Tag Archives: मराठी

कलर्स मराठीवर ‘घाडगे & सून’चे एक तासाचे विशेष भाग

Marathi serial  'Ghadge & Suun'
Chinmay Udgirkar and Bhagyashree Limaye, Marathi serial ‘Ghadge & Suun

घाडगे & सून‘ मालिकेमध्ये गेल्या बऱ्याच आठवड्यांपासून अक्षयचा कियाराला शोधण्यासाठी सुरु असलेली धडपड आता संपली आहे. कियारा आणि अक्षयची भेट झाली असून अमृता आणि अक्षय कियाराबद्द्लच सत्य घाडगे परिवारापासून लपवत आहेत. अमृताला ही लपवाछपवी मनापासून पटत नसली तरी देखील ती अक्षय आणि कियाराच्या प्रेमासाठी तसेच अक्षयसोबत सुरु झालेल्या नव्या मैत्रीच्या नात्यासाठी हे सगळ करण्यासाठी तयार झाली आहे. पण, अक्षयचा कियाराला स्वत:च्या आयुष्यामध्ये आणण्यासाठी सुरु असलेला प्रयत्न जर माईना कळला तर ? असे आणि अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत.

अमृताचे मामा मनोहर घाडगे सदन मध्ये आपले बस्थान बसवणार आहेत, मामाचा असं करण्यामागचा हेतू अमृताला आणि अक्षयला कळला नाही. कियारा नुकतीच अक्षयला भेटली असून आता अक्षयसमोर अजून एक अडचण समोर आली आहे आणि ती म्हणजे कियाराच्या आयुष्यात आता अर्जुन नावाच्या मुलाचा स्थळ तिच्या वडीलांनी आणलं असून अक्षय कसं कियाराला परत मिळवेल ? अर्जुनच्या येण्याने मालिकेला कुठलं नवं वळण मिळेल ? या सगळ्या गुंत्यामधून नात्यांना एक वेगळीच रंगत येणार आहे. हे जाणून घेण्यासाठी पहा ‘घाडगे & सून‘ १३ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत कलर्स मराठीवर.

दुर्गाच्या येण्याने सरस्वती मालिकेमध्ये सुरु होणार नवा अध्याय

Marathi serial 'Saraswati'
Marathi serial ‘Saraswati

सरस्वतीने देविकाला निव्वळ तिच्या मोठ्या मालकांसाठी स्वीकारले, मोठ्या मनाने तिला आपलसं केलं, भैरवकरांच्या वाड्यामध्ये जागा दिली. राघव आणि देविकाचे लग्न होण्यामागे विद्युलचाच हात होता हे सरस्वतीला कळून सद्धा तिने संयम राखला. विद्युलच्या विरोधात तिने भैरवला काहीच सांगितले नाही. याच दरम्यान भैरवकरांचा वाडा आणि संपत्ती सरस्वतीच्या नावावर आहे हे विद्युलला कळाले. संपत्ती मिळविण्यासाठी रचलेले कारस्थान सरस्वतीने जर राघवला सांगितले तर राघव आपल्याला या वाड्यामधून काढून टाकेल या भीतीने विद्युलने भुजंगच्या मदतीने सरस्वतीला मारण्याचे षड्यंत्र रचले.

विद्युलने सरस्वतीचा काटा काढून टाकला पण तिला मारल्यानंतर हे कळाले कि, जोपर्यंत सरस्वतीचं प्रेत मिळत नाही तो पर्यंत वाडा दुसऱ्या कुणाच्याही नावावर होऊ शकत नाही आणि जर हे प्रेत मिळाले नाही तर त्यांना सात वर्ष थांबाव लागेल यामुळे विद्युलसमोर एक नवीन समस्या उभी राहली.
सरस्वती‘ मालिकेमध्ये दुर्गाचा लूक सरस्वतीच्या लूक पेक्षा अगदीच वेगळा आहे. वेगळ्याप्रकारची साडी, गॉगल, रांगडी भाषा, आंबाडा, असा लुक असून जो सरस्वती पेक्षा अगदीच वेगळा आहे. आता सरस्वती सारख्याच दिसणाऱ्या दुर्गाच्या येण्याने राघव, देविकाच्या आयुष्यात काय घडेल हे बघणे रंजक असणार आहे. तसेच वाड्यामध्ये मज्जा, मस्ती आणि ड्रामा देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

