Tag Archives: Vrushabh Shah

प्रेमाची अनोखी केमिस्ट्री सांगणारा ‘वन फोर थ्री’ ४ मार्चला सिनेमागृहात

अलीकडे सर्व काही रुळावर येऊ लागले असताना, पुन्हा एकदा कोरोनाने त्याचे स्वरूप बदलले आहे आणि त्यात ओमिक्रॉनमुळे पुन्हा नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईवर परिणाम दिसू लागला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या जात आहेत.

'143' Marathi movie, Sheetal Ahirrao
‘143’ Marathi movie, Sheetal Ahirrao

प्रेमाची अनोखी परिभाषा प्रेक्षकांसमोर घेऊन येण्यास ‘शारदा फिल्म्स प्रॉडक्शन’ निर्मित आणि  विरकुमार शहा निर्मित ‘वन फोर थ्री’ हा खऱ्याखुऱ्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट ४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रेक्षक मायबाप ही आमच काळीज आहे! होय! आणि या काळजाच्या काळजीपोटीच सध्याचा कोविड संसर्ग आणि निर्बंधांमुळे आपल्या सर्वांच्या काळजाजवळची मराठी प्रेमकथा ११  फेब्रुवारी ऐवजी पुढे नेत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटांची धाटणी असलेला हा मराठीतील पहिला वहिला चित्रपट असून बॉलिवूडने देखील या चित्रपटाची दखल घेतली होती, इतकेच नव्हे तर करेन तर मामाचीच, हे आपलं काळीज हाय या टॅगलाईनसुद्धा प्रेक्षकांकडून सतत ऐकायला मिळत होत्या मात्र हा चित्रपट ११ फेब्रुवारी ऐवजी ४मार्चला प्रदर्शित होणार असल्याने प्रेक्षकांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

या चित्रपटात अभिनेता योगेश भोसले आणि शीतल अहिरराव यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. तर अभिनेता वृषभ शहा या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत दमदार असे पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम यांनी संगीतबध्द केले आहे. तर नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार हे या चित्रपटात नृत्य दिग्दर्शकाची भूमिका बजावत आहेत. विशेष म्हणजे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नामांकित असलेले नृत्य दिग्दर्शक आर. कलाई कुमार यांनी प्रथमच मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाकरिता काम केले आहे. तर छायाचित्रकार विकास सिंग यांनी या चित्रपटात उत्तम चित्रीकरण चितारले आहे. चित्रपट प्रदर्शनात वितरकाचीही मुख्य भूमिका असते, या चित्रपटात अनिल थडाणी यांनी वितरकाची भूमिका अगदी योग्यरित्या निभावली आहे.

‘Ambe Maa’ song to release timely for Navratri Festival

Every song has its timing for release to attain popularity. Keeping this mind, Pickle Music have brought a new song for the enthusiastic Marathi song lovers which coincides with the divine arrival of Navratri Festival. This song video is directed by Yogesh Bhosale, who has presented this song which is pictured  on Vrushabh Shah and Ankita Raut, two rising artists in the Marathi entertainment world.

 Filmed in a scenic and luxurious zone in the Wakad area of Pune, it has been performed by more than a hundred dancers and artists along with Vrushabh and Ankita. The song is written by Murad Tamboli and Shankaram has sung it and composed the music. Chini Chetan, Sagar Bhondwe have choreographed the song.

Ambe Maa, Marathi Garba Song, Ankita Raut
Ambe Maa, Marathi Garba Song, Ankita Raut

Speaking about this song director Yogesh feels that this song is a mixture of devotion to Mother Ambe and the joy of the devotees. According to him, apart from fun and entertainment, this song also sets out to generate devotion to the glory and power of Ambe Mata and makes everyone, including the youth, dance joyfully to its tunes.

‘पेठ’ – आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा आगामी  चित्रपट

अनेक वेगळ्या धाटणीचे सिनेमे मराठीत येत आहेत.  प्रेमासाठी  सगळी बंधने झुगारत, आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा असाच एक वेगळा  ‘पेठ’ या आगामी  चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘शारदा फिल्म प्रोडक्शन’ ची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ’ चित्रपटाचे निर्माते श्री. विरकुमार शहा तर दिग्दर्शक अभिजीत साठे आहेत.

Vrushabh Shah, Namrata Ranpise, Meghrajraje Bhosale and Team 'Peth'
Vrushabh Shah, Namrata Ranpise, Meghrajraje Bhosale and Team ‘Peth’

वेगवेगळ्या जॉनरची पाच गाणी या चित्रपटात आहेत. या गाण्यांना पी.शंकरम यांच्या संगीताची साथ लाभली आहे. समाजातील दोन भिन्न वर्गातल्या प्रेमवीरांची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल असे मत दिग्दर्शक अभिजीत साठे यांनी व्यक्त केले.

वृषभ शहा आणि नम्रता रणपिसे ही नवी जोडी ‘पेठ’ या चित्रपटाचा निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. यासोबत निशिगंधा वाड, महेशदादा देवकाते, सायली शिंदे, अभिषेक शिंदे, विशाल टेके, सुरज देसाई, विकास कोकरे, महेश पांडे, प्रियांका उबाळे, रुक्सार परवीन, अस्मिता पन्हाळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचे लेखन, पटकथा, संवाद तसेच कलादिग्दर्शन अभिजीत साठे यांचे आहे.  नेत्रसुखद आणि सुश्राव्य संगीताने नटलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या  संगीत अनावरण सोहळ्यात विशेष उपस्थिती ठरली ती सुरेल गायिका कार्तिकी गायकवाड हिची. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक प्रकाश धींडले यांनी केले.