मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी इंडस हेल्थप्लसचा उपक्रम
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सदस्यांसाठी इंडस हेल्थप्लस प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा कंपनीने नुकतेच एक अनोखे शिबीर आयोजित केले होते, या शिबिराचे उद्घाटन मुंबईच्या मा. महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात सिरम बिलिरुबिन, सिरिम क्रीएटीनाईन, ग्लायकोसायलेटेक, हिमोग्लोबिन, संपूर्ण कोलेस्ट्रोल, एमआय, पल्मनरी फंक्शन, आहार तज्ञ अशा विविध चाचण्यांचा समावेश करण्यात आला होता.
सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते, अभिनेत्री, कॅमेरामन, दिग्दर्शक, निर्माते आणि स्पॉट बॉईज अशा एकूण १२० जणांनी या शिबिरात आपली आरोग्य तपासणी करून घेतली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर, तसेच संचालक मंडळ इंडस हेल्थ प्लसचे जॉईन्ट मॅनेजिंग डायरेक्टर पर्णल देखणे , गव्हनींग कौन्सिलमंदार नाईकवडी व या उपक्रमाचे समन्वयक लिड मिडियाचे विनोद सातव, प्रमुख पाहुणे पु. ल. देशपांडे प्रकल्प संचालक मा. आशुतोष घोरपडे हे देखील उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे आशुतोष घाटपांडे यांनीदेखील या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. व अशा विषयांवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या.
चित्रपुष्प मराठी चित्रपट महोत्सव २०१५
पुण्यात येत्या ७ तारखेपासून, एन के इंटरप्राईजेस प्रस्तुत अनघा इवेन्ट्स च्या वतीने चित्रपुष्प मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेले आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट दाखवण्यात येतील .या मध्ये अगबाई अरेच्चा२, युद्ध , ढोल ताशे, म्हैस , सत ना गत हे पाच प्रदर्शित झालेले आणि भविष्यात प्रदर्शित होणारे बाबांची शाळा , ७ रोशन व्हिला, वाक्या, तिचा उंबरटा, वन टू थ्री फोर हे चित्रपट दाखविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांच्या संदर्भातील कलाकार,दिग्दर्शक,निर्माते ,संगीतकार आणि तंत्रज्ञ यांच्या समवेत चित्रपट जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध होईल.
या चित्रपट महोत्सवात चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे . प्रदर्शित आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणाऱ्या अश्या दोन्ही विभागाकरिता पुरस्कार चित्रपटाना प्रदान करण्यात येईल. दिनांक ७, ८ आणि ९ ऑगस्ट २०१५ या तीन दिवसा मध्ये हा मराठी चित्रपट महोत्सव आर्काइव्ह थेटर ,लॉ कॉलेज रोड पुणे येथे प्रेक्षकांसाठी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत सुरु असणार आहे .
प्रवेशिका खालील ठिकाणांवरून मिळतील.
१) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पुणे
२) सिद्धांत मिडिया अँन्ड पब्लिसिटी, पुणे
३) पर्पल, पुणे
४) नेक्स्ट जेनरेशन न्यूज, पुणे
५) इन ऑरबीट मॉल पुणे
रोमॅंटिक आणि थ्रिलरचे कॉम्बिनेशन असलेला ‘शॉर्टकट’
विज्ञानाची होणारी जलद गतीची प्रगती आपल्याला उपयुक्त जरी ठरत असली तरी दुसऱ्या बाजूला ह्या प्रगतीचा गैरवापरदेखील जगात मोठ्या प्रमाणात होत आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी हल्लीची युवापिढी पैसा, प्रसिद्ध मिळवण्यासाठी ‘शॉर्टकट’ चा मार्ग अवलंबायला जराही मागे पुढे पाहात नाही, पण हाच ‘शॉर्टकट‘ कधीतरी वेगळं वळण घेउन आपल्याला घातक ठरू शकतो याचा जराही विचार या तरुण मंडळीना नसतो.
दिवसेंदिवस सायबर क्राइमसारख्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कमालीची वाढ होत आहे.
‘सायबर क्राइम’ सारखा अत्यंत ज्वलंत विषय ‘शॉर्टकट’ दिसतो पण नसतो, या आगामी सिनेमातून मांडण्यात आला आहे. एम के मोशन पिक्चर्स चे मुकेश चौधरी आणि चित्रकार फिल्म्सचे बी. आर. देढीया यांची निर्मिती असलेल्या ‘शॉर्टकट’ सिनेमाचे दिग्दर्शन हरीश राऊत यांनी केले असून त्यांचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.
