Category Archives: Television

शेमारू मराठीबाणावर ‘गर्लफ्रेंड’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

yatin-karyekar-amey-wagh-sai-tamhankar-kavita-lad-girlfriend
‘व्हॅलेंटाईन्स डे’ 
निमित्ताने शेमारू मराठीबाणावर रोमँटिक चित्रपटांची जंगी मेजवानी सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात प्रमुख आकर्षण आहे सई ताम्हणकर आणि अमेय वाघ यांच्या अभिनयाने सजलेल्या ‘गर्लफ्रेंड’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर! १४ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता तुमच्या भेटीला येणार ‘गर्लफ्रेंड फक्त शेमारू मराठीबाणा या चित्रपट वाहिनीवर! प्यारवाली लव्ह स्टोरी‘, बस स्टॉप, फोटोकॉपी‘, यंटम, ‘लग्न मुबारक‘, मितवा‘ आणि अशा अनेक मनोरंजक चित्रपटांचा आनंद सहकुटुंब घेता येणार आहे.

Amey Wagh, Sai Tamhankar in Marathi film 'GirlFriend'
Amey Wagh, Sai Tamhankar in Marathi film ‘GirlFriend’

गर्लफ्रेंड मिळवण्याच्या बाबतीत कमनशिबी ठरलेल्या नचिकेतच्या आयुष्यात गर्लफ्रेंड नसणे हा सर्वात ऐरणीचा मुद्दा ठरलाय. यावर तो एक नामी युक्ती करतोअलिशा नावाची सुंदर तरुणी आपली गर्लफ्रेंड असल्याची बतावणी तो करू लागतो. नचिकेतला एरव्ही ज्याचे खूप आकर्षण वाटत असते तो परिकथेतील रोमान्स त्याच्या जीवनात प्रत्यक्ष येतो तेव्हा मात्र त्याची अवस्था बिकट होऊन जाते. नचिकेतला त्याच्या स्वप्नांची राणी खरोखरीच मिळणार की त्याच्या एरव्ही सुरळीत चाललेल्या साध्या आयुष्यात वादळ निर्माण होणारया आगळ्यावेगळ्या ‘गर्लफ्रेंड’चे नेमके काय होणार हे पाहण्यासाठी शेमारू मराठीबाणावर हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पहायला विसरू नका.

 व्हॅलेंटाइन्स डेला आपल्या प्रिय व्यक्तीसोबत हा सिनेमा शेमारू मराठीबाणा वाहिनी  बघायला मिळणार आहे 

महाराष्ट्राची हास्यजत्राने गाठला 300 भागांचा पल्ला!

सोनी मराठी वरील मजेदार आणि दर्जेदार ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे.

Sai Tamahankar, Maharashtrachi hasya Jatra on Sony Marathi
Sai Tamahankar, Maharashtrachi hasya Jatra on Sony Marathi

आणि अशा या सगळ्यांच्या लाडक्या हास्यकत्रेचे ३०० भाग पूर्ण होत आहेत. ही अतिशय आनंद आणि समाधानाची बाब आहे की गेली २.५ वर्ष संपूर्ण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची टीम सगळ्यांना खळखळून हसवते आहे.हसणं हा सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे असं म्हटलं जात आणि हे हसवणं गेले चार सीजन सातत्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा आपल्या प्रेक्षकांना देत आहे. नवनवीन संकल्पना, आपलेसे वाटणारे विषय, भन्नाट टाईमिंग, हवीहवीशी वाटणारी पात्र आणि कमाल विनोद या सगळ्यांचा मिलाफ म्हणेज महाराष्ट्राची हास्यजत्रा.

सुप्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या टीमनी.मालिकेतील जेठालाल, भिडे, पोपटलाल, माधवी भाभी, कोमल भाभी आणि मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी हे ३०० नाबादच्या या सोहळ्याला हजर होते. अनेक वर्षांनी एवढं हसलो अशी प्रतिक्रिया या वेळी मालिकेत आत्माराम भिडेंची भूमिका साकारणाऱ्या मंदार चांदवडेकर यांनी दिली. तर इथली सर्व ऊर्जा घेऊन आम्ही आमच्या मालिकेतही ती आणण्याचा प्रयत्न करू असं मालिकेचे निर्माते असित कुमार म्हणाले.

हा विनोदाचा विशेष सोहळा येत्या १७ आणि १८ फेब्रुवारीला रात्री ९ वा. प्रेक्षकांना सोनी मराठी वाहिनीवर पहायला मिळणार आहे.

विराट शक्तीला भेदून आर्या काळुबाईचं देऊळ उघडणार का?

सोनी मराठी वाहिनीवरची ‘आई माझी काळुबाई’ सध्या मालिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची चर्चा होताना दिसते.

