शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित नवी मालिका ‘योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar)’
शिरीष लाटकर लिखित “योगयोगेश्वर जय शंकर (Yogyogeshwar Jai Shankar)“ ही नवी मालिका कलर्स मराठीवर ३० मेपासून सुरू होत आहे. मैं कैलाश का रहने वाला हू,मेरा नाम है शंकर असं बोलत ज्यांनी अनेक पीडितांच्या दु:खांचे निवारण केले, ज्यांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे, महादेवाचा अंश जे आहेत, असे असंख्य भक्तांचे कैवारी, त्रिलोकी आहे ज्यांची कीर्ती संतवर्य योगीराज, सद्गुरू राजाधिराज ‘शंकर महाराज’. एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष शंकर महाराज यांच्या जीवनकार्यावर कलर्स मराठी घेऊन येत आहे.
या मालिकेमध्ये आरुष बेडेकर (Aarush Bedekar) हा बाल शंकर महाराजांची भूमिका साकारणार आहे. शंकर महाराज्यांच्या आईची भूमिका आपल्या सगळ्यांची लाडकी उमा पेंढारकर (Uma Pendharkar) साकारणार आहे. तर, वडिलांची (चिमणाजी) भूमिका अतुल आगलावे (Atul Aagalave) साकारणार आहेत.
वेश घेतला बावळा, अंतरी शुद्ध ज्ञानकळा ऐसा सदगुरू लाघवी, नाना रंगी जन खेळवी…शंकर महाराज यांचा बालपणापासून ते महानिर्वाणापर्यंतचा प्रवास ‘योगयोगेश्वर जय शंकर’ या मालिकेत बघायला मिळणार आहे. तेव्हा नक्की बघा सत्पुरुषाच्या मंगल चरित्राचा आरंभ – ३० मेपासून संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर.
आनंदी जोशी हिचा सुमधूर आवाजात ‘श्री सुक्तम’
भक्तांचा यंदाचा नवरात्रोत्सव होणार आहे अधिकच चैतन्यमय दुर्गा देवी व नवरात्रोत्सव स्त्री शक्तीचा एक जागरच मानला जातो. देवीची आराधना करण्यासाठी मंत्रांचे उच्चारण केले असता पावित्र्याची आणि मांगल्याची अनुभूती होते. मंत्रोच्चाराने मन प्रसन्न होते. ‘सुमन एन्टरटेन्मेंट आणि मिडिया प्रा. लि’, प्रस्तुत ‘श्री सुक्तम’ हा मंगलमय मंत्र व्हीडीयो रूपात भक्तांच्या भेटीला आला आहे. विविध मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री उमा पेंढारकर ‘श्री सुक्तम’ हा मंत्र म्हणत देवीची उपासना करताना दिसत आहे.
भारतीय पुराणात मंत्र परंपरा हजारो वर्षांपूर्वीची आहे. ‘श्री सुक्तम’ या मंत्राला चिनार-महेश यांनी संगीत दिले असून आनंदी जोशी हिचा सुमधूर आवाज लाभला आहे. मंत्रांचे उच्चारण केल्याने तयार होणाऱ्या ध्वनी लहरींमुळे आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. लवकरच सगळीकडे देवीचे आगमन होणार असून तिच्या आगमनाने चैतन्यमय झालेले वातावरण ‘श्री सुक्तम’ च्या मंत्रोच्चाराने अधिकच उत्साहवर्धक होणार आहे.