Category Archives: मराठी

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!

'Chapa Kata' Marathi movie, Makarand Anaspure, Tejaswini lonari actress, Mohan Joshi
‘Chapa Kata’ Marathi movie, Makarand Anaspure, Tejaswini lonari actress, Mohan Joshi

महाराष्ट्रात लग्न समारंभाचा कार्यभाग म्हणून जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मकरंद अनासपूरे (Makarand Anaspure) आणि तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) यांनी ‘छापा काटा’ (Chappa Kata)  चित्रपटात लग्नाच्या शुभ प्रसंगी देवदेवतांच्या आगमनासाठी जागरण गोंधळ मांडत जपली आहे. मल्हारी मार्तंड आणि रूपसुंदरी म्हाळसा ते कारल्याच्या एकवीरा आईचा उदो उदो करणारं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ (Aai tujhya navane gondhal mandala) गोंधळगीत ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून अवघा महाराष्ट्र उत्साहाने झिंगणार असल्याचं दिसत आहे.
Tejaswini Lonari
शशांक कोंडविलकर यांनी गीताला शब्दबद्ध केले असून गणेश सुर्वे यांनी उत्स्फूर्त संगीत दिले आहे. गौरव चाटी यांनी देवतांच्या भक्तीत सर्वांनी विलीन व्हावे असे स्वर या गीतास दिले आहेत. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. येत्या १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहात ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ या गोंधळगीताचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.

माधव देवचकेचे वडिल म्हणतायत, “माधवचा मला खूप अभिमान आहे”

charudatta-deochake-madhav-deochake
“फादर्स डे”
 निमित्ताने बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या अभिनेता माधव देवचकेचे वडील चारूदत्त देवचके ह्यांच्याशी संवाद साधला असता  ते म्हणाले, “लहानपणापासूनच माधवमध्ये समंजसपणा आम्हांला दिसून आलाय. ब-याचदा मुलांची ओळख त्यांच्या वडिलांमूळे असते. पण माझी ओळख माधवच्या लहानपणापासूनच ‘माधवचे वडिल’ अशी होती. मी नाट्यनिर्माता असल्यामूळे माझ्या ओळखीचा फायदा माधवला करीयरमध्ये कधी ना कधी व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण माधवने कुठेही माझी ओळख न वापरता स्वत:च्या ताकदीवर आपलं करीयर घडवलं, याचा मला अभिमान आहे. अभिनेत्याच्या करीयरमध्ये ब-याचदा आर्थिक उतार-चढाव होत असतात, पण अशावेळेसही मी देऊ केलेली मदत स्वावलंबी माधवने स्विकारली नाही.”

 बिग बॉसमध्ये माधव खूप चांगलं खेळतोय. असे मत व्यक्त करून त्यांनी माधवला शुभेच्छा  दिल्यात.

आनंद शिंदे आपल्या हटके अंदाजात म्हणताहेत ‘आली फुलवाली’

चेतन गरुड प्रॉडक्शन्स निर्मित ‘खंडेराया झाली माझी दैना’ आणि ‘सुरमई’ ह्या गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चेतन गरुड आणखी एक हटके गाणं रसिक-प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदें ह्यांनी आपल्या हटके अंदाजात गायलेल्या ‘आली फुलवाली’ गाणे. एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट यांच्या संयुक्तविद्यमाने ‘आली फुलवाली’ हा सिंगल अल्बम युट्युब चॅनलवर झळकणार असून लवकरच हे गाणं इतर सोशल पोर्टल्सवर आणि म्युझिक चॅनेल्सवर तुम्हाला पाहता येईल.

Chetan Mathure, Asmita Surve, 'Aali Phulwali' Song
Chetan Mathure, Asmita Surve, ‘Aali Phulwali’ Song

राहुल झेंडे दि दिग्दर्शित ‘आली फुलवाली’ या अल्बमच्या टायटलवरूनच आपल्या लक्षात येईल हे गाणं एका फुलवालीला उद्देशून लिहिले गेलेले असून त्यातली कलरफुल फुलवाली सगळ्यांची मनं जिंकेल यात शंका नाही. चेतन मोहतुरे आणि अस्मिता सुर्वे या नवोदित जोडीवर चित्रित केलेलं हे गाणं शप्पिद शेख यांनी लिहिले व संगीतबद्ध केले आहे. अल्बमला साजेशी वेशभूषा रश्मी मोखळकर यांची आहे तर या अल्बमचे संकलन राहुल झेंडे यांनी केले आहे शिवाय रवी उच्चे यांचे छायांकन ‘आली फुलवाली’ला लाभले आहे.

