Tag Archives: Suresh Dhage

अंधश्रद्धे मुळे बळी गेलेल्या मित्राची भावनीक गोष्ट म्हणजे ‘पिटर’

'Peter' Marathi Movie
‘Peter’ Marathi Movie

अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारा  ‘पिटर हा नविन मराठी चित्रपट २२ जानेवारी २०२१ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित  होणार आहे.   अमोल अरविंद भावे हे ह्या चित्रपटाचे  निर्मिते असून त्यानी आतापर्यंत ७ वेगवेगळ्या चित्रपटांचे लेखन , दिग्दर्शन केले असून जवळपास ४५ टीव्ही  मालिकांचे देखील दिग्दर्शन , लेखन केले आहे त्यांच्याबरोबर दिप्पांकर रामटेके आणी रोहनदीप सिंग हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत . चावंड गावच्या निसर्गरम्य गावात पिटर’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे . मनोरंजन करता करता अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारा हा भावनिक सिनेमा शेवटी प्रेक्षकांना सिनेमातून मांडलेल्या मुद्यावर विचार करायला लावेल अशी अमोल भावे यांना आशा आहे तेव्हा जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन हा चित्रपट पहावा .

या चित्रपटाला श्री गुरुनाथ श्री या संगीतकाराने  संगीत दिले असून गीत लेखनाची जबाबदारी रंगनाथ गजरे , विष्णू थोरे यांनी पार पाडली आहे. चित्रपटातील गाणी सई जोशी व ज्ञानेश्वर मेश्राम या गोड गळ्याच्या  गायकांनी गायली आहेत . चित्रपटाचे छायाचित्रण साऊथ चे प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर अमोश पुटीयाथील यांनी केले आहे .  प्रेम बोराडे सह ह्या चित्रपटात मनीषा भोर , सुरेश ढगे , अमोल पानसरे , विनिता संचेती , सिद्धेश सिध्देश्वर , शरद राजगुरू , प्रमेय वाबळे , उमेश पांढरे , मल्हारी ठिकेकर या कलाकारांनी काम केले आहे .