‘बालपण देगा देवा’ मालिकेमध्ये आनंदी बनणार देवी
‘बालपण देगा देवा‘ मालिका नुकतीच कलर्स मराठीवर सुरु झाली आहे. मालिकेमध्ये अण्णा यांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले यांनी आपल्या दमदार आणि आनंदी म्हणजेच मैथिली हिने आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळविण्यास सुरुवात केली आहे. वेगळ्या धाटणीची संकल्पना प्रेक्षकांना या ‘बालपण देगा देवा ‘ मालिकेतून बघायला मिळत आहे. या आठवड्यामध्ये मालिकेमध्ये प्रेक्षकांना ‘दशावतार‘ बघायला मिळणार आहे. या विशेष भागामध्ये आनंदी देवी बनणार आहे आणि मग पुढे काय होईल हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.
गावामध्ये उत्सव साजरा होणार आहे, त्यामुळे मदन गावातील लहान मुलांचं नाटक बसवत आहे ज्यामध्ये तो सूत्रधाराची भूमिका वठवणार आहे. आनंदी देवीचा रोल नाटकामध्ये करण्यास खूपच उत्सुक आहे, नाटकामध्ये आनंदी देवीचा रोल छान प्रकारे पार पाडते. आपलं इतक सगळे छान कौतुक करत आहेत, आपल्याला शाबासकी देत आहेत पण अण्णा मात्र आपल्याला काहीच बोलले नाही हे बघून आनंदी दु:खी होते. पण, अण्णाच्या मनामध्ये एकावेगळ्याच गोष्टीची चिंता आहे, या सगळ्या प्रकारामध्ये आनंदीचे बालपण तर हरवणार नाही ना ? कारण पहिले वाड्यामधील देवीचा चेहरा आणि आनंदीच्या चेहऱ्यामधील साम्य आणि आता आनंदीची पूजा यामुळे अण्णा अजूनच चिंतेत आहेत.
निर्मलाचं अतिरेकी प्रेम घेणार सर्जाच्या शरीराचा ताबा
‘चाहूल’ मालिकेला लवकरच एक वेगळे वळण मिळणार आहे. कारण मालिकेमध्ये सर्जाला म्हणजेच अक्षर कोठारीला भुताने झपाटल्याचे प्रेक्षकांना बघयाला मिळणार आहे. निर्मलाच सर्जावर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे जेनी असो वा शांभवी तिने कोणालाच सर्जाच्या जवळ येऊ दिले नाही. तिने सर्जाला आपलसं करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, सर्जाला सत्य कळू नये म्हणून तिने शांभवीला अनेकदा नवीन नवीन जाळ्यामध्ये अडकवले. पण, आता निर्मलाच हे अतिरेकी प्रेम सर्जा वर हावी पडणार आहे.
शांभवी सध्या वाड्यामधील भुताच्या शोधात असून तिला वटपौर्णिमेच्या दिवशी वाड्यातील भूत हे एक स्त्री आहे हे कळले आहे. आता निर्मला हे कळल्यापासून अजूनच सतर्क झाली आहे. सर्जाला वाड्यातील भुताने झपाटले आहे. त्यामुळे सर्जा स्वत:ला मारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे शांभवी समोर अजून एक आव्हान आहे सर्जाला बरे करण्याचे. तसेच वाड्यातील भुताची अजून एक गोष्ट देखील शांभवीला कळणार आहे. हे सगळ बघणे रंजक ठरणार आहे.
ढोलकीच्या तालावर रितेश देशमुखने घेतला लावणीचा लै भारी अनुभव
महाराष्ट्राचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता रितेश देशमुख याने कलर्स मराठीवरील ढोलकीच्या तालावरच्या सेटवर हजेरी लावली. या मंचावर तो ‘बॅंकचोर‘ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. कलर्स मराठी आणि ‘ढोलकीच्या तालावर‘ तर्फे रितेश आणि जेनेलियाला एक खास भेट देण्यात आली. रितेशला फेटा आणि जेनेलियाला पैठणी हि भेट मिळाल्यानंतर तो भारावून गेला. अप्सरांना अफलातून लावण्या करताना बघून रितेश आश्चर्यचकित होता त्याला किती कौतुक करावे समजत नव्हत.
