Tag Archives: Indian Idol Marathi

आळंदीच्या चैतन्य देवढेला मिळाली पार्श्वगायनाची संधी!

Chaitanya Devadhe, Singer Indian Idol Marathi
Chaitanya Devadhe, Singer Indian Idol Marathi
‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमात महाराष्ट्राला टॉप १० स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी त्यांच्यात आता सुरांची टक्कर होतांना बघायला मिळते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे आळंदीचा चैतन्य देवढे (Chaitanya Devadhe).  ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ हे तंतोतंत लागू पडणारा चैतन्य आयडलच्या मंचावर ‘माउली’ म्हणून लोकप्रिय आहे. इंडियन आयडल हा मंच स्वप्नपूर्तीचा आहे. चैतन्यला आता  पार्श्वगायक  होण्याची संधी मिळणार आहे.

Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi
Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi
गोड गळ्याचा चैतन्य ऑडिशन राउंडपासून परीक्षकांची मनं जिंकतो आहे. त्याच्या खेळकर स्वभावाने त्याने प्रतिस्पर्धी स्पर्धकांनाही अल्पावधीतच आपलेसे केले. तिथून ते टॉप १० पर्यंत चैतन्यने गाण्याच्या आणि आवाजाच्या साथीने परीक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलंय. माउलींचा आशीर्वाद, घरून अर्थातच बाबांकडून लाभलेला सांगीतिक वारसा आणि मेहनत या सगळयांच्या साथीने ‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता होण्यासाठी चैतन्य जिद्दीने रियाज करतोय.

‘इंडियन आयडल मराठी’ या मंचावर येणार गायिका साधना सरगम

Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi
Ajay Atul, Sadhana Sargam in Indian Idol Marathi

दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम , सोनी मराठी वाहिनीवर ‘इंडियन आयडल मराठी’ ह्या कार्यक्रमाच्या यंदाच्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे.  या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला ‘इंडियन आयडल मराठी’चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे

१९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘विधाता’ या चित्रपटातली ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन साधना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी आत्तापर्यंत ३४ भाषांमध्ये १५ हजारांहून अधिक गाणी गायली आहे. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’ या गीताने ९० च्या दशकात धूम केली होती. हे गीत गाणाऱ्या साधना सरगम यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत. ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्यांतून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या साधनाने तब्बल ३४ भाषांत गीतं गायली. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहमानपर्यंत प्रत्येकानी त्यांचं कौतुक केलं. उदित नारायण यांच्याबरोबर ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातलं गाजलेलं गाणं ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम या ‘इंडियन आयडल मराठी’ या मंचावर स्पर्धकांचं मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.