“वंजर” सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज
झाडे लावा, झाडे जगवा असा उदोउदो आपण करत असलो तरी त्यासाठी आपण स्वतः त्यासाठी एक पाऊल उचलणे महत्वाचे ठरते. अशाच आशयाचा ‘वंजर‘ सिनेमा विद्या गवई दिग्दर्शित लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. आसरा फिल्म प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे मोशन पोस्टर विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपट सुरू होण्याआधीच सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे.
या सिनेमाच्या मोशन पोस्टरमध्ये निसर्ग ही आपली देणगी आहे आणि ती नष्ट करण्याचा आपल्याला काहीच अधिकार नाही, असा संदेश देण्यात आला आहे. लवकरच सिनेमातील कलाकारांची घोषणा करण्यात येणार आहे. कथा,पटकथा विद्या गवई यांची असून, सवांद आणि प्रमुख सहाय्यक मनोज सोनवणे असून सिनेमाच्या निर्मिती प्रमुखाची सूत्र रंगराव घागरे सांभाळत आहेत.
नागराज मंजुळे दिग्दर्शित करणार ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’चा प्रोमो
झी टॉकीजच्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग‘चे आयोजन करण्यात आले आहे. या लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या बालेवाडीत रंगणार आहे. या बहुचर्चित ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ बरोबर सुरवातीपासूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज नावे जोडली जात आहेत .त्यातीलचं एक महत्वाचे नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे.
‘पिस्तुल्या‘, ‘फँड्री‘ व ‘सैराट‘ यासारख्या चित्रपटातून आपले सामाजिक भान दाखवून देणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहेत आणि मुख्य म्हणजे यात ते अभिनय सुद्धा करणार आहेत.
पैलवानांनी शड्डू ठोकल्यापासून चितपट करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाढणारी ही उत्कंठा ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग‘मुळे आता साऱ्या महाराष्ट्राला लागून राहिली आहे. नागराज मंजुळे ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ चा हा थरार प्रोमोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणार आहेत. या प्रोमोबद्दल नागराज मंजुळे यांनी सांगितले की,” घरात बसून छोट्या पडद्यावर क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणारा कुस्ती हा खेळ पाहण्याची मजा काही औरच असेल. ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’शी संलग्न होऊन त्याचा प्रोमो दिग्दर्शित करताना मला खरंच खूप आनंद होत आहे. माझ्या कामावर आजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केले आहे आणि त्यांना हा प्रोमोसुद्धा आवडेल अशी आशा व्यक्त करतो “
प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर -प्रेमवारी
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं‘, प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका नव्या रुपात मोठ्या पडद्यावर सादर होत आहे. सैमामित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘प्रेमवारी‘ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या आगामी सिनेमाबाबत आणखीन काही माहिती हाती आली नसली तरी, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने गीत दिले असल्याचे समजते. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सध्या सुरुवात झाली असून, अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील वारी गावात या सिनेमाचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. या शुभारंभ कार्यक्रमात कोपरगावचे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, अहमदनगरचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनीरचे डिरेक्टर सुनील दादा कोल्हे, शिर्डी नगराध्यक्ष अभय भैय्या शेळके आणि शिर्डी संस्थान सदस्य सचिंत तांबे आदी. मान्यवर उपस्थित होते.
एक सुंदर प्रेमकथा घेऊन येणाऱ्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, निर्माते आणि प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे. या सिनेमातील प्रमुख कलाकारांबाबत तूर्तास मौन बाळगण्यात आले आहे. ‘प्रेमवारी‘ हा चित्रपट प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर घडवून आणण्यास लवकरच येत आहे.
‘बापमाणूस’ मालिकेला प्रेक्षकांची पसंती.
‘बापमाणूस‘ या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. घरातील बापमाणसाची सत्ता आणि मान मिळवण्यासाठी चाललेल्या राजकारणावर आधारित या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ‘बापमाणूस‘ मालिकेने नुकताच २०० भागांचा यशस्वी टप्पा गाठला. नुकतेच प्रेक्षकांनी मालिकेत पहिले कि दादासाहेबांच्या जागेवर विराजमान होत आईसाहेबांना आता सर्व सूत्र स्वतःच्या हाती घेतली आहेत .
सध्या ‘बापमाणूस‘ मालिकेत एक अनोखे वळण प्रेक्षकांनी पहिले. शालू चा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आल्यानंतर शब्बीर आणि गीताला सन्मानाने वाड्यात आणल जाते. गीता त्यासाठी सूर्याचे आभार मानते. गीता वाड्यात नसताना घर किती सुनं वाटायचं आणि तिची खूप आठवण येत असल्याची कबुली सूर्या गीताला देतो. पण आईसाहेब हे ऐकतात आणि सगळ्यांसमोर सूर्या आणि गीताच्या लग्नाची घोषणा करतात . रमाकांत ला आईसाहेबांनि परस्पर घेतलेला निर्णय आवडत नाही आणि म्हणून तो आईसाहेबांना हे लग्न करू नका असे मानवण्याचा प्रयत्न करतो . वाड्यात सूर्या आणि गीताच्या लग्नाची तयारी सुरु होते. गीताला मेहंदी लावायच्या क्षणी आईसाहेब भावुक होतात आणि खोलीत दादासाहेबांच्या जुन्या वस्तू काढून बसतात तिथे येते आणि त्यांना सांभाळते . गीताला दादासाहेबांची डायरी सापडते ती वाचते दोघी भावुक होतात . आमचा निशावर संशय आहे हे लिहिलेलं पान वाचायचं राहत .
