Suruchi Adarkar to play a teacher in ‘Chotya Bayochi Mothi Swapna’
Marathi serial ‘Chhotya Bayochi Mothi Swapna’ (छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं) is being telecast on Sony Marathi channel at 8.30 pm from Monday to Saturday. This serial has presented a different subject based on the determination of a girl to acquire high education so as to pursue her dream of becoming a doctor. Though after the arrival of Shubhankar in their lives, the mother and daughter find some support. But, after the death of her Mother, will Bayo face a biggest hurdle in her education?
However, with the entry of Suruchi Adarkar in the role of a Teacher – Anu Desai, will the things change in Bayo’s life. Will Bayo also find support of Anu Desai. This remains to be seen in forthcoming episodes of this serial. This is the first time Suruchi appears in the role of a teacher and therefore her fans and well wishers are happy to see her in this new appearance.
Mayuri Wagh returns to small screen with ‘Ekvira Aai’
Talented actress Mayuri Wagh who is known for her notable performances in TV serials ‘Asmita’ and ‘Ti Phulrani’ has returned with a new devotional TV serial ; Aashirwad Tujha Ekvira Aai (आशीर्वाद तुझा एकविरा आई)’ on Sony Marathi channel. Mayuri has been offered parallel lead role along with Amruta Pawar in this serial. Both are working together for the first time.
Mayuri who likes to perform variety of roles, will be playing the character of Goddess Ekvira Devi who has plenty of devotees scattered all over the world. Even otherwise, serials based on mythological subjects have always received good response from home viewers. And Mayuri being a popular actress, this serial is also expected to receive popularity. There is plenty of scope for special effects, as noticed in the promos.
‘गाथा नवनाथांची’ मालिकेने गाठला ४०० भागांचा टप्पा
‘गाथा नवनाथांची’ (Gatha Navnathanchi)या सोनीमराठी वाहिनीवरील मालिकेने प्रेक्षकांना भक्तिरसात तल्लीन केलं आहे नाथसंप्रदायाविषयीची माहिती या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांना विशेष भावतेय. मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ यांसारख्या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरत असतानाच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा नुकताच गाठला आहे.
आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती असं सगळं या मालिकेत पाहायला मिळालं, नाथांचे वेगवेगळे चमत्कार मालिकेच्या पुढल्या भागांत पाहणं रंजक ठरणार आहे. बालक रेवणनाथांचा नाथपंथाच्या दिशेकडील प्रवास आता मालिकेत सुरू झाला आहे. या मालिकेतील कलाकारांच्या भूमिकेचे विशेष कौतुकही होतंय.
महानायक अशोक सराफ यांची ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर उपस्थिती!
दोन आठवड्यांपूर्वी सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती (kon honaar crorepati)’ या कार्यक्रमाचं नवं पर्व सुरू झालं.मनोरंजनसृष्टीतील अथांग सागरामध्ये अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे विनोदाचे बादशाह अशोक सराफ ज्ञान आणि मनोरंजनाच्या अद्भुत खेळात म्हणजे ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर सहभागी होणार आहेत.
‘कोण होणार करोडपती’च्या आगामी भागात मराठी मनोरंजनसृष्टी ज्यांना ‘अशोक मामा’ म्हणून ओळखते असं अभिनयाचं स्वतंत्र बेट असणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) उपस्थित राहणार आहेत. त्यांना या मंचावरून ऐकणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. अशोक मामांनी वयाची पंच्याहत्तरी नुकतीच पूर्ण केली असली, तरी त्यांचा या वयातला उत्साह दांडगा आहे. अशोक सराफ यांच्याबरोबर त्यांचे धाकटे बंधू सुभाष सराफ आणि पत्नी निवेदिता सराफ यांच्या भगिनी डॉ. मिनल परांजपे हेही सहभागी होणार आहेत.
