मराठी चित्रपट ‘विकून टाक’ चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर
सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येते. १६ ऑगस्टला सोनी मराठी वाहिनीवर ‘विकून टाक’ या विनोदी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे. विनोदातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, समीर चौघुले, ऋजुता देशमुख, हृषीकेश जोशी, जयवंत वाडकर, वर्षा दांदले आणि चंकी पांडे यांच्या मुख्य भूमिका या चित्रपटात आहेत.
‘विकून टाक’ या चित्रपटात चंकी पांडे यांची एक विनोदी भूमिका असून ते एका शेखची व्यक्तिरेखा साकारत आहेत. गेली अनेक वर्षं चंकी पांडे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत विविध व्यक्तिरेखा साकारून नावलौकिक मिळवला आहे. चंकी पांडे यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
‘सोनी मराठी’ वाहिनीवर १६ ऑगस्ट, रविवारी चंकी पांडे यांचा पहिला मराठी चित्रपट ‘विकून टाक’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वा. होणार आहे.
‘Singing Star’ on Sony Marathi from 21st August
Each one of us have one song or the other on our lips. Sony Marathi have picked up such singers who are not professional singers but they love to sing songs. So, from 21st August they have decided to offer a platform to such selected singers, who will try to connect themselves with the audience through their singing performance. Young glamorous actress Ruta Durgule will anchor this show
Prominent personalities like multi talented Prashant Damle, National award winning singer Bela Shende and lyricist and singer Dr. Salil Kulkarni will be the judges for this show. To train these participants some experts from the field of music were engaged and they were paired along with the singer to offer some variety through this show. This will be the first reality singing show of Sony Marathi and therefore they are all set to make it a grand success from 21st August at 9 pm .
सोनी मराठीवर होणार हास्याची होम डिलिव्हरी
नऊ रसांपैकी एक महत्त्वाचा रस म्हणजे ‘हास्यरस’! इंग्लीशमध्ये एक म्हण आहे ‘लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन(laughter is the best medicine)’ आणि म्हणूनच प्रत्येकानं हासतं राहणं महत्त्वाचं आहे. चार्ली चॅप्लिननं जगाला दाखवलेला मूक विनोद असो किंवा दादा कोंडकेंचे धमाल विनोद! पुढच्या काळात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीनं आपल्या अफलातून अभिनयानं विनोदाची परिभाषा बदलून संवादशैली आणि देहबोली यांच्या मदतीनं विनोद कसा खुलवता येतो हे दाखवलं. मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव यांनीही विनोदाचं नवीन अंग प्रेक्षकांना दाखवलं. या सगळ्यांत विनोदात बदल होत गेले आणि विनोदाचे अनेक पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत.
सोनी मराठी वाहिनी असाच एक विनोदानं परिपूर्ण कार्यक्रम घेऊन येत आहे ज्याचं नाव आहे ‘लाफ्टर स्टार’! या कार्यक्रमाची खासियत अशी की यामध्ये सामान्य माणसाला आपली कला सादर करता येणार आहे. प्रसिद्धी मिळवण्याची संधी यामुळे अनेक होतकरूंना मिळणार आहे. अट फक्त एकच तुम्हांला समोरच्याला हासवता आलं पाहिजे.आपला एक मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोनी लिव्ह या अॅपद्वारे पाठवा.
लवकरच हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे, फक्त सोनी मराठी वाहिनीवर!
‘जय जय महाराष्ट्र माझा’ मधून महाराष्ट्राच्या शिलेदारांना मानवंदना
विविध कलागुणांनी संपन्न अशा महाराष्ट्राचे हे कलागुण अंगी जपत जगभरात महाराष्ट्राचा झेंडा उंच फडकवणाऱ्या शिलेदारांना समर्पित आहे, या आठवड्यातील ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा विशेष भाग. या भागात आपल्यातील कलागुणांना खतपाणी घालून महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्या कलाकारांना सलाम केला जाणार आहे. याशिलेदारांमध्ये दादा कोंडके, आशा भोसले, भालजी पेंढारकर, स्मिता पाटील, अरूण दाते, लक्ष्मण देशपांडे, व्ही शांताराम आणि सुरेश वाडकरांसारख्या दिग्गजांच्या कलाकृतींचं सादरीकरण होणार आहे.
मराठी सिनेमांमध्ये या सगळ्यांचं योगदान अपार आहे. या सिनेमांमधील नभ उतरू आलं, आला आला वारा, झुंजुर मुंजुर, भातुकली, या जन्मावर, आधा है चंद्रमा सारख्या गाण्यांतून यांच्या कारकीर्दीला सलाम केला जाईल. त्यांशिवाय दादा कोंडकेंच्या विच्छा माझी पुरी करा तर नाट्यकर्मी लक्ष्मण देशपांडेच्या वऱ्हाड निघाले लंडनलाचं सादरीकरण या भागात होईल. मराठी सिनेसृष्टीला भरभरून दिलेल्या या मंडळींच्या कलाकृतींनी नटलेला असेल, ‘जय जय महारष्ट्र माझा’चा हा भाग येत्या २३ आणि २४ मार्च ला सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे
सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट
हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही. १५०० सालचा तो काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा. सनई -चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा.
या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण वाचलं ही असेल पण सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे.
‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे.
अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा’ विवाह सप्ताह ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पहा सोनी मराठीवर.
‘Swarajya Janani Jijamata’ on Sony Marathi from 19th August
Chhatrapati Shivaji Maharaj the ideal King who has been the inspiration of the people of Maharashtra is worshipped like a God. And his mother Rajamata Jijaoo who was his first Guru is also known as the brave woman who encouraged her son to fight injustice. She was not only known as an ideal mother, the duty bound wife but also an efficient administrator.