सर्जाचा चेहराच उलघडणार वाड्यातील रहस्य

Akshar Kothari as Sarja in Marathi serial 'Chahul 2'
Akshar Kothari as Sarja in Marathi serial Chahul 2

खरी शांभवी म्हणजेच राणी वाड्यामध्ये पोहचली असून खोटी शांभवी तिला सर्जापासून दूर ठेवण्याचे बरेच प्रयत्न करत आहे ‘चाहूल २ या मालिकेमध्ये. सर्जाला सत्य पटवून देण्यात राणीला अजूनही यश मिळाले नाही तसेच सर्जाला राणी अजूनही शांभवीच्या तावडीतून सोडवू शकलेली नाही. या सगळ्यामध्ये वाड्यात अजून एक विचित्र गोष्ट घडली आहे ती म्हणजे सर्जा सारखाच दिसणारा दुसऱ्या व्यक्तीचा देखील वाड्याशी संबंध आहे हे सर्जाच्या लक्षात आले आहे ज्याचे नाव साहेबराव आहे.

सर्जाला वाड्यातील एका पेटी मध्ये साहेबरावचा फोटो मिळतो आणि त्याला प्रश्न पडतो कि हा माणूस हुबेहूब माझ्यासारखाच दिसतो पण हा कोण आहे हे त्याला माहिती नसते. साहेबराव आणि सर्जा यांच्या राहणीमानात, त्यांच्या कपड्यात आणि बोलण्याच्या पद्धतीत फरक असला तरी या दोघांचे चेहरे मात्र सारखेच आहेत. साहेबराव वाड्यामध्ये का राहत नाही ? सुरेखा काय लपवत आहे ? हे शोधण्याचा निर्धार करतो. वाड्यामध्ये राणी म्हणजेच खऱ्या शांभवीला देखील साहेबराव बद्दल कळते आणि त्याच्या बद्दलची माहिती मिळत असताना असे देखील कळते कि, त्याने सुरेखा हि आपली पहिली पत्नी असताना दुसऱ्या बाईला घरात आणले होते. हे सगळे जाणून घेण्यासाठी बघा ‘चाहूल २कलर्स मराठीवर सोम ते शनि रात्री १०.३० वा.

‘अनान’ चित्रपटात शिल्पा तुळसकर एका नवीन भूमिकेत

 Shilpa Tulaskar actress
Shilpa Tulaskar actress

मराठी तसेच हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचे ठसे उमटवत कधी सुजाता तर कधी देवकीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणजे अभिनेत्री शिल्पा तुळसकर.
देवकी‘, ‘डोंबिवली फास्ट‘, ‘कालचक्र‘ आणि आता ‘बॉईज‘ यांसारखे चित्रपट असो, ‘दिल मिल गए‘, ‘देवों के देव- महादेव‘ यांसारख्या मालिका असो वा जावई माझा भला, लहानपण देगा देवा यांसारखी नाटके असोत सिनेमा, मालिका आणि नाटक या तीनही क्षेत्रात आपल्या उत्तोमोत्तम अभिनयाने नेहमीच स्वतःला सिद्ध केलेले आहे. आता ‘अनान‘ या आगामी मराठी चित्रपटातून ६४ कलांचं महत्त्व जगाला पटवून देणाऱ्या या भारत देशातील संगीताची संस्कृती पिढ्यांपिढ्या पुढे सुरु ठेवणाऱ्या पंडीत वसुंधरा या भूमिकेत शिल्पा तुळसकर आढळून येणार आहेत.

