महिला दिनानिमित्त झी टॉकीजची स्त्री शक्तीला विशेष मानवंदना
८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो, महिला दिनानिमित्त महिला प्रेक्षकांना झी टॉकीज वाहिनी विशेष भेट देणार आहे . महिलांच्या आयुष्यावरील पाच विशेष चित्रपटांचा नजराणा झी टॉकीज प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. शुक्रवार, ८ मार्च रोजी, झी टॉकीजवर, दिवसभर हे चित्रपट पाहायला मिळतील. महिला सक्षमीकरण, त्यांची समाजातील स्थिती, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अशा विषयांवर आधारित चित्रपटांचा यात समावेश असेल. ‘मला आई व्हायचंय‘, ‘फॉरेनची पाटलीण‘, ‘माहेरची साडी‘, ‘तानी‘ या चित्रपटांसह ‘मोकळा श्वास‘ हा सिनेमा पाहण्याचीदेखील संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
‘मोकळा श्वास‘ या चित्रपटात आजच्या पुढारलेल्या काळातही, ‘मुलगी नकोच , फक्त मुलगा हवा ‘ ही एका कुटुंबाची मानसिकता दाखवली आहे . सहकुटुंब आनंद घेता येईल असे चित्रपट, हीच झी टॉकीजची खासियत ठरते. त्या बरोबर ‘जिद्दीने उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलीची कथा असलेला ‘तानी’, जुन्या काळात नेऊन ठेवणारा ‘माहेरची साडी’, प्रेमाखातर खेड्यातील भारतीय संस्कृतीशी एकरूप होणारी परदेशी स्त्री दर्शवणारा ‘फॉरेनची पाटलीण‘, परदेशी दाम्पत्यासाठी सरोगेट आई झालेल्या महिलेचं भावविश्व दाखवणारा ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटांचाही ‘महिला दिन विशेष’ यादीत समावेश आहे.