मोनालिसा बागल दिसणार ‘गस्त’ या सिनेमात

Actress Monalisa Bagal
Actress Monalisa Bagal

छोट्या परड्यापासून आपल्या अभिनयाची सुवरात करात आता मोनालिसा आपल्याला  मोठ्या पडद्यावर अनेक चित्रपटांमधे आपल्या अभिनयने प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसतेय। ‘टोटल हुबलक ‘ ह्या मालिकेत आपण तिला पाहिले,  सौ शशी देवधर , झाला बोभाटा, प्रेम संकट, परफ्यूम  आणि ड्राय डे ह्या चित्रपटांनंतर, आता  अभिनेत्री मोनालिसा बागल झी टॉकीज प्रस्तुत गस्त ह्या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

मोनालिसाने  ‘सुजाता’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. तिच्यासोबत सैराट फेम अभिनेता तानाजी गालगुंडे देखील सिनेमात दिसणार आहे. मोनालिसाचा नवा सिनेमा, या सिनेमाची नवीन जोडी, नवी गोष्ट यामुळे सिनेमाप्रती प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे आणि त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया देखील कळवल्या आहेत.

येत्या २८ फेब्रुवारीला दु. १२ आणि संध्या. ६ वाजता  झी टॉकीजवर हा सिनेमा प्रदर्शित होत आहेत .