‘रोहन थिएटर्स’ च्या रौनक भाटीया आणि हेमंत भाटीया यांनी ‘अनान‘ या चित्रपटाची निर्मिती केलेली असून कथा आणि क्रिएटीव्ह डायरेक्शन हेमंत भाटिया यांचं आहे. दिग्दर्शन राजेश कुष्टे यांनी केलेलं आहे तर पटकथा–संवाद राजेश कुष्टे आणि मुकेश जाधव यांनी लिहिले आहेत.
येत्या २२ सप्टेंबर ला ‘अनान‘ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात जाऊन तो बघायला विसरू नका.

छंद प्रितीचा चित्रपटात दिसणार सुबोध भावे एका नवीन भूमिकेत

Actor Subodh Bhave Marathi Film Chhand Priticha
Actor Subodh Bhave

अभिनेता सुबोध भावे ह्याला आपण ‘कटयार काळजात घुसली‘, ‘हृदयांतर‘, ‘तुला कळणार नाही‘ अशा विविध प्रकारच्या दमदार चित्रपटांतून आपल्याला अभिनयाचे वेग वेगळे पैलू पाहावयाला मिळालेत. सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाते. लवकरच ‘प्रेमला पिक्चर्स’ निर्मित ‘छंद प्रितीचा’ ह्या येत्या १० नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या आगामी चित्रपटात आणखीन एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या नृत्यशैलीवर आधारित ‘छंद प्रितीचा‘ हा आगामी सिनेमा लवकरचं आपल्या भेटीस येणार आहे. तमाशातील तन मन आणि धन ओतून वावरणार्‍या प्रत्येक मनस्वी कलाकाराच्या जीवनाचा वेध घेणारा हा चित्रपट… आजवर आपल्या वेगवेगळ्या भूमिकांमधून विशेषत: चरित्रात्मक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे सुबोध भावे या चित्रपटातून ‘राजाराम’ नामक एका ढोलकी वादकाच्या आगळ्यावेगळ्या भूमिकेत आढळून येणार आहेत.
निर्माते चंद्रकांत जाधव यांच्या ‘प्रेमला पिक्चर्स’ निर्मित ‘छंद प्रितीचा‘ चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केले असून छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचे आहे तर संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलेले आहे.

‘तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये भरत जाधव विठ्ठलाच्या भूमिकेत

Bharat Jadhav, Marathi serial 'Tu Majha Sangati'
Bharat Jadhav, Marathi serial ‘Tu Majha Sangati

तू माझा सांगाती’ मालिकेमध्ये प्रेक्षकांना तुकारामांची विठूरायावर असलेली निस्सीम भक्ती बघायला मिळाली. आता मालिकेचे नवे पर्व सुरु होणार आहे पहील्यांदाच महाराष्ट्राचा लाडका अभिनेता म्हणजेच भरत जाधव विठ्ठ्लाच्या भूमिकेत तर स्मिता शेवाळे रखुमाईच्या भूमिकेत दिसणार आहे.
विठ्ठल म्हणजे कृष्णाचं रूप, पण यामागे देखील आख्यायिका आहे. असे म्हणतात कि, रुक्मिणी काही कारणास्तव कृष्णावर रुसली आणि द्वारिका सोडून पृथ्वीतलावर आली. आपल्या रुसलेल्या पत्नीच्या शोधात कृष्ण विठू रायाच रूप घेऊन पृथ्वीवर आला. पण, नव्या रुपात समोर उभ्या ठाकलेल्या कृष्णाला रुक्मिणी ओळखूच शकली नाही. आपल्या चतुर बोलण्याने विठ्ठ्लाने रुक्मिणीचे मन जिंकले आणि तिचा सखा बनला.