या भागामध्ये रितेश देशमुखने ढोलकीच्या तालावरील छोट्या अप्सरांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. तसेच 2 mad ची स्पर्धक सोनल विचारे हिने रितेश देशमुखसाठी एक डान्स act सादर केला, ज्यामध्ये त्याच्या सुप्रसिध्द गाण्यांचा समावेश होता. तसेच हि मज्जा इथेच संपली नाही एका बाजूला लहान मुली, रितेश आणि जितु आणि दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे नी मोठ्या मुली यांच्या मध्ये रस्सी खेच स्पर्धा चांगलीच रंगली आणि ज्यामध्ये रितेशची टीम जिंकली. रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, लहान मुली आणि हेमंत ढोमे यांनी मंचावर बसून भाकरी आणि ठेचा मनसोक्त खाल्ला.
या आठवड्यामध्ये ‘ढोलकीच्या तालावर‘ वेस्टर्न पद्धतीच्या जुन्या लावण्या सादर केल्या जाणार आहेत तेंव्हा बघायला विसरू नका ‘ढोलकीच्या तालावर‘ १२ आणि १३ जूनला रात्री ९.३० वा. तुमच्या लाडक्या अभिनेत्या रितेश देशमुखसोबत फक्त कलर्स मराठीवर.
कलर्स मराठीवरील चाहूल आणि सरस्वती मालिकेमध्ये साजरी होणार वटपौर्णिमा
ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस ‘वटपौर्णिमा’ म्हणून साजरा केला जातो. कलर्स मराठीवरील ‘चाहूल‘ आणि ‘सरस्वती‘ या मालिकेमध्ये देखील शांभवी आणि सरस्वतीने वटपौर्णिमा साजरी केली.
‘चाहूल‘ मालिकेमध्ये वाड्यातील सगळ्या बायका उत्साहात वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जाणार असून शारदा, जानकी शांभवीला देखील त्यांच्यासोबत वटपौर्णिमेच्या पूजेला घेउन जाणार आहेत. याचदिवशी शांभवीच्या मनामध्ये असलेला मोठा प्रश्न सोडवला जाणार आहे, तिला वाड्यामध्ये असलेल्या भुताच्या रहस्याबद्दल एक चाहूल लागणार आहे आणि या रहास्यामागे असलेला एक प्रश्न सुटणार आहे, हे सगळ होत असतानाच शांभवीच्या लक्षात येत कि, वाड्यामधील भूत हे कोणी पुरुष, लहान मुल नसून एक स्त्री आहे. हे कळल्यामुळे आता शांभवीचा निर्मला पर्यंत पोहचण्याचा प्रवास सुरु झाला आहे हे नक्की.
याच बरोबर ‘सरस्वती‘ मालिकेमध्ये राघव परतल्यावर सरस्वतीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. सरस्वतीची वटपौर्णिमेची पूजा निर्विघ्नपणे पार पडणार देखील आहे पण अचानक असे काही घडणार आहे ज्यामुळे तिला धक्का बसणार आहे. कारण याचदिवशी सरस्वती समोर राघवचे एक वेगळे रुप समोर येणार आहे. पण, राघव असे का वागत आहेत ? मोठे मालक इतके कसे बदलले ? नक्की यामागचे कारण काय आहे ? या मागच कारण शोधण्याचा नक्कीच सरस्वती प्रयत्न करेल यात शंका नाही.
‘अंड्या चा फंडा’ या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच
लहानपणीचे दिवस प्रत्येकालाच आठवतात, त्यावेळच्या आठवणींबरोबर बालमित्र हे सुद्धा जिव्हाळ्याचा विषय असतो. अश्याच दोन जिवलग मिंत्रांच्या मैत्रीवर आधारित असलेला, अध्यास क्रिएशन निर्मिती आणि संतोष शेट्टी दिग्दर्शित ‘अंड्या चा फंडा’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ती सी.आय.डी. ह्या प्रसिद्ध मालिकेतील संपूर्ण टीमसोबतच शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि नरेंद्र गुप्ता या कलाकारांची.
