Tag Archives: Urmila Dhangar

एक्सप्रेशन क्वीन माधुरी पवार म्हणतेय ‘या बया दाजी आलं’

आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार ‘या बया दाजी आलं’ (Ya Baya Daji Ale)  म्हणतं तमाम दाजीना घायाळ करायला सज्ज झाली आहे. भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत आगामी बहुचर्चित ‘इर्सल (Irsal)’ या मराठी चित्रपटात माधुरी पवारची ही नखरेल अदाकारी बघायला मिळणार आहे.  ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे.

Madhuri Pawar, Actress, Dancer in  Marathi film 'Irsal'
Madhuri Pawar, Actress, Dancer in Marathi film ‘Irsal’

‘इर्सल (Irsal)’ चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. ‘इर्सल’चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे.  बहुचर्चित ‘इर्सल’ येत्या ३ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.