Veena Jagtap in Marathi serial 'Aai Mazi Kalubai'
Veena Jagtap in Marathi serial ‘Aai Mazi Kalubai’

‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं देवस्थान आहे.  मालिकेतली गोष्ट ही आर्याच्या भक्तीची आणि काळुबाईच्या शक्तीची गोष्ट आहे. या मालिकेतल्या आर्याची काळुबाईवर असलेली भक्ती तिला सर्व संकटांतून मार्ग काढण्यासाठी मदत करते.

पाटलांच्या घरात कोणीतरी सुरुंग स्फोट घडवण्याचं कारस्थान करतं, पण आर्या मात्र ते कारस्थान हाणून पाडते आणि आर्या काहीतरी करणार असल्याचा अंदाज विराटला येतो. तो आणि पाटील कुटुंब तिच्यावर नजर ठेवू लागतं आणि आर्या घराबाहेर कशी पडणार हा प्रश्न निर्माण होतो. आर्या (वीणा जगताप) आता विराट शक्तीला भेदून गावातलं काळुबाईचं देऊळ उघडणार का, हे येत्या रविवारी, ७ फेब्रुवारी, संध्या. ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर ‘आई माझी काळुबाई’ या मालिकेच्या महाएपिसोड मधे प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

हसणं अनलॉक करण्यासाठी येत आहे कॉमेडीची सुपरफास्ट एक्सप्रेस्

Actor Sumeet Raghavan
Actor Sumeet Raghavan

गेल्या वर्षभरात कित्येकांना अनेक ताणतणावांना सामोरं जावं लागलं तर कित्येकांच्या चेहऱ्यावरचं हास्यही निमालं.  ‘कोरोना’ नामक वादळाने गेलं वर्षभर जगाला हादरवून सोडलं . पण आता निराशेची ही सगळी मरगळ झटकून नव्या वर्षात सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवायला सज्ज झालाय. अतरंगी कलाकारांची सतरंगी धमाल घेऊन कलर्स मराठी दर्जेदार आणि निखळ मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहेएका धम्माल विनोदी शो सह. ‘सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस्’ ७ फेब्रुवारीपासून दर रविवारी संध्या ७.०० वा.

या ‘सुपरफास्ट कॅामेडी एक्सप्रेस्’  ची सूत्रं सांभाळणार आहेरसिकांचा लाडकाअष्टपैलू अभिनेता सुमीत राघवन. हिंदी चित्रपटमालिका तसंच नाटकाच्या मंचावरून आजवर सुमीतने रसिकांची मनं काबीज केलीयत. यापूर्वी मराठी टेलिव्हिजन वर सोहळ्यांचा सूत्रसंचालक म्हणूनही तो रसिकांच्या भेटीला आला होता. मात्र एखाद्या मराठी शो चा सलग सूत्रसंचालक म्हणून या शो द्वारे कार्यक्रमाची एकहाती धुरा सुमीत पहिल्यांदाच सांभाळणार आहे.

या कार्यक्रमाची निर्मिती संहिता क्रिएशन्स करत असून आशिष पाथरे याने या शोचं लेखनदिग्दर्शन सांभाळणार आहे.

‘शुभमंगल ऑनलाईन’ मालिकेने गाठला १०० भांगाचा पल्ला

subodh bhave with his wife celebrating success of 'Shubhmangal online''
subodh bhave with his wife celebrating success of ‘Shubhmangal online”


कलर्स मराठीवरील शुभमंगल ऑनलाईन मालिका सुरू होण्याआधी बरीच चर्चेत होती. मालिकेचा विषय खूपच वेगळा
, सुयश – सायलीची जोडी देखील पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस होणार होती, सुकन्या कुलकर्णी मोने या देखील कलर्स मराठीवर परतणार होत्या.

Subodh Bhave, Suyash Tilak selfie
Subodh Bhave, Suyash Tilak selfie


सुबोध आणि मंजिरी भावे यांची निर्माते म्हणून पहिलीच मालिका आणि बर्‍याच गोष्टी. सद्यस्थिति लक्षात घेता तरुण पिढी काय तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील डिजिटलचे महत्व काही औरच होऊनं बसले आहे ! आतापर्यंत एका व्हिडिओ कॉलवर सार्‍या भेटीगाठी पार पडत
मन जुळतमैत्री होत असे. पणआता मात्र ऑनलाईन लग्नाच्या गाठी देखील जुळल्या.

Sameedha Guru, Sukanya Mone, Sayali Sanjeev
Sameedha Guru, Sukanya Mone, Sayali Sanjeev

शंतनू -  शर्वरीच्या विवाहसोहळा तर पडला पण त्यांच्या आयुष्यात अचानक ऐश्वर्याच्या येण्याने बरीच उलथापालथ होते आहे. आता शर्वरीच्या साथीने शंतनूला कुटुंबाची साथ कशी मिळेल ? शर्वरी त्याला साथ देईल ? ऐश्वर्याचा नक्की हेतु काय आहे ? तिचा खेळ शर्वरी – शंतनू उधळून लावू शकतील ? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे..