राजेश शृंगारपुरे, वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत. सिनेमाची कथा हरीश राऊत यांची असून पटकथा हरीश राऊत, विनय नारायणे आणि राजेश बाळापुरे यांची आहे, तर संवाद विनय नारायणे यांचे आहेत.शकील खान यांनी सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहिले असून या सिनेमात रॉक संगीतासोबतच रोमॅंटिक संगीताची मेजवानी आपल्याला मिळणार आहे.
रोमॅंटिक आणि थ्रिलरचे कॉम्बिनेशन असलेला ‘शॉर्टकट‘ हा सिनेमा ७ ऑगस्टपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
तरुणांची बाजु मांडणारा ‘युथ’
व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित ‘युथ’ या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन ‘युथ’ सिनेमामधून भविष्याचे व समाजाचे आशादायी चित्र निर्माण करतो.
एन चंद्रा, गिरीष घाणेकर या सारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव, नामांकित कंपन्याच्या जाहिरातींचं दिग्दर्शन, संकलन अशी मुशाफिरी करणाऱ्या राकेश कुडाळकर यांचासिनेमा दिग्दर्शनाचा हा पहिला प्रयत्न आहे.
या सिनेमाचे संवाद विशाल चव्हाण व युग यांनी लिहिले आहेत. सिनेमातील गीतांनाही तरुणाईचा स्वर लाभला असून आजचे आघाडीचे गायक जावेद अली व गायिका शाल्मली खोलगडे यांनी यातील गीते गायली आहेत. विशाल-जगदीश यांनी सिनेमाला साजेसं संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांची आहे. चेतन शिंदे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे.
विक्रम गोखले, नेहा महाजन, अक्षय वाघमारे,मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. लवकरच ‘युथ’ च्या चित्रीकरणाला कोल्हापूरात सुरूवात होणार आहे.
मराठी चित्रपट ‘नागरिक’ १२ जून पासून सर्वत्र प्रदर्शित
आजच्या समाजाची मानसिकता, सर्वसामान्य नागरिक, राजकारण आणि क्षुल्लक क्षुल्लक घटनांमधील द्वंद्व, त्यातून दिसणारा, ‘घडणारा आणि बिघडणारा’ समाज; याचे वास्तव चित्रण ‘साची एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘नागरिक’ ह्या चित्रपटात प्रेक्षेकांना पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटात आपल्याला अनेक मोठ्या कलाकारांची फौज एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यात श्रीराम लागू, दिलीप प्रभावळकर, नीना कुलकर्णी, मिलिंद सोमण, सचिन खेडेकर, देविका दफ्तरदार हे मुख्य भूमिकेत असून सोबतीला सुलभा देशपांडे, माधव अभ्यंकर, राजेश शर्मा, राजकुमार तांगडे हि कलाकार मंडळी आहेत.
राज्य चित्रपट पुरस्कारात ‘नागरिक’ ह्या चित्रपटास ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटा’सह इतर पाच पुरस्कार मिळाले आहेत . चित्रपटाचे संवाद पत्रकार- कवी महेश केळूस्करांचे असून पटकथा विस्तार केळूस्करांसोबत दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी केला आहे. येत्या १२ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम
व्ही. शांताराम मोशन पिक्चर ट्रस्टच्यावतीने युवाव प्रस्थापित चित्रकर्मींसाठी ‘सिने कल्चरल सेंटर’च्या अंतर्गत सिनेमा मेकिंग तंत्राचे मार्गदर्शन आणि विशेष चर्चासत्राचे आयोजन नुकतेच (१९ एप्रिल रोजी)मुंबईत करण्यात आले होते. ह्या मार्गदर्शन कार्यक्रमास प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई ह्याचे मार्गदर्शन लाभले.
‘चाणक्य’, ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या मालिकांपासून ते ‘देवदास’ ह्या हिंदी सिनेमा पर्यंत असंख्य चित्रपटांच्या सेट्सच्या निर्मितीसाठी केलेला तेथील संस्कृती, इतिहास आणि भौगोलिक स्थानांचा अभ्यास, कला दिग्दर्शनाचे बारकावे याच्या चित्रफिती यावेळी दाखवण्यात आल्या, तसेच सेट्सच्या निर्मितीची प्रात्यक्षिकं त्यांनी याप्रसंगी सादर केली. बी.डी.डी. चाळीपासून सुरु झालेला प्रवास,कला दिग्दर्शन क्षेत्रातला संघर्ष, मातब्बर निर्माता-दिग्दर्शकांची मिळालेली साथ, मिळालेला मान-सन्मान, पारितोषिक आणि भविष्यातील योजना याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन सांस्कृतिक कार्यसंचालनालयाचे संचालक, आशुतोष घोरपडे ह्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी या उपक्रमाचे कौतुक करत असे उपक्रम सातत्याने व्हायला हवेत असे आवर्जून नमूद केले. श्री. किरण शांताराम यांनी नितीन देसाई यांचे आभार व्यक्त केले.
