‘जगा वेगळी अंतयात्रा’ चित्रपट आज पासून सर्वत्र प्रदर्शित

Marathi movie 'Jaga Vegali Antyatra' still
Bhau Kadam, Suprit Kadam, Vinamra Bhabal, Omkar Purohit, Dr Vishal Gore, Marathi movie ‘Jaga Vegali Antyatra’

चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमाद्वारे, आपल्या विशेष विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे भाऊ कदम ह्यांची मुख्य भूमिका असलेला ‘जगा वेगळी अंतयात्रा‘ हा मराठी चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. या चित्रपटात स्ट्रगलर्ससाठी भाऊ हे स्टगलर्सना मार्गदर्शन करतांना दिसणार आहेत .

इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट असे उच्चशिक्षित असून नोकरीसाठी स्ट्रगल करणाऱ्या चार तरुणांची गोष्ट या चित्रपटात उलगडली आहे. सुशिक्षित बेकारीच्या यक्षप्रश्नावर हे तरूण, नंदू काका (भाऊ कदम ) ह्यांच्या मदतीने कशा पद्धतीनं मार्ग काढतात हे आपण ह्या चित्रपट पाहायला मिळणार आहे.

डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा.ली. या निर्मिती संस्थेने ‘जगा वेगळी अंतयात्रा‘ चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमोल लहांडे यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता भाऊ कदम, माधव अभ्यंकर, राजन भिसे, सुहास परांजपे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसह सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे या नव्या दमाच्या कलाकारांनी चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत. रोहन रोहन या आजच्या पिढीच्या संगीतकारद्वयीनं चित्रपटाचं संगीत केलं आहे. चित्रपटाचं शीर्षक जरी गंभीर वाटलं, तरी हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार आहे.

Leave a Reply