फुलपाखरूमध्ये अवतरणार पेशवाई!!
दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची फुलपाखरू ही मालिका तरुणांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. मानस आणि वैदेही हे तर आजच्या तरुणाईचे जीव की प्राण आहेतंच मात्र आता त्यांचं होणार बाळ म्हणजे काय असेल याची कल्पना करूच शकता . बाळाचं बारसं विशेष पद्धतीने करण्यात येणार आहे।।
एक ड्रीम सॉंग आपणास उद्याच्या भागात पहायला मिळणार असून पेशव्यांच्या घरातील बाळाचे ज्याप्रमाणे राजेशाही पद्धतीने बारसे होत असे, त्यापद्धतीने हे गाणे शूट केले गेले आहे .
यात मानस आणि वैदेहीचे संपूर्ण कुटुंब मराठमोळ्या पेशवाई पद्धतीच्या कपड्यांमध्ये असून मराठमोळ्या राजघराण्याच्या आभास निर्माण करण्यात आले आहे. सगळेच अतिशय सुंदर दिसत आहेत आणि मुख्यतः मानस वैदेहीची मुलगी तर अगदीच राजबिंड दिसत आहे. हा एपिसोड उद्या, १० फेब्रुवारीला रात्री ८ वाजता झी युवावर पाहायला मिळेल.