Tag Archives: Pravin Kshirsagar

‘इभ्रत’ मध्ये दिसणार ‘मल्हार-मायडी’ची तरल प्रेमकथा

या जगातली सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे ‘प्रेम’.  आजवर इतिहासात ज्यांनी ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलंसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो किंवा हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट असोत किंवा सोनी महिवाल. अशीच जगावेगळी जीव हेलावून टाकणारी मल्हार-मायडी ची प्रेमकथा आगामी ‘इभ्रत’ (Ibhrat) ह्या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Ibhrat Marathi Movie, Shilpa Thakre, Sanjay Shejwal
Ibhrat Marathi Movie, Shilpa Thakre, Sanjay Shejwal

तिकीटबारीवर गाजलेल्या रेडू आणि टकाटक या चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांनी ‘इभ्रत‘ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.   डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी इभ्रतच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत.

तरल आणि नितळ प्रेमाची गोष्ट सांगणारा  ‘इभ्रत’ २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.