Till now, we have seen the heroic deeds of Chhatrapati Shivaji Maharaj and also his brave son Sambhaji Maharaj through Marathi films and serials. Now, through the forthcoming Marathi TV serial ‘Swarajya Janani Jijamata’ the home viewers will get to see the strengths of this brave mother of Shivaji Maharaj . The serial is all set to be aired on Sony Marathi channel from 19th August from Monday to Saturday at 8.30 pm.
In a press conference held recently Sony Marathi Business head Mr. Ajay Bhalwankar unveiled the title song of this serial, which briefs important moments in the life of Rajmata Jijabai. On this occasion the entire team of lyricist , music director and singers were present along with director Vivek Deshpande, writers Vivek Apte & Prasad Thosar. This is the second production from Dr. Amol Kolhe, who is the producer of this serial along with Vilas Sawant and Ghanashyam Rao. Nishtha Vaidya and Amruta Pawar will be playing the younger and elder title roles of Jijaoo in this serial.
Speaking on the occasion, Dr. Amol Kolhe said that he very much wanted to show the new generation the importance of a brave mother and her timely decisions . “This serial will be a biggest tribute to Jijamata.”
Sangram and Amruta clash noticed in promo of new Marathi Serial ‘Me Tuzich Re’
First the lead pair enter into personal clashes, but soon they start liking each other. This has been a successful formula adopted by love stories seen on small screen. Will forthcoming Marathi serial ‘Me Tuzich Re’ be different from this traditional formula? It remains to be seen. But, in the meanwhile this serial is all set to go on air from 24th June and will be telecast @ 7 am between Monday and Saturday on Sony Marathi. The lead pair of this serial is played by tv stars Sangram Salvi and Amruta Deshmukh.
The promo of this serial which has been released, clearly shows how a Sangram playing a protagonist comes to the rescue of cricket lovers to save the plot and challenges Amruta supposed to start her project on this plot. And this gives a clear hint that in the initial episodes they will come face to face in a clash for seeking right to this place. So, it remains to be seen how their chemistry works in this serial which is expected to target the young generation. The remaining star cast of this film is not yet disclosed.
‘Kon Honar Karodpati’ begins this Monday
When Sony Marathi announced the launch of ‘Kon Honar Karodpati‘ Marathi Quiz show, there were many names in the mind of TV viewers as to who would host the show. Finally, the name of ‘Sairat‘ fame director Nagraj Manjule was announced. Now, the show begins this Monday @ 8.30 pm and will be aired between Monday and Thursday. The hosts feel that the tagline of this programme ‘Uttar Shodhla Ki Jag Badalta‘ ( which means ‘When you find an answer, you can change this world’).
‘Kon Honar Karodpati‘ programme would the finest opportunity for the people from Maharashtra, to test their knowledge and become a Karodpati. But, besides the selected participants, even the home viewers of this programme will be given an opportunity to win prizes. Also in the episode held on every Thursday will invite those people who have brought in the change in our society with their selfless service. A popular hero and a director will also play anchors of special shows of this Quiz Show.
सोनी मराठीच्या ‘सेलिब्रिटी मॉम्स’चा हटके स्टाईल ने मदर्स डे
आंतरराष्ट्रीय मातृदिन किंवा मदर्स डे ! आजची तरुणाई या निमित्ताने आईशी कनेक्ट होत हा सण साजरा करताना दिसते..
या निमित्ता ने सोनी मराठी ने ऋचा बर्वे, सीमा घोगले, गौतमी देशपांडे, मुग्धा गोडबोले, शीतल क्षीरसागर, आदिती शारंगधर, उज्वला जोग, पूर्णिमा अहिरे, विमल म्हात्रे, प्रज्ञा जावळे, राणी गुणाजी, रसिका धामणकर आणि मयुरी वाघ या सर्व आया आणि लेकीं च्या जोडीला मुंबईतील ‘एनरिच अकॅडमी’ या स्पामध्ये ट्रिटमेंटचे खास गिफ्ट दिले. या सर्वांनी सौंदर्याची निगा आणि काळजी घेणाऱ्या खास ट्रिटमेंट्स घेऊन रिलॅक्स केले.
या संधीचा फायदा घेत , या सर्व सेलिब्रिटी आई आणि मुलींनी , एकमेकांसोबत भरपूर वेळ देत , एकमेकांना अजून जाणून घेण्याचा प्रयत्न केला … कुणी नवा हेअरकट केला, तर कोणी हेअरवॉश केले, तर कुणी नखांवर सुंदरशी नेल आर्ट काढली. लेकिंनीही आपल्या मम्मासारखे ग्लॅमरस होऊन मिरवले. हा सुंदर मिलाफ घडवून आणल्याबद्दल सर्व सेलिब्रिटी मॉम्सनी सोनी मराठीचे विशेष आभार मानले आहेत.
Registration begins from 11th March for ‘Kon Honaar Karodpati’
Ever since Sony Marathi channel was launched, the audience has given a good response to all their programmes. The comments on social media praising the programmes of this channel is the best evidence. And therefore, keeping in mind the interests of their viewers, Sony Marathi will now be offering a reality show ‘Kon Honar Karodpati‘ and the man occupying the hot seat of this programme will be film maker Nagraj Manjule, who has attained popularity after the release of ‘Sairat‘.
So, to take part in this competition the interested people have to register themselves, by giving a missed call to 9164291642 or register on Sony Liv app between 11th March to 20th March 2019. Now, it remains to be seen how the Marathi viewers would respond to this Quiz show which gives an opportunity to test your knowledge and win money.