‘कॅरी ऑन मराठा’ चित्रपटाचावर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीअर

Gashmeer Mahajani
Gashmeer Mahajani in ‘Carry on Maratha’

हल्ली इंग्रजी, हिंदी चित्रपटांप्रमाणे नवीन मराठी चित्रपट सुद्धा प्रदर्शनाच्या ६-८ महिन्यांच्या आतच छोट्या पडद्यावर दाखवले जातात. एखाद्या चित्रपटाने खूप कमाई केलेली असते, बॉक्सऑफिसवर चित्रपट सुपर हिट असतो, एखाद्या चित्रपटातील स्टार कास्ट मोठी किंवा फेमस असते, तर कधी काही चित्रपट वाहिनीच्या आर्थिक गणितात योग्य बसलेला असतो. ह्या पैकी कुठलेली कारण असले तरी, चित्रपट छोट्या पडद्यावर दाखवल्या गेल्यामुळे नक्कीच अधिकाधिक प्रेक्षेकांपर्यंत तो पोहोचण्यात व वाहिन्यांचे टी आर पी वाढण्यात काही अंशी नक्कीच भर पडते.

गेल्या काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला, गश्मीर महाजनीकश्मीरा कुलकर्णी हि नवोदित जोडी असलेला अॅक्शन्सप्रेमपट ‘कॅरी ऑन मराठा’ ह्या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीअर झी टॅाकीजवर ह्या वाहिनीवर रविवार १३ डिसेंबरला दुपारी १२.०० वा. प्रक्षेपित होणार आहे.

‘हद्द बघितलीस…आता जिद्द बघ’ अशी जबरदस्त कॅचलाईन असलेला हा चित्रपटमहाराष्ट्र,कर्नाटक सीमाभागातील नायक नायिकेच्या प्रेमकथेवरआधारित आहे. दोन प्रेमीयुगुलांचं फुलणारं प्रेम व ते मिळवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष या चित्रपटातूनपहायला मिळणार आहे.चित्रपटाच्या नावाला साजेसे तडाखेबंद डायलॉग्ज प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारे आहेत.अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी यांच्या अभिनयाने नटलेल्या या सिनेमात मराठीबरोबरच कानडी संवादाची मजा घेता येणार आहे.

याचित्रपटात मराठी सोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी काम केले आहे. अरुण नलावडे, अमीन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ, देविका दफ्तरदार, उषा नाईक, शंतनू मोघे, समीर खाडेकर, ओमकार कुलकर्णी, अमेय कुंभार आणि सचिन देशपांडे यांच्या महत्त्वाच्या भूमिकाआहेत.नव्या दमाचे नायक नायिका, जबरदस्त अॅक्शन, श्रवणीय संगीत,उत्तम छायाचित्रण, उच्च निर्मित्तीमुल्ये,उत्कृष्ट दिग्दर्शनअसलेला ‘कॅरी ऑन मराठा’ हा सिनेमा म्हणजे एक ‘कम्प्लीट एंटरटेनमेंट पॅकेज’ आहे.

‘कवडसा’चे प्रभावी मानसशास्त्रीय सादरीकरण

Kishori Pathak, Pravin Chaughule, Marathi Natak
Marathi Natak ‘Kawadasa’

निर्मोही क्रिएशंस प्रस्तुत, माणूस लिखित, पंकज मिठभाकरे दिग्दर्शित कवडसा हे प्रायोगिक मराठी नाटक रंगभुमीवर अवतरतंय. परक्या, लांबच्या माणसांच्या बाबतीत संशय पिशाच्च मानगुटीवर बसलं तर जोर लावून काढता येतं, आपल्या जवळच्या माणसांविषयी संशय मनात फेर धरायला लागला की मग जे होतं ते आपल्याला कवडसा या नाटकात बघायला मिळते.

