‘मिस यू मिस्टर’ या आगामी चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांची मध्यवर्ती भूमिका असलेल्या ‘मिस यू मिस्टर’  चे पहिले पोस्टर आज प्रकाशित करण्यात आले. समीर जोशी  दिग्दर्शित  हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

Miss U Mister Marathi Movie
Miss U Mister Marathi Movie

समीर जोशी यांनी दिग्दर्शनाबरोबरच या चित्रपटाचे लेखनही केले आहे. बस स्टॉप (२०१७), मामाच्या गावाला जाऊया (२०१४), मंगलाष्टक वन्स मोअर (२०१३) असे गाजलेले मराठी चित्रपट जोशी यांच्या नावावर आहेत. त्यांनी ‘बे दुणे दहा’, ‘प्रीती परी तुजवरी’ आणि ‘एक नंबर’ या स्टार प्रवाहवरील टेलिव्हिजन मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.