शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित नवी मालिका ‘योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar)’

'Jai Shankar' Marathi serial. Actress Uma Pendharkar, actor Aarush Bedekar
‘Jai Shankar’ Marathi serial. Actress Uma Pendharkar, actor Aarush Bedekar


शिरीष लाटकर लिखित “योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar) ही नवी मालिका 
कलर्स मराठीवर ३० मेपासून सुरू होत आहे.  मैं कैलाश का रहने वाला हू,मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केलेज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहेमहादेवाचा अंश जे आहेतअसे असंख्य भक्तांचे कैवारीत्रिलोकी आहे ज्यांची कीर्ती संतवर्य योगीराजसद्गुरू राजाधिराज ‘शंकर महाराज’. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर कलर्स मराठी घेऊन येत आहे.

'Yogyogeshwar Jai Shankar' Mrathi Serial on Colors Marathi
‘Yogyogeshwar Jai Shankar’ Mrathi Serial on Colors Marathi

या मालिकेमध्ये आरुष बेडेकर (Aarush Bedekar) हा बाल शंकर महाराजांची भूमिका साकारणार आहे. शंकर महाराज्यांच्या आईची भूमिका आपल्या सगळ्यांची लाडकी उमा पेंढारकर (Uma Pendharkar) साकारणार आहे. तर, वडिलांची (चिमणाजी) भूमिका अतुल आगलावे (Atul Aagalave) साकारणार आहेत.

वेश घेतला बावळा, अंतरी शुद्ध ज्ञानकळा ऐसा सदगुरू लाघवी, नाना रंगी जन खेळवी…शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत बघायला मिळणार आहे. तेव्हा नक्की बघा सत्पुरुषाच्या मंगल चरित्राचा आरंभ – ३० मेपासून संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर.