मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!
महाराष्ट्रात लग्न समारंभाचा कार्यभाग म्हणून जवळपास सर्व समाजात कुलस्वामिनीला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची जुनी परंपरा आहे. ही परंपरा मकरंद अनासपूरे (Makarand Anaspure) आणि तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) यांनी ‘छापा काटा’ (Chappa Kata) चित्रपटात लग्नाच्या शुभ प्रसंगी देवदेवतांच्या आगमनासाठी जागरण गोंधळ मांडत जपली आहे. मल्हारी मार्तंड आणि रूपसुंदरी म्हाळसा ते कारल्याच्या एकवीरा आईचा उदो उदो करणारं ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ (Aai tujhya navane gondhal mandala) गोंधळगीत ११ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून अवघा महाराष्ट्र उत्साहाने झिंगणार असल्याचं दिसत आहे.
शशांक कोंडविलकर यांनी गीताला शब्दबद्ध केले असून गणेश सुर्वे यांनी उत्स्फूर्त संगीत दिले आहे. गौरव चाटी यांनी देवतांच्या भक्तीत सर्वांनी विलीन व्हावे असे स्वर या गीतास दिले आहेत. ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केले आहे. येत्या १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना चित्रपटगृहात ‘आई तुझ्या नावानं गोंधळ मांडला’ या गोंधळगीताचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.
क्षेत्रपाल श्री देव वेतोबाची भूमिका साकारणार प्रथितयश अभिनेता उमाकांत पाटील
आपल्या प्रत्येक नव्या मालिकेतून एका वेगळ्या विषयाला हात घालणारी, सन मराठी ही वाहिनी आता श्री देव वेतोबाची कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत असून ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ (Kshetrapal Shree Dev Vetoba) ही नवी कोरी मालिका १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
कोकणातील परंपरा, प्रथा, रुढींशिवाय तेथील गूढ गोष्टींविषयी कायमच महाराष्ट्राला एक प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्य म्हणजे ‘वेतोबा’. भक्तांचा रक्षणकर्ता, कोकणचा क्षेत्रपाल, संकट निवारक आणि सिंधुदुर्गातील आरवली गावाचे ग्रामदैवत म्हणजे ‘श्री देव वेतोबा’. खरं तर वेतोबा म्हणजे भूतनाथ. पण कोकणात संकटसमयी भक्तांच्या हाकेला देवासारख्या धाऊन जाणाऱ्या वेतोबाला देवाचे स्थान आहे. संकटसमयी वेगवेगळ्या रूपांत हाकेला धावून येणाऱ्या वेतोबाची प्रचिती कित्येक गावकऱ्यांना आलेली आहे. हातात काठी घेऊन भव्य-दिव्य देहरूप असलेला वेतोबा गावांच्या वेशींवर गस्त घालतो. कुणी भक्त संकटात असेल तर त्याचे रक्षण करतो. एवढंच नव्हे तर कोणतेही मोठे काम सुरु करण्यापूर्वी किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोकणवासी आपल्या लाडक्या वेतोबाचा कौल घेतात. तशी प्रथाच आहे कोकणात.
श्री देव वेतोबा’चे मंदिर कोकणातील आरवली या ठिकाणी वसलेले असून हे अत्यंत जागृत असे देवस्थान मानले जाते.
आता वेतोबाच्या भूमिकेत दिसणार कोण, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असणार. तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’, ‘सूर्यवंशी’, ‘सिंबा’, संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठीयावाडी’ इत्यादी हिंदी तसेच तामिळ सिनेमा ‘काला’ आणि ‘एक्सट्रॅक्शन’ या हॉलिवूडपटात अभिनय करुन प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता उमाकांत पाटील वेतोबाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा विचार केला असता त्याची शरीर रचना, बांधा, रूप पाहून वेतोबा ह्या भूमिकेला उमाकांत योग्य न्याय देईल याची खात्री वाटते.
‘प्लॅनेट मराठी’चे ‘प्लॅनेट गोयं (Planet Goem)’ ॲप गोवेकरांसाठी सज्ज
पहिला मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मचा बहुमान मिळवल्यानंतर ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आता आपल्या प्रेक्षकांसाठी काही तरी झक्कास घेऊन येत आहे. प्लॅनेट मराठी आता एक नवीन, मनोरंजनात्मक आणि माहितीपूर्ण असा ॲप घेऊन आले आहे. हा ॲप खास गोव्यासाठी बनवण्यात आला आहे. या सुपर ॲपचे नाव ‘प्लॅनेट गोयं’ असून यात मनोरंजनाबरोबरच व गोव्याची इत्यंभूत माहितीही उपलब्ध होणार आहे. नुकतीच या ॲपची घोषणा करण्यात आली असून गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या हस्ते ‘प्लॅनेट गोयं’ चे अनावरण करण्यात आले.
‘प्लॅनेट गोयं’ केवळ मनोरंजनापुरताच मर्यादित नसून यामध्ये ट्रॅव्हल, टुरिझम, फूड, इव्हेंट्स या सगळ्याची माहिती उपलब्ध असणार आहे. हा अॅप गोव्यातील स्थानिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी निश्चितत फायद्याचा ठरेल. ‘प्लॅनेट गोयं’ हा पहिला कोंकणी अँप असून इंग्रजी, हिंदीतील आशयांबरोबरच कोंकणी भाषेतील मनोरंजनात्मक आशय आणि मराठी भाषेतील डब फिल्म्सही या ॲपवर उपलब्ध असतील.
तेजस्विनी (Tejaswini Lonari) आणि प्रसादमध्ये वादाची ठिणगी !
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज आटली बाटली फुटली हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. ज्यामध्ये रोहित, प्रसाद, मेघा आणि त्रिशूल घरातील उर्वरित सदस्यांना घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करणार आहेत. रोहित शिंदे याने निखिल राजेशिर्के याला नॉमिनेट करणार असून त्याचे कारण निखिलला अमान्य असल्याचे त्याने सांगितले. रोहितने स्पष्टीकरण देखील दिले “its Not a Groupism”.
या नॉमिनेशन प्रक्रियेबाबत आज प्रसाद आणि रुचिरामध्ये चांगलीच चर्चा रंगणार आहे. आता नक्की ते काय चर्चा करणार आहेत ते कळेलच. दुसरीकडे, नॉमिनेशनच्या प्रक्रियेमुळे तेजस्विनी (Tejaswini Lonari) आणि प्रसादमध्ये खटके उडायला सुरुवात होणार आहे. तेजस्विनी प्रसादाला म्हणाली, “तू जे काय बनवणार आहेस ते positivity ने बनव, कटकट नको करुस, सांगकाम्या आहेस तू. ” आणि वाद वाढतच गेला. त्यावर अपूर्वाने देखील तिचे मत मांडले, “ह्याला हे सांगू नको, त्याला ते सांगू नको.याला काहीच सांगायचे नाही.”
बघूया पुढे काय घडलं . तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.
‘गाथा नवनाथांची’ मालिकेने गाठला ४०० भागांचा टप्पा
‘गाथा नवनाथांची’ (Gatha Navnathanchi)या सोनीमराठी वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे नाथसंप्रदायाविषयीची माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना विशेष भावतेय. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ यांसारख्या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरत असतानाच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा नुकताच गाठला आहे.
आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती असं सगळं या मालिकेत पाहायला मिळालं, नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेच्या पुढल्या भागांत पाहणं रंजक ठरणार आहे. बालक रेवणनाथांचा नाथपंथाच्या दिशेकडील प्रवास आता मालिकेत सुरू झाला आहे. या मालिकेतील कलाकारांच्या भूमिकेचे विशेष कौतुकही होतंय.
महानायक अशोक सराफ यांची ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उपस्थिती!
दोन आठवड्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती (kon honaar crorepati)’ या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं.मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सहभागी होणार आहेत.
‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना ‘अशोक मामा’ म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. अशोक मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत.
अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला आणि दिलदार माणसाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पाहणं, ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे. पाहायला विसरू नका – ‘कोण होणार करोडपती’ – विशेष भाग, 25 जून, शनिवारी रात्री 9 वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
‘वाय’ नक्की आहे तरी काय? मुक्ता बर्वेसह अनेक कलाकारांनी शेअर केले पोस्टर
अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘Y (वाय)’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मिडीयावर सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणाऱ्या मुक्ता बर्वे हिने आपल्या सोशल मीडियावर ‘वाय’ चे पोस्टर धरलेला एक फोटो शेअर केला. त्यापाठोपाठ मराठी सिनेसृष्टीतील स्वप्निल जोशी, नीना कुळकर्णी, प्राजक्ता माळी इत्यादी अनेक कलाकारांनीही ‘वाय’ चे पोस्टर हातात धरून त्यांच्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो शेअर केला आहे! या सर्वच कलाकारांनी ” माझा पाठिंबा आहे ! आपला … ? “ अशी विचारणा चाहत्यांना केल्यामुळे , चाहत्यांमध्येही ‘वाय’ या नावाबद्दल आणि चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण झाली आहे.
हे सर्व कलाकार ‘वाय ‘ या चित्रपटांमध्ये आहेत का की यातील काही मोजकेच कलाकार ‘ वाय ‘ या चित्रपटामध्ये आहेत की आणखी यापेक्षा वेगळेच कलाकार चित्रपटामध्ये आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे. शिवाय या पोस्टरमागचा अर्थ आणि नेमका उद्देश काय, याविषयीही अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यामुळे आता ‘वाय’ विषयीची प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
एक्सप्रेशन क्वीन माधुरी पवार म्हणतेय ‘या बया दाजी आलं’
आपल्या दिलखेचक अदांनी महाराष्ट्राला वेडं लावणारी महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवार ‘या बया दाजी आलं’ (Ya Baya Daji Ale) म्हणतं तमाम दाजीना घायाळ करायला सज्ज झाली आहे. भलरी प्रॉडक्शन्स निर्मित, राज फिल्म्स प्रस्तुत आगामी बहुचर्चित ‘इर्सल (Irsal)’ या मराठी चित्रपटात माधुरी पवारची ही नखरेल अदाकारी बघायला मिळणार आहे. ‘राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘इर्सल’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे व विश्वास सुतार यांनी केले आहे.
‘इर्सल (Irsal)’ चित्रपटाची कथा अनिकेत बोंद्रे यांची असून, पटकथा अनिकेत बोंद्रे व महेशकुमार मुंजाळे यांची आहे. संवाद विश्वास सुतार यांचे आहेत. ‘इर्सल’चे छायांकन आनंद पांडे व वीरधवल पाटील यांनी केले आहे. बहुचर्चित ‘इर्सल’ येत्या ३ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘ठेच’ मधून उलगडणार प्रेमत्रिकोण
‘आई – मायेचं कवच’ उद्या पासून रात्री १०.०० वा. कलर्स मराठीवर
या संपूर्ण जगामध्ये आईचं प्रेम हे सर्वोच्च असते कारण ते निस्वार्थी असते. या प्रेमाची बरोबरी करण अशक्यचं ! पुत्र कुपुत्र असू शकतो पण माता कुमाता असूच शकतं नाही. आई आपल्या मुलांना मायेच्या उबदार पंखात, आपल्या प्रेमाच्या कोषात सुरक्षित ठेवू पाहते आणि या दुष्ट जगापासून त्यांचे रक्षण करू पाहते.
कलर्स मराठी वाहिनीवर येत्या २७ डिसेंबर पासून ‘आई- मायेचं कवच’ ही नाविकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटिस येत आहे. आजवर आई आणि मुलाचं नातं दर्शविणार्या अनेक मालिका येऊन गेल्या पण ‘आई’ या मालिकेतून पहिल्यांदा “सिंगल पेरेंट”आणि तिचा प्रवास या अतिशय नाजुक विषयाला हातळण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसणार आहे.
एका स्वाभिमानी, शिस्तप्रिय आईचा आणि तिच्या मुलीचा प्रवास म्हणजेच ही मालिका. या कथेला झालर आहे एका गूढ रहस्याची. असं काय घडतं आई मुलीच्या आयुष्यात ज्यामुळे त्या दोघींचे संपूर्ण आयुष्यं बदलून जाते हे बघण रंजक असणार आहे. अनुष्का पीमपुटकर आणि भार्गवी चिरमुले हिची हयात महत्वाच्या मध्यवर्ती भूमिकेत आपलायला दिसणार असून मालिकेचीनिर्मिती महेश कोठारे ह्यानी केली आहे.
२७ डिसेंबरपासून सोम ते शनि रात्री १०.००वा. कलर्स मराठीवर ‘आई’ - मायेचं कवच ही मलिका बघायला विसरु नका.