अशोक सराफ यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्याला आणि दिलदार माणसाला ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर पाहणं, ही प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद आणि आनंददायी गोष्ट असणार आहे. पाहायला विसरू नका – ‘कोण होणार करोडपती’ – विशेष भाग, 25 जून, शनिवारी रात्री 9 वा. आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
Madhura Velankar Satam returns to television with a challenging role
Renowned Marathi stage- television and film actress Madhura Velankar Satam is back on small screen. This time she plays the mother of an 18 year old daughter, in the ongoing popular Marathi serial ‘Tumchi Mulgi Kaay Karte? (तुमची मुलगी काय करते?)’ which is aired on Sony Liv Marathi.
Talented, versatile actress that she is, Madhura has found this strong central character of Ms. Shraddha Mirajkar in this thrilling serial on a timely subject. The serial shows the concern of a mother- a school teacher, when she finds that her daughter has gone missing and is alleged to have been part of a rave party which has connection with people in drug business.
There is plenty of scope for Madhura in this serial, when she notices that both her husband and her daughter have lied to her about her daughter’s actual plans to attend the said party. Madhura faces the challenge to search her daughter and prove her not guilty. This is a well presented serial, but the overall 22 minutes time plus commercials every episode is too less for this thriller.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ मालिकेचे १०० भाग पूर्ण
महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतं आहे.
ज्ञानेश्वर माउलींवर पहिल्यांदाच मालिकेची निर्मिती झाली आणि नेहमीचं वेगळ्या धाटणीच्या आणि विषयाच्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या सोनी मराठी वाहिनीने तो विडा उचलला. दिगपाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर अशा दिगज्ज मंडळींकडून ही कलाकृती घडतेय. प्रेक्षकांची ही ‘ज्ञानेश्वर माउलीं (Dyaneshwar Mauli)’ या मालिकेला खास पसंती मिळतेय.
या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडत आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचत आहे.
१७ जानेवारीला या मालिकेचे १०० भाग पूर्ण होत आहेत. मालिकेत पैठणच्या धर्मसभेतून शुद्धिपत्र मिळवून माउली आणि भावंड आपल्या आजोळी म्हणजेच आपेगांवी पोचली आहेत. आपल्या दिव्यत्वाची प्रचिती देत माउली आणि भावंडांची गोष्ट हळूहळू पुढे जात आहे. येत्या काही भागांमध्ये नरबळी आणि अंधश्रद्धा यांना माउलींनी कसा विरोध केला हे पाहायला मिळणार आहे.
आळंदीच्या चैतन्य देवढेला मिळाली पार्श्वगायनाची संधी!
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवडलेल्या या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे आळंदीचा चैतन्य देवढे (Chaitanya Devadhe). ‘मूर्ती लहान पण किर्ती महान’ हे तंतोतंत लागू पडणारा चैतन्य आयडलच्या मंचावर ‘माउली’ म्हणून लोकप्रिय आहे. इंडियन आयडल हा मंच स्वप्नपूर्तीचा आहे. चैतन्यला आता पार्श्वगायक होण्याची संधी मिळणार आहे.