संशयग्रस्तता मुख्यतः प्रेमीजनात मोठया प्रमाणावर दिसून येते, सर्वात जवळचं सगळं भावविश्व व्यापलेल्या नात्यात किंचितसा सुद्धा दुरावा मनाला सहन होत नाही, आमचं दोघांच जे घट्ट भावविश्व आहे ते फक्त दोघांचच आहे, होतं आणि राहील असा विश्वास प्रेमीजनाच्या मनात निर्माण होतो, दोन घट्ट मैत्रीणींमध्ये देखील एक मैत्रीण जरा इतर मुलींमध्ये मिसळायला लागली की दुस‌‌‍‍‌‌‌‌‌‌‌‍ दुसर्या मैत्रीणीला त्रास होतो, जेव्हा आणखी कुणाबरोबर तरी असाच एकजिन्सीपणा पार्टनर ने अनुभवलाय किंवा अनुभवतोय हे कळतं तेव्हा मग संशयाला सुरुवात होते.

प्रवीण चौगुले, किशोरी पाठक, प्रसाद कुलकर्णी आणि अमोल पाठक अभिनीत या नाटकाला दिग्दर्शकाने दिलेल्या मानसशास्त्रीय सादरीकरणामुळे ते अधिक प्रभावी झाले आहे. प्रकाशयोजना संतोष लोखंडे ह्यांनी केली आहे तर संगीत निखिल लांजेकर, वेशभूषा मेघना मिठभाकरे,  रंगभूषा- पंकजा पेशवे आणि नेपथ्य प्रवीण चौगुले ह्यांचे आहे.

निर्मात्यांच्या मते, प्रेक्षकांनी या नाटकातून स्वतःकडे, आपल्या मानसिक प्रश्नांकडे आणि मानसिक आजारी व्यक्तींच्या प्रवासाकडे जाणीवपूर्वक पहावे हाच नाटकाचा मुख्य उद्देश.

‘कल्पना एक आविष्कार अनेक’ मध्ये ‘मैं वारी जावां…’ सर्वोत्कृष्ट एकांकिका

Kalpana Ek Aavishkar Anek

लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या ‘अस्तित्व’ आयोजित कै.  श्री. मु. ब. यंदे पुरस्कार ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ २०१५ या एकांकिका स्पर्धेत दिशा थिएटर्स ठाणेची ‘मैं वारी जावां…’  सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली तर फिनिक्स, मुंबईची ‘मन्वंतर’ ही एकांकिका द्वितीय पारितोषिक विजेती ठरली.

यंदा ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांनी नात्यांबाबत गहिरा आशय व्यक्त करणारी  ‘अलाव’ही कविता विषय होती.  अंतिम फेरीचे परीक्षण प्रतिमा कुलकर्णी,जयंत पवार,वैभव जोशी,विद्याधर पाठारे आणि हृषीकेश जोशी या मान्यवर परीक्षकांनी केले.

या स्पर्धेतले सर्वोत्कृष्ट लेखकाचे  पारितोषिक स्वप्निल चव्हाण याला  ‘मन्वंतर’ या एकांकिकेसाठी देण्यात आले. प्रेक्षक आणि परीक्षक या दोघांच्याही पसंतीस पात्र ठरलेला ‘मैं वारी जावां’तला  प्रसाद दाणी सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला.  ‘ऋणानुंबंध’च्या भाग्यश्री पाणेला अभिनयाचे द्वितीय, ‘मन्वंतर’ साठी अजित सावंतला तृतीय, ‘टर्मिनल’साठी प्रज्ञा शास्त्री यांना चतुर्थ तर ‘ऋणानुंबंध’ च्या मैथिलि तांबे ला पंचम पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