तू माझा सांगाती’ पर्व दुसरे या मालिकेविषयी बोलताना कलर्स मराठी प्रमुख Viacom18 निखील साने म्हणाले, “रंगमंच्याचा हुकमी एक्का ठरलेला, तसेच निव्वळ विनोदच नव्हे तर आशयपूर्ण भूमिकादेखील तितक्याच ताकदीने साकारलेला कलाकार म्हणजे भरत जाधव. कुठलीही भूमिका सहज, सुंदरपणे साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवणे हा भरतचा हातखंड आहे“.
या मालिके विषयी बोलताना भरत जाधव म्हणाले, “मी खूप खुश आहे कि, मला ही भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी मिळाली. कलर्स मराठीकडून जशी ही भूमिका माझ्याकडे आली मी लगेच माझा होकार कळवला. याच महत्वाचं कारण असं कि, आमच्या घरी गेल्या बऱ्याच वर्षांपासून गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो“. तेंव्हा बघायला विसरू नका ‘तू माझा सांगाती’ पर्व दुसरे – विठ्ठल रखुमाईची संसारगाथा ६ सप्टेंबर पासून सोम ते शनि संध्या ७.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटात पहायला मिळणार एक नवी कोरी जोडी

Marathi movie 'Vitthala Shappath'
Vijay Sairaj and Krutika Gaikwad, Marathi movie ‘Vitthala Shappath’

गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांची निर्मिती असलेल्या ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटातही प्रेक्षकांना एक नवी कोरी जोडी पहायला मिळणार असून हा चित्रपट येत्या १५ सप्टेंबरला आपल्या मनोरंजनासाठी येत आहे.
चंद्रकांत पवार दिग्दर्शित ‘विठ्ठला शप्पथ‘ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय साईराज आणि कृतिका गायकवाड ही जोडी प्रथमच एकत्र आली आहे. या चित्रपटामध्ये पवार यांनी विठ्ठलाच त्याच्या भक्ताशी असलेलं भावनिक नातं अधोरेखित केलं आहे. वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात मुलाची भूमिका साकारण्यासाठी एका नव्या चेहऱ्याची गरज होती. ऑडीशनद्वारे बऱ्याच जणांचा शोध घेतला पण हवा तसा चेहरा दिग्दर्शकांना मिळत नव्हता. मात्र ओळखीतून विजयचं नाव समोर आलं.

दिग्दर्शनासोबतच चंद्रकांत पवार यांनीच ‘विठ्ठला शप्पथ‘ चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली असून, विजय-कृतिका या जोडीसोबत या चित्रपटात मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, विजय निकम, प्रणव रावराणे, या कलाकारांच्याही भूमिका आहेत. राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुवर या मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात या चित्रपटातील गीतरचना रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे.

‘छंद प्रितीचा’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

Subodh Bhave, Suvarna Kale, Harsh Kulkarni in Marathi movie 'Chhand Priticha'
Subodh Bhave, Suvarna Kale, Harsh Kulkarni in Marathi movie ‘Chhand Priticha’

आपल्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून एखादा छंद प्रत्येकाने जोपासावा असं म्हटलं जातं… मग तो छंद शिंपल्या गोळा करण्याचा असो किंवा जुन्या नोटा .. हे छंद माणसाला एक वेगळा आनंद देऊन जातात… मात्र ज्यांना प्रितीचा छंद प्रितीचा छंद जडतो त्यांचं काय?
प्रितीचा छंद लागलेल्या अशाच दोन जीवांची कथा सांगणारा नवा सिनेमा मराठीत येत आहे. या सिनेमाचं नाव ‘छंद प्रितीचा‘ असं असून नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. तमाशावर आधारित गावापासून ते शहरी माणसांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे यांच्याबरोबरच नवा चेहरा हर्ष कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जोडीला शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे ही कलाकार मंडळी आहेत.