तावडे साहेब, महाराष्ट्राच्या रत्नागिरीत मराठी ऐवजी तेलुगु चित्रपटाला प्राधान्य
महाराष्ट्राचे माननीय सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी नुकतीच मल्टीप्लेक्स मध्ये मराठी चित्रपट प्रायीम टायिम ला दाखविण्याची घोषणा करून मराठी चित्रपट निर्मात्यांना आणि मराठी चित्रपट रसिकांना खुश केले. त्यानुसार मुंबई, पुणे येथे प्रायीम टायिम ला मराठी चित्रपट चांगली गर्दी खेचत आहेत. पण सिंगल स्क्रीन सिनेमा मात्र या बाबत मराठी चित्रपटांना प्राधान्य देत नाही असे आढळून येत आहे. महाराष्ट्रात अश्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहात जर प्रायीम टायिम ला मराठी चित्रपट दाखविले तर, तर मराठी चित्रपटांना नक्कीच घवघवीत यश मिळेल.
आता रत्नागीरीचेच उदाहरण घ्या. रत्नागिरी शहरात मराठी लोकसंख्या भरपूर असूनही, श्रीराम सारख्या सिंगल स्क्रीन सिनेमागृहात २७ मार्च पासून, ‘येवाडू‘ हा तेलगु चित्रपट रोज ३ शो मध्ये दाखविला गेला. ३ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान फास आयंड फ़ुरिउस या इंग्रजी चित्रपटाचे ३ शोज , त्यापाठोपाठ आता आता १० तारखेपासून हिंदी पडेल चित्रपट ‘ एक पहेली लीला‘ चे ३ शोज दाखविण्यात येत आहेत. पण मराठी चित्रपटांचा पत्ता येथे कट केला आहे, असे म्हणयचे का ?
गेल्या आठवड्या आलेल्या ‘कोफी आणि बराच काही’ आणि कोकणच्या पार्श्वभूमीवर आधारित ‘काकण’ या चित्रपटाला येथे शो मिळू शकत नाही, याचे आश्चर्य वाटते. कोकणातील इतर सिनेमा गृहात सुद्धा मराठी चित्रपट एखादाच शो मिळवतात. बाकी हिंदी किंवा तेलुगु चित्रपटासाठी दिवसात तीन शो! रत्नागिरीत मराठीचा टक्का घसरला, की वितरकान्तर्फे दुसरे काही राजकारण चालले आहे ? सांस्कृतिक मंत्र्यांनी याकडेही कृपया लक्ष द्यावे.
स्टार प्रवाहवर ‘तू जीवाला गुंतवावे’
मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी मालिकांचा स्वतः चा एक वेगळा असा प्रेक्षक वर्ग आहे. आपल्या मालिकांकडे जास्तीत जास्त प्रेक्षक वळवावा, आपल्या मालिकेस जास्तीत जास्त लोकप्रियता मिळावी ह्या साठी वाहिन्यांमध्ये नेहमीच स्पर्धा चालू असते. त्यासाठी नव-नवीन प्रयोगही केले जातात. गेल्या काही महिन्यात आपणास अनेक वाहिन्यांवर नवीन मालिका पाहायला मिळाल्यात. अर्थात त्यातील सर्वच मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय असे नाही.
सध्या प्रेक्षेकांमध्ये विशेष चर्चा आहे ती स्टार प्रवाह वरील, सचिन दरेकर लिखित ‘तू जीवाला गुंतवावे’ ह्या मालिकेबद्दल. हि मालिका सध्या चांगलीच लोकप्रियता मिळवतेय. शिवाय सोशल मिडिया वरही ह्या मालिकेची विशेष चर्चा आहे. ह्या मालिकेचे दिग्दर्शन दीपक नलावडे हे करत असून त्यांनी ह्या पूर्वी ‘लक्ष’, ‘दुर्वा’ ह्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.
अनन्या आणि निनाद ह्यांची फ्रेश प्रेमकथा हा ह्या मालिकेचा मुख्य गाभा, मालिकेत अधून मधून जरा ‘फिल्मी’ टच सुद्धा पाहायला मिळतो. अनन्याच्या प्रमुख भूमिकेत शिवानी सुर्वे तर निनाद ची भूमिका अजिंक्य ननावरे ह्या नवोदित कलाकाराने साकारली आहे. ह्यांच्या सोबत अपूर्वा नेमलेकर, विक्रम गायकवाड , अक्षया भिंगार्डे हे कलाकार आहेत. शिवाय अभिनेत्री प्रिया बेर्डे सुद्धा बऱ्याच काळानंतर आपणास एका विशेष भूमिकेत दिसते .