अंतिम फेरी – निकाल
सर्वोत्कृष्ट एकांकिका (प्रथम): दिशा थिएटर्स – ‘मैं वारी जावां…’
सर्वोत्कृष्ट एकांकिका (द्वितीय): फिनिक्स, मुंबई – ‘मन्वंतर’
सर्वोत्कृष्ट लेखक : स्वप्निल चव्हाण – ‘मन्वंतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय (प्रथम) : प्रसाद दाणी – ‘मैं वारी जावां’
सर्वोत्कृष्ट अभिनय (द्वितीय) : भाग्यश्री पाणे – ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट अभिनय (तृतीय) : अजित सावंत – ‘मन्वंतर’
सर्वोत्कृष्ट अभिनय (चतुर्थ) : प्रज्ञा शास्त्री – ‘टर्मिनल’
सर्वोत्कृष्ट अभिनय (पंचम) : मैथिलि तांबे – ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजनाकर : शीतल तळपदे – ‘टर्मिनल’
सर्वोत्कृष्ट नेपथय :संदेश जाधव – ‘ऋणानुंबंध’
सर्वोत्कृष्ट संगीत : मल्हार फडके, संतोष वाडेकर – ‘मन्वंतर’

परीक्षक : प्रतिमा कुलकर्णी,जयंत पवार,वैभव जोशी,विद्याधर पाठारे आणि हृषीकेश जोशी

 

एका ‘डोमा’च्या आयुष्याचा संघर्षपूर्ण धगधगता जीवनप्रवास

dom-marathi-movie-dr-vilas-ujawane

अनेकदा समाज व्यवस्थेकडून दुर्लक्षित केला जाणारा, माणसाच्या अंतिम क्षणांना मोक्ष देणारे काम करणारा महत्वाचा घटक म्हणजे ‘डोम’ समाज.एका डोमाच्या आयुष्याचा विस्मयकारक – संघर्षपूर्ण धगधगता जीवनप्रवास ‘डोम’  या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्री .आर. एल. तांबे ह्यांनी ‘सह्याद्री पिक्चर्स’ द्वारे ह्या चित्रपटाची  निर्मिती केली असून प्रदीप दळवी ह्यांनी  लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

डोमाच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या ह्या समाज प्रधान चित्रपटात वेगळी प्रेमकथा बरोबरच सहस्यमय पटकथासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटात डॉ . विलास उजवणे, अंजली उजवणे व मोहन जोशी ह्यांच्या मुख्य भूमिका असून सोबत अनिता नाईक, प्रदीप दळवी, प्री .आर. एल. तांबे, दीपज्योती नाईक, गीतांजली कुलकर्णी,प्रदीप पटवर्धन हि कलाकार आहेत .  

छायांकन राजू कडूर, संकलन सचिन नाटेकर ह्यांनी केले आहे. प्री .आर. एल. तांबे  ह्यांनी लिहिलेल्या गीतांना स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम, शकुंतला जाधव, वैशाली सामंत ह्यांच्या आवाजतील गाणी संदीप डांगे ह्यांनी संगीतबद्ध केले आहेत.ऑक्टोबर महिन्यात हा  चित्रपट प्रेक्षेकांच्या भेटीस आहे.

‘माझे पती सौभाग्यवती’ मालिकेमधून वैभव मांगलेचा वेगळा प्रयोग

Vaibha Mangle, Actorबाईचं दुखणं समजून घेण्यासाठी बाईच व्हावं लागतं असंही म्हटलं जातं. बाईच्या मनातील हेच दुखणं समजून घेण्याची एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून. वैभव मांगले हे वैभव मालवणकरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २८ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या मालिकेची कथा आहे एका स्ट्रगलर अभिनेत्याची. अभिनयाची आवड ज्याच्या मनातच नाही तर रक्तात भिनली आहे असा हा अभिनेता.  अनेक वर्षे संघर्ष करूनही मनासारखं काम तर मिळालच नाही उलट वाट्याला आली ती अपमानास्पद वागणूकच. त्याच्या संघर्षामध्ये त्याच्या प्रत्येक पावलावर त्याची मनोभावे साथ देतेय ती त्याची पत्नी. आपल्या पतीने खूप नाव कमावावं आणि मोठा अभिनेता व्हावं हे तिचंही स्वप्न. याच दरम्यान वैभवच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्याद्वारे अभिनयाच्या संधीचं एक मोठं दार उघडतं. हाडाचा अभिनेता असलेल्या या नटाला जी मोठी भूमिका मिळते ती असते एका स्त्री पात्राची. अभिनेता म्हणून ओळख कमवायला आलेल्या नट पहिल्यांदाच एक मोठी भूमिका मिळते पण तीही स्वतःची ओळखच मिटवून टाकणारी. पण हे आव्हान स्वीकारून स्वतःच्या अभिनेता या ओळखीबरोबरच या पात्राची नवी ओळख निर्माण करतो का ? आपल्या दैनंदिन आयुष्यात बाईचं अस्तित्वदुर्लक्षित करू पाहणाऱ्या त्याच्या आयुष्याला या कामामुळे कलाटणी मिळते का? त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून.