'Shubhmangal Online'
‘Shubhmangal Online’

नुकताच मालिकेने १०० भागांचा पल्ला गाठला. प्रेक्षकांच्या मिळणार्‍या उदंड प्रतिसादामुळे हे शक्य होऊ शकले. मालिकेतील पात्र, विषय, जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेच्या संपूर्ण टीमने एकत्र येऊन याचे सेलिब्रेशन केले. सुकन्या कुलकर्णी मोने, सायली संजीव, सुयश टिळक, सुबोध भावे, मंजिरी भावे यांच्या आणि संपूर्ण टिमच्या उपस्थितीत केक कट करून, सेल्फी काढत या सगळ्यांनी आनंद व्यक्त केला.

स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त वृक्षारोपण

सोनी मराठी वाहिनीवरील स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार या मालिकेद्वारे प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

Neen Kulkarni, Dr Amol Kolhe, Sayaji Shinde, while tree plantation on set

Neen Kulkarni, Dr Amol Kolhe, Sayaji Shinde, while tree plantation on set

12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेबांची जयंती. त्या निमित्ताने स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण करण्यात आले. स्वराज्यजननी जिजामाता मालिकेच्या टीमने 150 रोपटी लावली. या कार्यक्रमाला डॉ. अमोल कोल्हे, नीना कुळकर्णी आणि सयाजी शिंदे हे उपस्थित होते.

शिवजयंती निमित्ताने शिरूर येथे बायोडायव्हर्सिटी प्लांटची उभारणी करणार असल्याचे डॉ. कोल्हेनी या वेळी सांगितलं. शिवभक्तांबरोबर या वृक्षारोपणाची हिरवी मशाल, या वृक्षारोपणाचा विचार घेऊन या वेळी शिवनेरीवर देखील जाऊ असंही ते म्हणाले.जिजाऊ माँ साहेबांच्या जयंती निमित्त मी सगळ्यांना हे आव्हान करतो की झाडांना पण एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे मान द्या तरच लोक त्यांना जपतील.

समीर चौघुले दिसणार गंडावरे बाबांच्या भूमिकेत!

Actor Sameer Chaugule in 'Assa maher nako ga bai'
Actor Sameer Chaugule in ‘Assa maher nako ga bai’

समीर चौघुले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत सगळ्यांना माहीत आहे. समीर आपल्या विनोदी अभिनयानं आणि कमाल टाइमिंगनं सगळ्यांचा लाडका झाला आहे. समीर आता प्रेक्षकांना एका नवीन भूमिकेत दिसणार आहे आणि ती भूमिका आहे गंडावरे बाबांची.

सोनी मराठी वाहिनीवरल्या ‘अस्सं माहेर नको गं बाई’ या मालिकेतल्या उपासने कुटुंबाच्या घरी गंडावरे बाबांचंआगमन होणार आहे. मालिकेतली सखीची आई अनसूया ही गंडावरे बाबांची भक्त आहे. तिच्या बोलण्यात त्यांचा उल्लेख असतो आणि आता या गंडावरे बाबांचं मालिकेत आगमन होणार आहे. हे गंडावरे बाबा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून तो आहे सर्वांचा लाडका समीर चौघुले! गंडावरे बाबा हे विनोदी पात्र असून याच्या मालिकेत 14 जानेवारीला आगमन होणार आहे, गंडावरे बाबांच्या येण्यानी मालिकेमध्ये आणि उपासनेंच्या घरी काय धमाल होते, ते जाणून घेण्यासाठी पाहा ‘अस्सं महेर नको गं बाई’, सोम.-शनि., रात्री 10 वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Akshaya Naik, Sameer Paranjape, Sundara Manamadh Bharali-'serialcast
Akshaya Naik, Sameer Paranjape, Sundara Manamadh Bharali-‘serialcast

 कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’  या मालिकेमध्ये  सध्या अभिमन्यू आणि लतिकाचे मालिकेध्ये वेगळे नाते बघायला मिळत आहे. त्यांच्यात कितीही मतभेद असले तरीदेखील संकटामध्ये ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहतात.  आपल्यात कितीही भांडण असले तरीदेखील तुझे स्वप्न करण्यात मी तुझी साथ नक्कीच देणार असे लतिकाने अभिला सांगितले आहे. अभिमन्यूला लतिकाचा खंबीर आधार मिळाला आहे आणि येत्या महारविवारमध्ये लतिकाला मिळणार आहे अभिची साथ.