प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. सी.आय.डी. आणि आहट यांसारख्या मालिकेचे कथालेखन करणारे संतोष शेट्टी हे या सिनेमाद्वारे प्रथमच दिग्दर्शनात पदार्पण करताय . अनेक वर्ष सिनेसृष्टीपासून दूर राहिलेली अभिनेत्री दीपा चौधरीदेखील या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे यात तिची प्रमुख भूमिका असून, या चित्रपटामार्फत ती पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे.
अथर्व बेडेकर, शुभम परब आणि मृणाल जाधव या तीन बालकलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी आपणस पाहायला मिळणार आहे . दिग्दर्शक संतोष शेट्टी यांची कथा असलेल्या या सिनेमाची पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात दिपा चौधरी, सुशांत शेलार आणि अरुण नलावडे यांची देखील प्रमुख भूमिका असणार आहे.
झी युवाने घेतलेल्या ‘संगीत सम्राट’च्या ऑडिशनला कलाकारांचा उस्फुर्त प्रतिसाद
झी युवाने घेतलेल्या ‘संगीत सम्राट‘ महाराष्ट्र ऑडिशन मध्ये प्रत्येक शहरात कलाकारांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत उत्कृष्ट गायकांबरोबर अनेकांनी तबला, डमरू, ढोल ताशे, पेटी, सूरसोटा, एकतारी, रुद्रवीणा अशी अनेक निरनिराळी वाद्ये घेऊन येऊन, त्यांच्या साहाय्याने स्पर्धकांनी ऑडिशन्स गाजवल्या आहेत आता अश्या अतिशय उत्तमोत्तम कलाकारांमधून ते १५० कलाकार कोण असतील याची उत्सुकता नक्कीच असणार आहे.
‘संगीत सम्राट‘ हा कार्यक्रम अनेक कारणांमुळे वेगळा ठरणार आहे. छोट्या पडद्यावर अश्या प्रकारचा टॅलेंट हंट आजपर्यंत कोणीही पाहिला नसेल. ‘संगीत सम्राट‘ ही संकल्पना संपूर्णपणे झी युवा या वाहिनीची असून लवकरच महाराष्ट्रातील प्रेक्षकांना झी युवावर या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे . झी युवाच्या ‘संगीत सम्राट‘ या टॅलेन्ट हंट कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि नावाजलेले गायक आदर्श शिंदे हे जज असणार आहेत.
चाहूलचे सर्जेराव पोहचले लोणावळ्याला
कलर्स मराठी वरील ‘चाहूल‘ मालिकेतील सर्जेराव म्हणजेच प्रेक्षकांहा लाडका अभिनेता अक्षर कोठारी याने आपल्या busy दिवसांमधून वेळ काढला. पण, हि संधी अक्षरला मिळाली. चाहूल मालिकेच शूटच्या दरम्यान त्याला अचानक कळाल कि आजचा दिवस संपला आहे आणि आता सगळे घरी जाऊ शकता. त्यामुळे अक्षर कोठारीने थेट लोणावळ्याला जायचा प्लान केला. खोपोलीमधील आदिवासी पाड्यातील आदिवासींना देखील भेटला, त्यांच्या बरोबर जेवला.
अक्षर म्हणाला,”सध्या मी बऱ्याच कामांमध्ये व्यस्त आहे त्यामुळे मला स्वत: साठी वेळ काढणे जमत नाही. पण त्यादिवशी packup लवकर झाले त्यामुळे मी लगेच निर्णय घेतला आणि बाहेर पडलो. मला मध्यंतरी स्लीप डिस्कचा त्रास झाला होता त्यामुळे मी गाडी चालवू शकत नव्हतो. पण, आता तो त्रास बराच कमी झाला आहे त्यामुळे मी एकटाच मस्त drive करत गेलो. खूप मज्जा आली, पण मी मानसी ला नक्कीच मिस केलं “.