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केलं असून चित्रपटनिर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचं असून संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलं आहे. प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ हा चित्रपट येत्या 10 नोव्हेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘सरस्वती’, ‘घाडगे & सून’ या मालिकांमध्ये मध्ये होणार गणपती बाप्पाचं आगमन

Bhagyashree Limaye and Chinmay Udgirkar in Marathi serial 'Ghadge And Soon'
Bhagyashree Limaye and Chinmay Udgirkar in Marathi serial ‘Ghadge And Suun

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंनदाचे, जल्लोषाचे वातावरण आहे कारण एकच आपल्या सगळ्यांचाच लाडका गणपती बाप्पा याचे लवकरच आगमन होणार आहे. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या ‘सरस्वती‘, ‘घाडगे & सून‘ आणि ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस’ या कार्यक्रमांमध्ये देखील गणपतीचे आगमन होणार आहे.
सरस्वती मालिकेमध्ये भैरवकरांच्या वाड्यावर गणेशाचे आगमन होणार असून यावेळेसच्या गणेश चतुर्थीमध्ये काही विशेष असणार आहे. ‘एक गावं एक गणपती‘ असे आयोजन करण्यात येणार आहे. देविका आणि सरू म्हणजेच सरस्वती हरतालिकेची पूजा करणार आहेत. विद्युल सरस्वतची हि पूजा कशी असफल करण्याचा तसेच तिच्या मार्गामध्ये अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार आहे. या गणेशोत्सवामध्ये सरस्वतीवर कोणते नवे संकंट येणार आहे, हे बघण्यासाठी बघा सरस्वती.

नुकत्याच सुरु झालेल्या ‘घाडगे & सून‘ या मालिकेमध्ये देखील गणरायाचे आगमन होणार आहे. घाडगे परिवाराने गणेशाच्या मूर्तीची स्थापना पारंपरिक पद्धतीने केली. गणपती आगमनाच्या शुभमुहूर्तावर माईना आणि घाडगे परिवाराला आवडलेली अमृता पहील्यांदाच घाडगेच्या घरी येणार आहे आणि दुसरीकडे अक्षयचे जिच्यावर प्रेम आहे ती कियारा देखील येणार आहे. ‘कॉमेडीची GST एक्सप्रेस‘ या कार्यक्रमाच्या गणेशचतुर्थी विशेष भागाची सुरुवात गणपती नमन सादर होणार आहे तसेच महाराष्ट्राचा लाडका आणि कार्यक्रमाचा प्रथम प्रेक्षक अवधूत गुप्ते याने त्याचे सुप्रसिध्द गाणे देखील म्हंटले आहे.

स्त्रीकर्तृत्वाचा सन्मान ‘उंच माझा झोका’ पुरस्काराने

Unch Majha Zoka awards  2017
‘Unch Majha Zoka’ awards

सन्मान स्त्रीच्या लढण्याचा, गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन यावर्षीचा ‘उंच माझा झोका ‘ पुरस्कार दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आणि यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. तथा आपल्या भरीव योगदानाबद्दल सुनंदाताई पटवर्धन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अनुताई वाघ यांच्या ‘ग्राममंगल’ या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालाही विशेष गौरवण्यात आलं. येत्या २७ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.

महाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यावर्षी आदिवासींची घरठाणाची चळवळ चालवणा-या डॉ. वैशाली पाटील, दृष्टीहिन तथा गतीमंद मुलामुलींची शाळा चालवणा-या प्रमिला कोकड, रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर, आपल्या अभिजात साहित्याने मराठी साहित्यक्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणा-या अरुणा ढेरे, न्युरोसायन्ससारख्या विषयात आपल्या संशोधनाची पताका फडकविणा-या डॉ. विदिता वैद्य यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक आणि उमेश कामत यांनी तर कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन क्षितिज पटवर्धनने केलं. ‘उंच माझा झोका‘ पुरस्कारांच्या निवड समितीची जबाबदारी ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ.स्नेहलता देशमुख यांनी पार पाडली.