‘मामला चोरीचा’ हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात.

Mamla Choricha Marathi Play Image
‘Mamla Choricha’ Marathi Play

लेखक वसंत सबनीस यांनी लिहीलेले स्वतंत्र सामाजिक विनोदी नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर नव्या रुपात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तब्बल ३२ वर्षानंतर “मामला चोरीचा” हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात रंगभूमीवर येत आहे. श्री साई प्रोडक्शन व स्पंदन निर्मीत केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मंगलदास माने यांनी केले आहे. येत्या रविवारी, दिनांक 24 जून रोजी सातारा रोडवरील आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हा प्रयोग रंगणार आहे.

मामला चोरीचा” या नाटकाचा पहिला प्रयोग दिनांक ६ मे १९८५ रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर, पुणे येथे झाला होता. दामू केंकरे दिग्दर्शित या नाटकामध्ये शरद तळवळकर, आश्विनी देसाई यांनी भुमिका साकारल्या होत्या. तर यावेळी आदर्श गायकवाड, सागर पवार, संजय देवळे, केतकी लांडे, ऐश्वर्या कुलकर्णी, संजय चव्हाण आणि विद्या भागवत हे कलाकार असणार आहेत.

दिग्दर्शक मंगलदास माने म्हणाले, “पिढ्यानपिढ्या बदलल्या तरी कुटुंबातील आई ही आईच असते. आजच्या पिढीमध्ये आईची भूमिका बदलत चालली आहे. आईने आपल्या मुलांना किती सवलत द्यावी की धाकात ठेवावे हा विचार समाज करीत आहे.”

Leave a Reply