‘हृदयांतर’ मराठी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
विक्रम फडणीस दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट ‘हृदयांतर‘चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. ह्या चित्रपटात सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका असून, चित्रपटामध्ये सुपरस्टार हृतिक रोशन आणि टेलिविजन होस्ट मनिष पॉलच्या ही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा स्वतः विक्रमने लिहली आहे.
टॅब एन्टरटेन्मेटची प्रस्तुती असलेल्या विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट निर्मित ‘हृदयांतर‘ हा चित्रपट ७ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात झळकणार आहे.
शिवम वानखेडे ठरला 2MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर
कलर्स मराठीवर सुरु झालेल्या 2MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर याकार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. 2MAD शोमध्ये TOP 6 ची निवड झाली आणि या स्पर्धकांमध्ये विजेतपद मिळवण्याची चढाओढ चांगलीच रंगली. शिवम वानखेडे याने मिळवला 2MAD महाराष्ट्राचा अस्सल डान्सर होण्याचा मान, तर राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारे यांनी अनुक्रमे पटकावले दुसरे आणि तिसरे स्थान.
2MAD च्या ग्रँड फिनालेमध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा सांवत आणि वैभव तत्ववादीने मोना मोना, टूकुर टूकुर आणि तू चीझ बडी हे मस्त मस्त या गाण्यावर अफलातून नृत्य सादर करत सगळ्यांची मने जिंकली. कार्यक्रमाचे परीक्षक उमेश जाधव यांनी बायगो बायगो आणि संजय जाधव यांनी ये जवानी है दिवानी या गाण्यावर डान्स केला जो प्रेक्षकांना विशेष आवडला. तसेच 2MAD ची परीक्षक अमृता खानविलकर हिने आपल्या दिलखेचक आणि अप्रतिम नृत्याने ग्रँड फिनालेची रंगत अजूनच वाढवली.
2MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरच्या ग्रँड फिनालेमध्ये सगळ्याच स्पर्धकांना महाराष्ट्रातून असंख्य वोट्स मिळाले. या कार्यक्रमातील विजेत्याला शिवम वानखेडेला तब्बल दोन लाख आणि गोल्डन ट्रॉफी मिळाली. तर राहुल कुलकर्णी आणि सोनल विचारेला अनुक्रमे सिल्वर आणि ब्रॉंझ ट्रॉफी तसेच एक लाख रुपये मिळाले.
‘तू माझा सांगाती’ मालिकेत ऋजुता देशमुख साकारणार आवलीची भूमिका
संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत, मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ – संत तुकाराम. तुकोबांच्या अभंगवाणीने प्रत्येक मराठी मनात अभंग स्थान मिळवलं आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती ‘ मालिकेत रेखाटण्यात येत आहे. आठशेहून अधिक भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केलेली ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन ठेपली आहे. संत तुकारामाची भूमिका वठवणाऱ्या चिन्मय मांडलेकर वर तसेच या भूमिकेवर अवघ्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केले म्हणूनच हि मालिका इतके भाग पूर्ण करू शकली यात शंका नाही. आता या मालिकेद्वारे कलर्स मराठीवर ऋजुता देशमुखची खूप वर्षांनंतर एन्ट्री होणार आहे. ऋजुता या मालिकेमध्ये आवलीची भूमिका साकारणार आहे.
‘तू माझा सांगाती ‘ या मालिकेमध्ये आवलीची भूमिका करणे तसे आव्हानात्मक आहे. तुकाराम हे स्वभावाने अगदी साधे, विठोबाच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून टाकलेले असे आणि अगदी त्याविरुध्द आवली… “आवली हि स्वभवाने स्पष्टव्यक्ती तसेच व्यवहारी अशी होती अश्याप्रकारची भूमिका निभावण हे खरच खूप आव्हानात्मक आहे पण मी या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे “, असे ऋजुता देशमुख म्हणाली. ऋजुता ‘सावर रे’ या मालिकेनंतर तब्बल तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ऋजुताला एका नव्या आणि वेगळ्याच भूमिकेत बघायला नक्कीच आवडेल यात शंका नाही.
तेंव्हा बघायला विसरू नका ‘तू माझा सांगाती ‘ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. कलर्स मराठीवर.