‘शुभ लग्न सावधान’ १२ ऑक्टोबरला प्रदर्शित.
फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान‘ हा लग्नसमारोहवर आधारित असलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच मुख्य पोस्टर लाँच करण्यात आले. या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध भावे आणि श्रुती मराठे या मराठीच्या प्रसिद्ध कलाकारांची केमिस्ट्री पाहायला मिळते. शिवाय दुबईतील विहंगम दृश्यदेखील या सिनेमाच्या पोस्टरवर आपल्याला पाहायला मिळते. पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात, डॉ. गिरीश ओक, निर्मिती सावंत ,विद्याधर जोशी ,किशोरी आंबिये यांचीदेखील महत्वपूर्ण भूमिका आहे. १२ ऑक्टोबरला प्रदर्शित होणारा हा सिनेमा विवाहोत्सुकांसाठी खूप खास ठरणार आहे.
‘बॉईज’ या चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
सर्व तरुण प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळालेला मराठी चित्रपट ‘बॉईज‘ या चित्रपटाचा सिक्वेल ‘बॉईज २‘ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्याच धम्माल मस्तीचा धुमाकूळ घेऊन येणारा हा चित्रपट , येत्या ५ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करण्यास येत आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँच करण्यात आला. इरॉस इंटरनेशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शन अंतर्गत ‘बॉईज २‘ चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनीच केले आहे.
किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या सुपरहिट ‘बॉईज ‘ च्या दुसऱ्या भागात कोणकोणते कलाकार असणार आहेत, हे अद्याप समजू शकले नसले तरी, सिनेमाच्या टीझर पोस्टरवरून हा सिनेमादेखील कम्प्लीट युथ इंटरटेनिंग असल्याचे लक्षात येते इतकेच नव्हे तर, ऋषिकेश कोळी यांनी या सिनेमाचे संवाद आणि पटकथा लिहिले असल्यामुळे, यापूर्वीच्या चित्रपटातल्या शाब्दिक कोट्यांची मज्जा ‘बॉईज २‘ या सिनेमांतदेखील प्रेक्षकांना पुरेपूर लुटता येणार आहे.
फ्लोरा सैनीचे ‘परी हूँ मैं’ मधून मराठी चित्रपटात पदार्पण
फ्लोरा सैनी या चित्रपटात एका सिने अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे, तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात तेलगु चित्रपटातून केली, त्यानंतर तमिळ, कन्नड, पंजाबी आणि हिंदी भाषेत ५० हून अधिक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लव्ह इन नेपाल’, ‘दबंग २’, ‘बेगमजान’, ‘धनक’ आदी हिंदी चित्रपटातील फ्लोराच्या भूमिका विशेष गाजल्या. दिघे कुटुंब आणि टीव्ही मालिका, रियालीटी शो भोवती फिरणाऱ्या अत्यंत मनोरंजक अशा ‘परी हूँ मैं‘ मध्ये फ्लोरा सैनीसह अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, बालकलाकार श्रुती निगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
उर्जा, पोर्ट, रिअल इस्टेट, निर्यात, टाउनशीप आदी क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या योगायतन ग्रुपचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला सिंह यांनी ‘परी हूं मैं‘ ची निर्मिती केली असून रोहित शिलवंत या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटाची कथा इरावती कर्णिक यांची असून संगीत समीर सप्तीसकर यांचे आहे.
टीव्हीच्या छोट्या पडद्याने सामान्य माणसाचे जीवन व्यापून टाकले आहे, याच ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडविणारा ‘परी हूँ मैं‘ हा मराठी चित्रपट येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
स्मिता पाटीलची भाची झिल पाटील चे मराठी सिनेमात पदार्पण !
आपल्या संवेदनशील अभिनयाने मंत्रमुग्ध करणाऱ्या स्मिता पाटीलच्या भाचीचे म्हणजेच खान्देश कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या झिल पाटीलचे मराठी सिनेमात पदार्पण होते आहे, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या मराठी सिनेमातुन झिल पदार्पण करत असून, या सिनेमात तिचा नायक थ्री इडियटमधील सेंटीमीटर अर्थात दुष्यंत वाघ आहे. झिल ही स्मिता पाटील यांची दूरच्या नात्याने भाची असून ती नंदुरबार जिल्यातील शहादा येथील राहणारी आहे.
ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित, अखिल देसाई दिग्दर्शित शिष्यवृत्ती या सिनेमात झिल पाटील, सीमा नावाच्या महिला शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. सिनेमात येण्याबद्दल झिल सांगते की, माझा जन्म खेडेगावात झाला त्यामुळे मला शेतीची आवड आहे, म्हणूनच माझे शिक्षण देखील बीएससी ऍग्री मध्येच झाले आहे. चित्रपट दिग्दर्शक अखिल देसाई यांच्याशी ओळख झाली आणि त्यांनी मला पाहताच माझी निवड केली, या सिनेमात माझ्या सोबत दुष्यंत वाघ आणि कमलेश सावंत, उदय सबनीस, अनिकेत केळकर, अंशुमन विचारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचे चित्रीकरण सध्या शहापूर मध्ये सुरू असून लवकरच सिनेमा प्रदर्शित होणार आह.
‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ मालिकेमध्ये श्रीकांत खेळणार नवी खेळी
‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ मालिकेमध्ये काही दिवसांपासून बऱ्याच घटना घडत आहेत. लक्ष्मी मल्हारच्याच घरी रहात असून तिने ते घर सोडण्यास नकार दिला आहे. परंतु त्यामागचे कारण अजूनही मल्हारला माहिती नाहीये. आर्वीसमोर अजूनही लक्ष्मी आणि मल्हारच्या लग्नाचे सत्य आलेले नाही. लक्ष्मीच्या जाण्याने श्रीकांत खूपच अस्वस्थ झाला आहे. त्यांचा सगळा पैसा, वैभव हळूहळू निघू जात आहे याची कल्पना त्याला आली आहे. लक्ष्मी श्रीकांत म्हणजेच त्यांच्या घरासाठी आणि गावासाठी शुभ होती आणि ती गेल्यापासूनच ही सगळी संकंट येत आहेत याची जाणीव झाल्याने श्रीकांत लक्ष्मीला शोधण्यासाठी बाहेर पडला आहे. हा जुना गडी म्हणजेच श्रीकांत लक्ष्मीला भेटल्यावर कोणती नवी खेळी खेळणार हे बघणे रंजक असणार आहे.
‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ या मालिकेत लक्ष्मीचं मल्हारवरचं प्रेम नि:स्वार्थी असून त्याच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये म्हणून लक्ष्मी घर सोडून जाण्यास नकार देत आहे. आर्वीने देखील लक्ष्मीने मागितलेले वचन तिला दिले असून आता लक्ष्मी मल्हारचे घर सोडून जाणार नाही हे तर नक्की आहे . हे सगळे होत असतानाच मल्हारच्या भावाचे लक्ष्मीवर एक तर्फी प्रेम असून तो त्याच्या प्रेमाची कबुली लवकरच देणार आहे. यावर मल्हारचे काय मत असेल ? लक्ष्मी यावर काय बोलणार ? हे जाणून घ्या ‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ मालिकेत.
सुबोध भावे लिखित ‘पुष्पक विमान’ येत्या ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला
वर्षाच्या सुरुवातीला ह्या वर्षात ये रे ये रे पैसा, गुलाबजाम आणि न्यूड सारखे चित्रपट देणाऱ्या झी स्टुडिओज् ची प्रस्तुती असलेल्या सुबोध भावे लिखित आणि वैभव चिंचाळकर दिग्दर्शित चित्रपट ‘पुष्पक विमान‘, ३ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि मोहन जोशी हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री गौरी किरण या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत हे विशेष. या चित्रपटाची पत्रकार परिषद नुकतीच पुण्यात पार पडली यावेळी चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओज् चे शारिक पटेल, मंगेश कुलकर्णी उपस्थित होते.
मंजिरी सुबोध भावे, अरुण जोशी, मीनल श्रीपत इंदुलकर, सुनिल फडतरे आणि वर्षा पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. चित्रपटातील संवाद आणि पटकथा चेतन सैंदाणे यांचे असून, कथा सुबोध भावे यांची आहे. पटकथा व दिग्दर्शन वैभव रा. चिंचाळकर यांचे आहे. चित्रपटाचं संकलन केलंय आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले सहाय यांनी. संतोष फुटाणे यांचे कला दिग्दर्शन असून चित्रपटाला संतोष मुळेकरयांचे पार्श्वसंगीत आहे. नरेंद्र भिडे आणि संतोष मुळेकर यांची संगीतबद्ध केली असून शौनक अभिषेकी, आनंद भाटे, जयतीर्थ मेवुंडी, विनय मांडके आणिनकाश अझीझ यांनी स्वरबद्ध केली आहेत तर समीर सामंत आणि चेतन सैंदाणे यांनी शब्दबद्ध केली आहेत. कार्यकारी निर्मात्याची धुरा रत्नकांत जगताप यांनी सांभाळली आहे.