Saurabh Gokhale to appear as Sant Dnyaneshwar in ‘Tu Majha Sangati’
Having performed as Sant Dnyaneshwar in few episodes of past TV serial ‘Aawaz‘ which presented stories of popular saints from Maharashtra, popular stage, TV and film actor Saurabh Gokhale has got an opportunity to portray the same character once again through forthcoming episodes of ongoing TV serial ‘Tu Majha Sangati‘.
Speaking about this role, Saurabh said,”When I got an opportunity to play Sant Dnyaneshwar in the serial ‘Aawaz –Itihasatlya Soneri Panancha‘, it was the biggest challenge. But, I could perform this difficult task, only due to efforts taken by director Virendra Pradhan. And, the audience appreciated my performance. Now, to play the same character once again, is another big challenge for me.”
In ‘Tu Majha Sangati‘ the makers would like to present the situation, when Dnyaneshwar along with Nivrutti, Sopan & Muktabai visit Sant Gora Kumbhar, when he showed the way to Sant Namdev and his pride. This story can be heard from Sant Tukaram in the coming week from Monday to Saturday at 7.30 pm.
‘तू माझा सांगाती’ मालिकेत ऋजुता देशमुख साकारणार आवलीची भूमिका
संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत, मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ – संत तुकाराम. तुकोबांच्या अभंगवाणीने प्रत्येक मराठी मनात अभंग स्थान मिळवलं आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगाती ‘ मालिकेत रेखाटण्यात येत आहे. आठशेहून अधिक भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केलेली ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन ठेपली आहे. संत तुकारामाची भूमिका वठवणाऱ्या चिन्मय मांडलेकर वर तसेच या भूमिकेवर अवघ्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केले म्हणूनच हि मालिका इतके भाग पूर्ण करू शकली यात शंका नाही. आता या मालिकेद्वारे कलर्स मराठीवर ऋजुता देशमुखची खूप वर्षांनंतर एन्ट्री होणार आहे. ऋजुता या मालिकेमध्ये आवलीची भूमिका साकारणार आहे.
‘तू माझा सांगाती ‘ या मालिकेमध्ये आवलीची भूमिका करणे तसे आव्हानात्मक आहे. तुकाराम हे स्वभावाने अगदी साधे, विठोबाच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून टाकलेले असे आणि अगदी त्याविरुध्द आवली… “आवली हि स्वभवाने स्पष्टव्यक्ती तसेच व्यवहारी अशी होती अश्याप्रकारची भूमिका निभावण हे खरच खूप आव्हानात्मक आहे पण मी या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे “, असे ऋजुता देशमुख म्हणाली. ऋजुता ‘सावर रे’ या मालिकेनंतर तब्बल तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ऋजुताला एका नव्या आणि वेगळ्याच भूमिकेत बघायला नक्कीच आवडेल यात शंका नाही.
तेंव्हा बघायला विसरू नका ‘तू माझा सांगाती ‘ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. कलर्स मराठीवर.
‘तू माझा सांगती’ मध्ये एका नवीन अध्यायाची सुरुवात
कलर्स मराठी ह्या वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ या मालिकेत आत्तापर्यंत तुकोबांच्या घरातील, संसारातील विविध घटना आणि प्रसंगांचा वेध घेण्यात आला होता. मात्र विठ्ठलभक्तीत रममाण झालेले तुकोबा संतपदाला कसे पोहचणार आहेत, हे आता ‘तू माझा सांगाती’ मध्ये पाहता येणार आहे.
संतश्रेष्ठ तुकाराम हे केवळ वारकरी संप्रदायाचंच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राचं श्रद्धास्थान. ‘तू माझा सांगाती’ च्या रूपाने संत तुकारामांची जीवनगाथा प्रथमच मराठीत छोट्या पडद्यावर आणणारे; मालिकेचे निर्माते – दिग्दर्शक संगीत कुलकर्णी यांनी या मालिकेच्या निर्मिती मूल्यात कुठलीही तडजोड केली नसल्याचे सांगितले. तुकारामांची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने तुकाराम म्हणून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे . सर्वांकडून त्याच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे. आपण आजवर तुकोबांचे निस्सीम विठ्ठल प्रेम अनुभवले, पण आता त्यांच्या अपार भक्तीचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होणार आहे. कलर्स मराठी ह्या वाहिनीवर, सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वा. ह्या मालिकेचे प्रसारण करण्यात येते.