27 मे 2022 रोजी होणार ‘सरसेनापती हंबीरराव’ सर्वत्र प्रदर्शित
आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao)’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली होती. जगभरातील शिवप्रेमी या ऐतिहासिक मराठी चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे, 27 मे 2022 रोजी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा बिगबजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून मे महिन्याच्या सुट्टीत दमदार संवाद, जबरदस्त ऍक्शनची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या चित्रपटात मराठीतील ‘हँडसम हंक’ अभिनेता गश्मीर महाजनी (Gashmeer Mahajani) हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन छत्रपतींच्या काळात स्वराज्याचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळालेले एकमेव सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची व्यक्तिरेखा स्वतः प्रविण तरडे साकारत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.
संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्स निर्मित आणि शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेला ‘सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao Trailer )’ हा भव्य, ऐतिहासिक मराठी चित्रपट येत्या 27 मे 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.
Pravin Tarde to play Sarsenapati Hambirrao Mohite
With the reopening of cinema halls after a long time period, Marathi films are now releasing in cinema halls. There are many films lines up for release and one such film is ‘Sarsenapati Hambirrao (सरसेनापती हंबीरराव)’ which is written and directed by Pravin Vitthal Tarde. Recently, the teaser of this film was unveiled on social media. This teaser gives an idea of this historical film which has been shot with lots of action filled scenes with powerful dialogues.
The teaser has also revealed the important artistes playing the historical characters. While Gashmeer Mahajani plays the role of Shiv Chhatrapati Shivaji Maharaj, Pravin Tarde plays the title role of Sarsenapati Hambirrao Mohite. Produced by Urvita Productions , Shekhar Mohite, Soujanya Nikam and Dharmendra Bora and presented by Sandeep Mohite Patil, this most eagerly awaited film will be released very soon all over Maharashtra.
‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासीक चित्रपटाचे नवे टिझर पोस्टर
“छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा विजय असो!” अशा गगनभेदी घोषणा, कपाळी चंद्रकोर, डोक्यावर फेटा अश्या मावळ्यांच्या वेशातील कलाकार या उल्हासीत वातावरणात ‘सरसेनापती हंबीरराव’ या आगामी भव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या सेटवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पाचगणी येथील टेबल लँड येथे संपन्न झालेल्या या अनोख्या शिवजयंती सोहळ्याला विठ्ठल तरडे, महेश लिमये, संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांच्यासह चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ अशी संपूर्ण टीम उपस्थित होती.
याप्रसंगी बोलताना ‘सरसेनापती हंबीरराव’ चे लेखक – दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, “महाराष्ट्रासाठी, भारतदेशासाठी सर्वात मोठा सण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. कोणत्याही माणसाने त्याच्या आयुष्यातील शुभकार्य शिवजयंतीच्या दिवशी सुरू केले तर ते नक्कीच पूर्णत्वास जाईल, कारण महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले. या दैवी माणसाने आपल्यासाठी जे जे पाऊल उचलले ते यशस्वीच झाले आहे. सेटवर पावणे चारशेहून अधिक लोकांच्या युनिटने शिवरायांना मानाचा मुजरा केलेला आहे.”
उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट जून २०२० मध्ये प्रदर्शित होणार असून निर्मात्यांनी पुण्यात या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले त्याप्रसंगी हजारो लोक उपस्थित होते.
‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी एक आदर्श पायंडा निर्माण केला, कोणत्याही चित्रपटाचा मुहूर्त म्हटलं की तो एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीच्या हस्ते करणे ही एक परंपरा आहे. मात्र आपल्या आगामी चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्याचा मान राज्याच्या विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर किपर्स, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना देण्यात आला.
यावेळी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम हे तीन निर्माते तसेच माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते पाटील, डीओपी महेश लिमये, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते अभिजीत भोसले, सिटी प्राइड चित्रपटगृह समूहाचे व्यवस्थापक सुगत थोरात, क्रिएटिव्ह प्रोड्युसर रमेश परदेशी यांच्यासह औरंगाबाद, नाशिक, पुणे या शहरातील चित्रपटगृहांचे व्यवस्थापक, डोअर किपर्स, बुकिंग क्लार्क, प्रोजेक्टर ऑपरेटर्स आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.
शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या यशानंतर प्रविण तरडे घेऊन येत असलेल्या या भव्य चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. अंदाजे ह्या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे .
‘मुळशी पॅटर्न’ नंतर प्रविण विठ्ठल तरडे यांचा आगामी चित्रपट ‘सरसेनापती हंबीरराव’
शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या यशा नंतर लेखक, दिग्दर्शक, प्रविण विठ्ठल तरडे हे प्रेक्षकांसाठी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा एक अतिशय भव्य ऐतिहासीक चित्रपट घेऊन येत आहेत . या अतिभव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या संहितेचे पूजन हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावर महाराष्ट्रातील पाच शेतकर्यांच्या हस्ते करून प्रविण तरडे यांनी पुन्हा एक आदर्श पायंडा पाडला आहे. या प्रसंगी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” च्या घोषणांनी रायगडचा आसमंत दुमदुमला, भगव्या रंगाच्या फेट्यांनी वातावरण उल्हासीत झाले होते. तत्पूर्वी चित्रपटाच्या टीमने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. या अतिभव्य ऐतिहासीक मराठी चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. रायगडावर रंगलेल्या या मंगलमय सोहळ्याला चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम यांच्यासह विविध गावातील शेतकरी, माजी सैनिक आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीडचे ग्रामस्थ आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.
‘सरसेनापती हंबीरराव’ या अतिशय भव्यदिव्य मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सरसेनापती हंबीरराव मोहिते तसेच बहिर्जी नाईक, सोयराबाई, औरंगजेब, संताजी धनाजी आणि सर्जाखान या महत्वाच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे, तसेच लवकरच चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात होणार असून २०२० मध्ये ‘सरसेनापती हंबीरराव’ प्रदर्शित होणार आहे.