताप यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारं एक नवं फ्रेश गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याची निर्मिती योगेश अनिल तवार यांनी केली असून झी युवा संगीत सम्राट या पर्वाचा महाविजेता ठरलेल्या रवींद्र खोमणे यांनी हे गीत गायले आहे, तर प्रसाद गाढवे यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला विपुल कदम यांनी संगीत दिलं आहे. याअगोदर योगेश तवार यांनी निर्मिती केलेलं तसेच युवा गायक रोहित राऊत यांनी गायलेलं मन मन हे गाणं सर्वांनाच आवडलं होतं. योगेश तवार व उर्मिला जगताप हि एक नवी फ्रेश जोडी या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळनार आहे. ह्या गाण्याची कमालीची गोष्ट म्हणजे अभिनयासोबतच योगेश अनिल तवार यांनी गाण्याचं कथानक व दिग्दर्शनाची धुरा देखील सांभाळली आहे, गाण्याच्या लोकशन पासुन ते फ्रेश लूक येण्यासाठी गाण्याच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. गाण्याचं छायाचित्रण व संकलन ह्या दोन […]
Read More