वीणा जगताप आणि रुपाली भोसलेमध्ये रंगणार कॅप्टनसी टास्क
कलर्स मराठीवरील रिअलिटी शो ‘बिग बॉस २’ मधील वीकेंडचा डावमध्ये रुपाली आणि वीणाची चांगलीच शाळा घेतली गेली. यावरूनच वीणाने आपली खंत महेश मांजरेकरांजवळ व्यक्त केली, कारण वीणाला महेश मांजरेकर म्हणाले तू माझी फेव्हरेट सदस्य होती. काल घरामधून कोणीच बाहेर पडले नाही… रुपाली आणि माधव डेंजर झोनमध्ये आले असे सांगितल्यावर वीणा आणि नेहाला जरा टेंशन आले होते खरे पण, महेश मांजरेकर यांनी जेंव्हा जाहीर केले कि, या आठवड्यात सगळे सेफ आहेत तेंव्हा सगळ्यांनाच खुप आनंद झाला.

आज घरामध्ये रुपाली भोसले आणि वीणा जगतापमध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. घराचा कॅप्टन बनणे हि खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन बनलेल्या सदस्याला आठवड्याची इम्युनिटी देखील मिळते… त्यामुळे हा टास्क जिंकून कॅप्टन बनणे हे प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्वाचे असते… आता या टास्कमध्ये रुपाली आणि वीणा मध्ये कोण जिंकणार हे बघणे रंजक असणार आहे.
घरात आता महिलांची मेजोरिटी पहायला मिळतेय . ‘बिग बॉस’च्या घरामध्ये शिवानी सुर्वेची एन्ट्री झाल्यामुळे नेहा आणि माधवला आता धीर मिळाला आहे. तेव्हा येणाऱ्या काळात ‘बिग बॉस’ मधील हा खेळ अधिक होणार हे नक्की. रुपाली आणि वीणाला कोणा कोणाचा पाठींबा मिळणार? ते आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर पहायला मिळेल.