बिग बॉस मराठी २ च्या नवीन प्रोमो मध्ये महेश मांजरेकर दिसणार मराठमोळ्या अंदाजात !!!

लवकरच सुरु होणाऱ्या बिग बॉस मराठीच्या सीझन २ च्या प्रोमोला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला ज्यामध्ये महेश मांजरेकर एका राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसले… आता अजून एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे आणि या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर अस्सल मराठमोळा अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Mahesh Manjrekar
Mahesh Manjrekar, Bigg Boss season 2

प्रोमो एका चित्रपटामधील क्लिप सारखा दिसत आहे ज्यामध्ये सुंदर लावणी सादर होताना दिसत आहे… हे वाचल्यावर, कोणी या कलेशी संबधीत व्यक्ती तर बिग बॉस मराठीच्या घरात जाणार नाही ना ? हा प्रश्न प्रेक्षकांना पडू शकतो.

अजून जाणून घेण्यसाठी बघत रहा कलर्स मराठी !!!