प्रेमाची ‘रॉमकॉम’ गोष्ट लवकरच येणार पडद्यावर

Marathi Movie 'RomCom' Muhurat
Marathi Movie ‘RomCom’ Muhurat

वेगळ्या पद्धतीनं प्रेमाचा शोध घेणारा, ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट निर्मित आणि गोरख जोगदंडे दिग्दर्शित ‘रॉमकॉम’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा मुहूर्त दिमाखात करण्यात आला.

‘रॉमकॉम’ या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. चित्रपटांसाठी वेडा असलेला राहुल आणि सुसंस्कृत घरातली सुमन यांच्यातलं प्रेम यशस्वी होतं का,  सुमनला मिळवण्यासाठी राहुलला काय काय करावं लागत हे मनोरंजक आणि धमाल पद्धतीनं या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत करंजकर ह्यांनी केले असून साजन पटेल ह्यांनी  संगीत दिग्दर्शन केले आहे . ‘रॉमकॉम’ ह्या चित्रपटात किशोर कदम, छाया कदम, अशोक शिंदे, स्वाती पानसरे, मिलिंद गवळी, मृदुला वैभव ह्यां कलाकारांनी काम केले आहे. युवा अभिनेता सारंग दोशी आणि मधुरा वैद्य ही जोडी या चित्रपटाद्वारे पदार्पण करते आहे.

Leave a Reply