स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होणारी हि मालिका आगामी काळात आपली लोकप्रियता टिकून ठेवण्यात यशस्वी ठरणार कि नाही? ते मात्र येत्या काही भागात कळेल.
५४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘न हि वैरेन वैरानि’ या नाटकाला प्रथम पुरस्कार
५४ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी १६ फेब्रुवारी ते १३ मार्च या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे पार पडली. नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळ’ या संस्थेस ‘न हि वैरेन वैरानि’ या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आली .
स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सर्वश्री प्रेमानंद गज्वी, सुरेश मगरकर, संजीव वढावकर, अजय टिल्लू, मंगेश बनसोड यांनी काम पाहिले. सर्व पुरस्कार विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी अभिनंदन केले आहे.
५४ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘लोकहितवादी मंडळ’ या संस्थेस ‘न हि वैरेन वैरानि’ या नाटकासाठी प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे अन्य निकाल पुढीलप्रमाणे-
द्वितीय पारितोषिक : ‘विठाबाई’ (अंकुर मानव समाज उत्थान केंद्र, नागपूर)
तृतीय पारितोषिक : ‘परवाना’ (ध्यास, पुणे)
दिग्दर्शन :
प्रथम पारितोषिक : मुकुंद कुलकर्णी (नाटक- न हि वैरेन वैरानि)
द्वितीय पारितोषिक : संजय जीवने (नाटक-विठाबाई)
तृतीय पारितोषिक: श्रीकांत भिडे (नाटक-परवाना)
नेपथ्य :
प्रथम पारितोषिक : किरण समेळ (नाटक- न हि वैरेन वैरानि)
द्वितीय पारितोषिक:सुखदा मराठे (नाटक-गुरु)
तृतीय पारितोषिक : विजय कोळवणकर (नाटक-हार्दिक आमंत्रण)
प्रकाश योजना :
प्रथम पारितोषिक : विजय रावळ (नाटक- न हि वैरेन वैरानि)
द्वितीय पारितोषिक: भूषण देसाई (नाटक-मस्तानी)
तृतीय पारितोषिक: श्रीकांत भिडे (नाटक-परवाना)
रंगभूषा :
प्रथम पारितोषिक: प्रशांत कुलकर्णी (नाटक-एक चादर मैलीसी)
द्वितीय पारितोषिक: माणिक कानडे (नाटक- न हि वैरेन वैरानि)
तृतीय पारितोषिक: विजय ढेरे (नाटक-क्राईम अॅन्ड पनिशमेंट)
संगीत दिग्दर्शन :
प्रथम पारितोषिक: निषाद कुलकर्णी / प्रसाद भालेराव (नाटक- न हि वैरेन वैरानि)
द्वितीय पारितोषिक : आकाश करवंदे (नाटक-परवाना)
तृतीय पारितोषिक:सोनाली बोहरपी-जावळे (नाटक-विठाबाई)
उत्कृष्ट अभिनय :
पुरुष कलाकार :- हेमंत देशपांडे (नाटक- न हि वैरेन वैरानि), दीपक अमोणकर (नाटक-महाप्रस्थान), ओमकार तिरोडकर (नाटक-ती), गजानन नार्वेकर (नाटक-गुरु), आदित्य खेबुडकर (नाटक-क्राईम अॅन्ड पनीशमेंट), अमोल देशमुख (नाटक-इस्कॅलॅवो), शंभू पाटील (नाटक-अपुर्णांक), राज साने (नाटक-एक चादर मैलीसी), निखील भोर (नाटक- न हि वैरेन वैरानि), रोशन श्रीवास्तव (नाटक-विठाबाई)
स्त्री कलाकार :- सांची जीवने (नाटक-विठाबाई), श्रुति अत्रे (नाटक-परवाना), पुजा वेदविख्यात (नाटक- न हि वैरेन वैरानि), वंदना जीवने (नाटक-विठाबाई), मेघा पाथरे (नाटक-हार्दिक आमंत्रण), शिवानी घाटगे (नाटक-एक चादर मौलीसी), रसिया पडळकर (नाटक-क्राईम अॅन्ड पनीशमेंट), नुतन धवने (नाटक-ध्यानी मनी), वैशाली जाधव (नाटक-प्यादी), प्रज्ञा चवंडे (नाटक-प्यादी)
Marathi Movie ‘Satrangi Re’ – Review
सतरंगी रे हि कथा आहे इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या चार मित्रांची त्यांच्या passion संदर्भातील, आजची तरुण पिढी आणि त्यांचे पालक ह्यांच्यात असलेल्या मतभेदांची. चित्रपटाची जान मंजे चित्रपटाचे संगीत. उच्च निर्मिती मूल्य आणि चकाचक सादरी कारण असलेला सतरंगी आजच्या तरुण वर्गाला नक्कीच भावेल .