विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?
सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ सध्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची चर्चा होताना दिसते.
‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे. मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.
पाटलांच्या घरात कोणीतरी सुरुंग स्फोट घडवण्याचं कारस्थान करतं, पण आर्या मात्र ते कारस्थान हाणून पाडते आणि आर्या काहीतरी करणार असल्याचा अंदाज विराटला येतो. तो आणि पाटील कुटुंब तिच्यावर नजर ठेवू लागतं आणि आर्या घराबाहेर कशी पडणार हा प्रश्न निर्माण होतो. आर्या (वीणा जगताप) आता विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडणार का, हे येत्या रविवारी, ७ फेब्रुवारी, संध्या. ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या महाएपिसोड मधे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
सर्पसंकटातून ‘आर्या’ कशी वाचवेल स्वतःला? पहा सोनी मराठी वाहिनीवर
सोनी मराठी वाहिनीवरच्या ‘आई माझी काळुबाई’या मालिकेतली गोष्ट ही ‘आर्या‘ (विणा जगताप) ह्या मुख्य पात्राच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची आहे. या मालिकेत आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते. आपल्या भावाला, संकेतला शोधण्यासाठी म्हणून आर्या माधवराजेंची अट मान्य करून त्यांच्या मुलाशी, अमोघशी लग्न करते. पाटील घरात आल्यापासून आर्या तिच्या भावाचा म्हणजेच संकेतचा शोध घेताना वेगवेगळ्या जीवघेण्या संकटात सापडते,त्यापैकीच एक संकट म्हणजे विषारी सापाशी तिचा सामना होतो. आर्यावर आलेले हे सर्पसंकट नेमके कसे आले आणि कोणी घडवून आणले ,त्यातून आर्या कशी मार्ग काढते, त्यात तिला आई काळुबाईचा काय संकेत मिळतो. याची उत्कंठावर्धक गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
‘आई काळुबाई’ हे साताऱ्या जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असfलेलं देवस्थान आहे. या मालिकेचं चित्रीकरण साताऱ्यातच होत असल्यानं मालिकेला मातीतला अस्सलपणा आणि दृश्यश्रीमंती लाभली आहे. सोनी मराठी वाहिनीवर सोम.-शनि., संध्या. ७ वा. ही मालिका प्रदर्शित होते। सध्या मराठी प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद या मालिकेला लाभत आहे. मालिकेविषयी चर्चा सोशल मीडियावर सातत्याने होताना दिसते.
‘आई माझी काळुबाई’ मालिकेचे पन्नास भाग पूर्ण!
नुकतंच सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेचा पन्नासावा भाग प्रदर्शित झाला. या निमित्तानी सेटवर श्रीसत्यनारायणाची पूजा व देवी काळुबाईची पूजा केली होती. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी या पूजेमध्ये भक्तिभावानी सहभाग घेतला. शरद पोंक्षे, अलका कुबल-आठल्ये, विवेक सांगळे, वीणा जगताप, संग्राम साळवी, प्रसन्न केतकर अशी सर्व कलाकार मंडळी या पूजेसाठी आवर्जून उपस्थित होती.
मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. आत्तापर्यंत आलेल्या सर्व संकटांवर मात करून ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेची यशस्वी घोडदौड सुरू आहे. या पूजेदरम्यान सेटवर अतिशय मंगलमय आणि उत्साहाचं वातावरण होतं. सर्व टीमनी या पूजेचा आनंद घेतला आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन मालिकेच्या चित्रीकरणाला नव्या जोमानं सुरुवात केली. वीणा जगताप साकारत असलेल्या आर्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. मालिका आता अत्यंत रंजक वळणावर आली असून आर्याच्या आयुष्यात पुढे काय घडतं, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं असणार आहे.