‘शिकारी’ नंतर नेहा खान आता ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर

बॉलिवूड चे बोल्डनेस आणि हॉटनेस मराठी चित्रपटसृष्टीला दाखवणारी ‘शिकारी’ फेम अभिनेत्री नेहा खान ही तिच्या चित्रपटामुळे  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली . प्रेक्षक बॉलिवूड मध्ये दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे पाहू शकतात तर आपल्या भाषेतील सुद्धा पाहू शकतील आणि असा सिनेमा भरपूर प्रेक्षक ही जमवू शकेल असा विचारही आधी कोणी केला नव्हता .  मात्र नेहा खान नावाचं एक झंझावाती सौंदर्याने आणि अभिनयाने भरलेलं वादळ  ‘शिकारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला दिलं आणि मराठी तरुण प्रेक्षकांनी ते अंगवळणी ही करून घेतलं.

'Shikari' fame Neha Khan, actress - dancer
‘Shikari’ fame Neha Khan, actress – dancer

झी युवावर वरील युवा डान्सिंग क्वीन  या सेलेब्रिटी डान्सिंग  रिऍलिटी कार्यक्रमाद्वारे नेहा खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेयावेळी ती  शिकार करणार आहे तिच्या नृत्यातील अदांनी.  तिच्या सौंदर्याचा महाराष्टात भरपूर फॅन फॉलोवर आहे . आता ती डान्स या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना ती किती टॅलेंटेड आहे  ह्याचं ही दर्शन देणार  आहे .  

झी युवा वाहिनीवर, बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होतो.