शिवानी रांगोळे ‘&’ तिची ‘जरा हटके’ भूमिका

Shivani Rangole Actress
Actress Shivani Rangole

गेल्या वर्षाभरात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन चेहरे पहायला मिळतायेत, इरॉस इंटरनॅशनल च्या क्रीशिका लुल्ला प्रस्तुत ‘& जरा हटके‘ या चित्रपटात अशीच एक नविन अवखळ आणि तितकीच चुलबुली अभिनेत्री शिवानी रांगोळे आपल्याला दिसणार आहे. शिवानीने ह्या आधी केलेल्या चित्रपटांपेक्षा आगामी ‘& जरा हटके‘ ह्या चित्रपटातील तिची भूमिका जरा वेगळी आणि मध्यवर्ती असून, ती आपल्या भूमिकेबद्धल खूप उत्सुक असल्याचे सांगते.

मुळात आंतरमहाविद्यालयीन नाट्य आणि एकांकिका स्पर्धेतून तिने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. अनेक नाट्यस्पर्धेतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या शिवानीने सर्वप्रथम ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी‘ या मालिकेतून छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. शिवानी रांगोळे सोबत मृणाल कुलकर्णी, बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत.  नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply