‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ अफलातून विनोदाची मेजवानी

Bhalchandra, Bhau Kadam, Aarti Solanki, Wajalach Pahije Movie

चॅनल यू इन्टरटेनमेंट प्रस्तुत, आतिफ निर्मित, आर विराज दिग्दर्शित ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’  या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना विनोदाची मेजवानी मिळणार आहे.  आजचे आघाडीचे विनोदवीर भालचंद्र कदम (भाऊ) आणि आरती सोलंकी ह्यांनी मुख्य भूमिका साकारल्या असून त्यांच्या जोडीला  राजेश भोसले, चिन्मय उदगीरकर, गिरीजा जोशी, आरती सोलंकी संजय मोहिते आदी कलाकारांच्या ह्या चित्रपटात भूमिका आहेत.

दोन अवलियांची धमाल गोष्ट सांगणारा हा चित्रपट. हे दोघेजण सिनेमा काढण्यासाठी कशी धडप़ड करतात. त्यांच्या या धडपडीत काय काय घडतं. त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं.हे या सिनेमात अत्यंत रंजकपणे मांडण्यात आलं आहे.  ‘वाजलाच पाहिजे! गेम की शिणेमा’ चित्रपटाच्या शीर्षकावरून आपण दादा कोंडकेंच्या चित्रपटांच्या हटके शीर्षकांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

चित्रपटातील मुख्य कलाकार, शीर्षक, ट्रेलर, कथा आणि संदावादातून हा चित्रपट प्रेक्षेकांचे फुल टू मनोरंजन करेन असे दिसते. चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद बाळ-अमोल यांची आहे. सह-निर्मात्याची जबाबदारी हेमंत अणावकर तर कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी मंगेश जगताप यांनी सांभाळली आहे.  येत्या ११ सप्टेंबरला हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.