बिगबजेट, धमाल, मनोरंजक ‘ये रे ये रे पैसा २’ चा ट्रेलर लाँच
अमेय विनोद खोपकर प्रस्तुत आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाचा दमदार ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. कर्ज बुडवून पळून गेलेला उद्योजक आणि त्याचा शोध घेणाऱ्या अण्णा आणि त्याचे अतरंगी साथीदार यांची गोष्ट ‘ये रे ये रे पैसा २’ मध्ये पहायला मिळणार असल्याचं या ट्रेलरमधून दिसतं. आजपर्यंत मराठी चित्रपटात न दिसलेली भव्यता आणि चकचकीतपणाही या चित्रपटात आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखीच वाढलं आहे.
‘ये रे ये रे पैसा २’ या चित्रपटात अभिनेते संजय नार्वेकर, प्रियदर्शन जाधव, अनिकेत विश्वासराव, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी गोडबोले, विशाखा सुभेदार, स्मिता गोंदकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. संजय मेमाणे यांनी छायांकन, फैजल इमरान यांनी संकलन, ट्रॉय आरिफ यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत, सुनील नवले यांनी रंगभूषा, सचिन लोवलेकर यांनी वेशभूषा, राहुल-संजीव यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
लंडननध्ये चित्रीकरण, धडाकेबाज अॅक्शन सिक्वेन्स, उच्च निर्मितीमूल्य, तगडी स्टारकास्ट आणि खटकेबाज संवाद… हे सगळं मराठी प्रेक्षकांना येत्या ९ ऑगस्ट रोजी ‘ये रे ये रे पैसा २’ ह्या चित्रपटात पहायला मिळणार आहे.