‘इंडियन आयडल मराठी’ या मंचावर येणार गायिका साधना सरगम
दोन दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम , सोनी मराठी वाहिनीवर ‘इंडियन आयडल मराठी’ ह्या कार्यक्रमाच्या यंदाच्या आठवड्यात विशेष पाहुण्या म्हणून येणार आहेत. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. या संस्थेने केली आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल असल्याने कार्यक्रमाची रंगत वाढते आहे. सर्वोत्तम १४ स्पर्धकांमधून महाराष्ट्राला ‘इंडियन आयडल मराठी’चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे
१९८२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘विधाता’ या चित्रपटातली ‘सात सहेलियां खडी खडी’ हे गाणे गाऊन साधना यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यांनी आत्तापर्यंत ३४ भाषांमध्ये १५ हजारांहून अधिक गाणी गायली आहे. ‘सातसमंदर पार मैं तेरे पीछे पीछे गई’ या गीताने ९० च्या दशकात धूम केली होती. हे गीत गाणाऱ्या साधना सरगम यांच्या अनेक गाण्यांनी लाखो चाहते घायाळ आहेत. ‘हर किसी को नहीं मिलता’, ‘मैं तेरी मोहोब्बत में’, ‘तेरी उम्मीद तेरा इंतजार’ आणि ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्यांतून रसिकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या साधनाने तब्बल ३४ भाषांत गीतं गायली. कल्याणजी-आनंदजी जोडीपासून ए. आर. रहमानपर्यंत प्रत्येकानी त्यांचं कौतुक केलं. उदित नारायण यांच्याबरोबर ‘जो जीता वही सिकंदर’ या सिनेमातलं गाजलेलं गाणं ‘पहला नशा पहला खुमार’ गाऊन प्रसिद्धीझोतात आलेल्या साधना सरगम या ‘इंडियन आयडल मराठी’ या मंचावर स्पर्धकांचं मनोबल वाढवून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत.
Makers of ‘Ajunahi Barsat Aahe’ celebrate 100 episodes
Produced by Vidydhar Pathare and directed by Kedar Vaidya, the popular Marathi TV serial which was premiered on 12th July 2021 has now completed 100 episodes. Recently, in the latest episode we saw the wedding of the lead pair Mukta Barve and Umesh Kamat taking place in a dream sequence. So, it is expected that their characters Dr. Meera and Dr. Aadiraj will get married soon in the coming episodes.
At present we are watching Dr. Aadiraj’s father Dr. Sudhir Pathak in deep trouble and is being helped by his friend Dr. Vaishampayan, who in return is demanding the marriage of his daughter Sanika to Dr. Aadiraj. At the same time we find Dr. Meera’s friend Dr. Nikhil trying to help Dr. Vaishampayan in his mission, so that he could marry Dr. Meera. But, will this happen, when Dr. Aadiraj and Dr. Meera are made for each other? Let us wait and watch. One thing is sure that the big team of versatile artistes comprising of Rajan Bhise, Uma Sardeshmukh, Rajan Tamhane Suhita Thatte, Mihir Rajda, Samidha Guru, Sachin Deshpande, Sharmila Shinde, Sanket Karlekar, Purva Phadke, Vidyadhar Joshi, Prajakta Datar, Nikhil Rajeshirke, Smita Sarode Pallavi Vaidya and Mugdha Godbole ( guest appearance) have given their best performances to support the talented lead pair of Mukta and Umesh.
Gripping Screenplay by Rohini Ninave , good dialogues by Mugdha Godbole and appealing music by Ashok Patki are the other plus points of this serial for gaining popularity
‘ज्ञानेश्वर माउली’! – २७ सप्टेंबरपासून सोनी मराठीवर
महाराष्ट्रात आजही अस्तित्वात असलेल्या भक्तिसंप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला आहे. महाराष्ट्राला संतपरंपरेचा वारसा लाभला आहे. ज्ञानेश्वर ते ज्ञानेश्वर माउली हा प्रवास सोनी मराठीवरच्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २०२१ हे ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचं ७२५ वं वर्ष आहे. यानिमित्त प्रेक्षकांना दिव्यत्वाचं दर्शन अनुभवायला मिळणार आहे.
‘ज्ञानेश्वर माउली’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून ज्ञानेश्वर माउलींची चरित्रगाथा उलगडणार आहे. भगवद्गगीतेतला विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिणारे आणि पसायदानासारखी अजोड कलाकृती जगाला देणारे संत ज्ञानेश्वर यांची चरित्रगाथा या मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरांत पोचणार आहे.
‘ज्ञानेश्वर माउली’, २७ सप्टेंबरपासून संध्याकाळी ७ वा. सोनी मराठी वाहिनीवर…