झी मराठी वर दाखल होणाऱ्या या मालिकेची निर्मिती मंदार देवस्थळी ह्यांनी केली आहे. ज्यामध्ये वैभव मांगले बरोबर नंदिता धुरी, अशोक शिंदे, रमेश भाटकर, उदय सबनिस, स्नेहा माजगावकर, अद्वैत दादरकर हि कलाकारही या मालिकेत असणार आहेत.

मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी इंडस हेल्थप्लसचा उपक्रम

Snehal Ambekar, Mayor Mumbai
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी इंडस हेल्थप्लस प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा कंपनीने  नुकतेच एक अनोखे शिबीर आयोजित केले होते, या शिबिराचे उद्घाटन मुंबईच्या मा. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात  सिरम बिलिरुबिन, सिरिम क्रीएटीनाईन, ग्लायकोसायलेटेक, हिमोग्लोबिन, संपूर्ण कोलेस्ट्रोल, एमआय, पल्मनरी फंक्शन, आहार तज्ञ अशा विविध चाचण्यांचा समावेश करण्यात आला होता.

सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, कॅमेरामन, दिग्दर्शक, निर्माते आणि स्पॉट बॉईज अशा एकूण १२० जणांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली.  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, तसेच संचालक मंडळ इंडस हेल्थ प्लसचे जॉईन्ट मॅनेजिंग डायरेक्टर पर्णल देखणे , गव्हनींग कौन्सिलमंदार नाईकवडी व या उपक्रमाचे समन्वयक लिड मिडियाचे विनोद सातव, प्रमुख पाहुणे पु. ल. देशपांडे प्रकल्प संचालक मा. आशुतोष घोरपडे हे देखील उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे आशुतोष घाटपांडे यांनीदेखील या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. व अशा विषयांवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.

चित्रपुष्प मराठी चित्रपट महोत्सव २०१५

Marathi Film Festival
पुण्यात येत्या ७ तारखेपासून, एन के इंटरप्राईजेस प्रस्तुत अनघा इवेन्ट्स च्या वतीने चित्रपुष्प  मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेले आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट दाखवण्यात येतील .या मध्ये अगबाई अरेच्चा२, युद्ध , ढोल ताशे,  म्हैस , सत ना गत हे पाच प्रदर्शित झालेले आणि भविष्यात प्रदर्शित होणारे बाबांची शाळा , ७ रोशन व्हिला, वाक्या, तिचा उंबरटा, वन टू थ्री फोर  हे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांच्या संदर्भातील कलाकार,दिग्दर्शक,निर्माते ,संगीतकार आणि तंत्रज्ञ यांच्या समवेत चित्रपट जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होईल.

या चित्रपट महोत्सवात चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे . प्रदर्शित आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणाऱ्या अश्या दोन्ही विभागाकरिता पुरस्कार चित्रपटाना प्रदान करण्यात येईल. दिनांक ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०१५ या तीन दिवसा मध्ये हा मराठी चित्रपट महोत्सव आर्काइव्ह थेटर ,लॉ कॉलेज रोड पुणे येथे प्रेक्षकांसाठी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरु असणार आहे .

प्रवेशिका खालील ठिकाणांवरून मिळतील.
१) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पुणे
२) सिद्धांत मिडिया अँन्ड पब्लिसिटी, पुणे
३) पर्पल, पुणे
४) नेक्स्ट जेनरेशन न्यूज, पुणे
५) इन ऑरबीट मॉल पुणे