प्रेक्षकांच्या मिळणार्‍या उदंड प्रतिसादामुळे मालिकेने नुकतेच १०० भाग पूर्ण केले… मालिकेतील पात्र, अभिमन्यू आणि लतिका यांची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अभीची आई म्हणजेच अतिशा नाईक, अभिची वाहिनी तसेच कामिनी, सज्जनराव यांची भूमिका देखील प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सध्या मालिकेमध्ये शर्यतीचा मुद्दा सुरू आहे ज्यात दौलतने अभिमन्यूला भाग घेण्याचे आव्हान दिले आहे. पण, अभीचे वडील याच्या पुर्णपणे विरोधात आहेत. अभिमन्यू लतिकाच्या साथीने कसा वडिलांचा होकार मिळवणार ? आणि तो शर्यतीत भाग घेणार का ? हे जाणून घेण्यासाठी बघत रहा सुंदरा मनामध्ये भरली रात्री ९.०० वा. कलर्स मराठीवर.  

‘चंद्र आहे साक्षीला’ मधे जुळणार स्वाती आणि श्रीधरची रेशीमगाठ

Subodh Bhave, Rutuja Bagwe, Chandra Aahe Sakshila serial
Subodh Bhave, Rutuja Bagwe, Chandra Aahe Sakshila serial

कलर्स मराठीवर ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेमध्ये  श्रीधरच्या तोतया बायकोला भेटल्यावर देखील स्वाती श्रीधरचं खरं रूप ओळखू शकत नाही. स्वाती उघड्या डोळ्याने देखील सत्य बघू शकत नाहीये कारण,तिच्या डोळ्यावर श्रीधरच्या प्रेमाची पट्टी आहे. स्वातीसमोर स्वतःला प्रामाणिक म्हणून सिद्ध करण्यासाठी श्रीधरने अनेक नवनवे डाव रचले. आणि त्यात स्वाती पूर्णत: अडकत चालली आहे. श्रीधर आणि स्वातीच्या जुळू पाहणाऱ्या नात्यात अनेक संकट येत राहिली पण श्रीधरने प्रयत्न सोडला नाही.

श्रीधरच्या प्रेमात जसजसे दिवस पुढे सरकू लागले स्वातीचा त्याच्यावरचा विश्वासदेखील वाढू लागला. या दोघांच्या लग्नाला मिना आत्याचा पुर्णपणे विरोध आहे. त्यामुळे अचानक तिथे मिना आत्याच्या येण्याने काय होईल ? तिच्या येण्याने श्रीधर आणि स्वातीच्या नात्याला गालबोट तर लागणार नाही ना ? श्रीधरचा खरा चेहरा ती स्वातीसमोर आणू शकेल ? मिनाआत्या तिथे कशी पोहचली ? ती आणि श्रीधरच्या या पिक्चर परफेक्ट जगात आता लग्नानंतर नक्की काय घडणार ? कसा असेल यांचा लग्नानंतरचा प्रवास ? हे पूर्ण जाणून घेण्यासाठी पाहा चंद्र आहे साक्षीला सोम ते शनि रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर.

जगाची सावली, माझी स्वामीराज माऊली- ‘जय जय स्वामी समर्थ’ कलर्स मराठीवर!

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ किंवा ‘अशक्यही शक्य करतील स्वामी” हा अमृतमय संदेश देणाऱ्या असाधारण सिध्दपुरुषाचे, ‘श्री स्वामी समर्थां’चे जीवनचरित्र जय जय स्वामी समर्थ‘ या कलर्स मराठीवरील नवीन मराठी मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

Jay Jay Swami Samarth, Marathi Serial
Jay Jay Swami Samarth, Marathi Serial

 आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहेपरमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नृसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल ३०० वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडं तोडणार्‍या एका इसमाच्या हातून कुर्‍हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली. तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. इथून खर्‍या अर्थाने प्रवास सुरू झाला.  श्री स्वामी समर्थ यांनी भारतभर भ्रमण केले. त्यांचे अनुयायी आज संपूर्ण भारतभर नाही तर जगभर पसरलेले आहेत. हिमालयभारत – चीन सीमाकाशीत्रिविक्रम सरोवर असे भ्रमण करून ते अक्कलकोट येथे स्थिरावले. स्वामी समर्थ यांचं शेकडो वर्षांचं वास्तव्यसुरस लीला आणि उपदेश यांनी भरलेली कथा असामान्य आणि प्रेरणादायी आहे.

 

 अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीतत्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले. कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेलीअक्कलकोट येथील चोळप्पाशीसेवेकरी सुंदराबाईअक्कलकोटचे राजे मालोजीरावया भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवृक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील ‘ जय जय स्वामी समर्थ’ ह्या मालिकेतून ,  २८ डिसेंबरपासून सोम ते शनि संध्या. ९.३० वा. कलर्स मराठीवर  प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.