Tag Archives: मराठी

वादकाची कथा सांगणारा ‘तत्ताड’ चित्रपटाचं टीजर पोस्टर प्रदर्शित

राहुल गौतम ओव्हाळ लिखित आणि दिग्दर्शित ‘तत्ताड‘ या आगामी चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियाद्वारे नुकतंच लाँच करण्यात आलं. लक्षवेधी पोस्टर असलेल्या या चित्रपटातून एका वादकाची कथा पहायला मिळणार आहे. चंद्रभागा प्रॉडक्शन्स आणि डीके फिल्म्स एंटरटेन्मेंटच्या जीवन जाधव, प्रितम म्हेत्रे आणि डीके चेतन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमित माने चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

Marathi Movie 'Tattaad'
Marathi film ‘Tattaad’

रोहित नागभिडे, ऐश्वर्य मालगावे यांनी ‘तत्ताड‘ या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन, तर संजय नवगिरे, राहुल बेलापूरकर यांनी गीतलेखन केलं आहे. चित्रपटाच्या टीजर पोस्टरमध्ये गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर हाती क्लॅरोनेट असलेला वादक पहायला मिळतो. त्यामुळे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी वादक असण्याची शक्यता आहे. चित्रपटात कलाकार कोण आहे, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.

ऍक्शन, ड्रामा आणि रोमान्स यांचे पॅकेज असलेला ‘रॉकी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

स्वतःच्या अस्तित्वावर, कुटुंबावर आणि प्रेमावर घाला घालायला टपून बसलेल्या शत्रूला नेस्तनाबूत करणारा डॅशिंग रॉकी लवकरच मराठी चित्रपट ‘रॉकी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बागी-२‘ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक अदनान ए. शेख यांनी ‘रॉकी च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी दिग्दर्शन केले असून ‘एका उत्कृष्ट कलाकृतीचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Rocky Film Trailer Launch
Sandeep Salve And Akshaya Hindalkar

रॉकी‘ या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करत आहेत. या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील प्रसिद्ध अभिनेते राहुल देव यांनी एका जोरदार भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर असून दिग्दर्शन अदनान ए. शेख यांचे आहे. चित्रपटाचे कथालेखन अदनान ए. शेख व विहार घाग यांनी केलं असून संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. ऍक्शनपॅक्ड ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

फुलपाखरूमध्ये अवतरणार पेशवाई!!

दिग्दर्शक मंदार देवस्थळी हे नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांची फुलपाखरू ही मालिका तरुणांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. मानस आणि वैदेही हे तर आजच्या तरुणाईचे जीव की प्राण आहेतंच मात्र आता त्यांचं होणार बाळ म्हणजे काय असेल याची कल्पना करूच शकता . बाळाचं बारसं विशेष पद्धतीने करण्यात येणार आहे।।
Phulpakhru Serial songs, Hruta Durgule, Peshwai Style
Phulpakhru Serial songs, Hruta Durgule, Peshwai Style
एक ड्रीम सॉंग आपणास उद्याच्या भागात पहायला मिळणार असून पेशव्यांच्या घरातील बाळाचे ज्याप्रमाणे राजेशाही पद्धतीने बारसे  होत असे,  त्यापद्धतीने हे गाणे शूट केले गेले आहे .
यात मानस आणि वैदेहीचे संपूर्ण कुटुंब मराठमोळ्या पेशवाई पद्धतीच्या कपड्यांमध्ये असून मराठमोळ्या राजघराण्याच्या आभास निर्माण करण्यात आले आहे. सगळेच अतिशय सुंदर दिसत आहेत आणि मुख्यतः मानस वैदेहीची मुलगी तर अगदीच राजबिंड दिसत आहे. हा एपिसोड  उद्या, १० फेब्रुवारीला  रात्री ८ वाजता झी युवावर पाहायला मिळेल.

‘वर्तूळ’ या मालिकेत मीनाक्षी आणि अभिजीत चे लग्न

वर्तुळ‘ ही नवी मालिका नावाप्रमाणेच माणसाच्या आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. विकास पाटील, विजय आंदळकर आणि जुई गडकरी यांच्या अभिनयाने सजलेली ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स स्टोरी आहे. जुई मीनाक्षीची या पात्राची भूमिका साकारत आहे. तर अभिजित परांजपे म्हणजे अभिनेता विकास पाटील हा कथेचा नायक आहे. अभिजित मीनाक्षीला स्वतःच्या घरी घेऊन जातो. कालांतरानें त्या दोघांमध्ये प्रेम होते आणि आता येत्या रविवारी १० फेब्रुवारीला रात्री ९ वाजता ‘वर्तुळ‘ या मालिकेचा महा एपिसोड दाखवला जाणार आहे . यात मीनाक्षी आणि अभिजीत चे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये घडणार आहे . या लग्नात ‘फुलपाखरू‘ चे कलाकार त्याचप्रमाणे ‘सूर राहू दे‘ चे कलाकार सुद्धा नवजोड्याला शुभेच्छा द्यायला येतील. ‘फुलपाखरू‘ या मालिकेतील मानस या संगीत मध्ये एक सुंदर गाणं गाणार आहे .

 Jui Gadkari and Vikas Patil, Marathi serial 'Vartul'
Vikas Patil and Jui Gadkari, Marathi serial ‘Vartul’

वर्तुळ‘ या मालिकेत तसं पाहता मीनाक्षीने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या होत्या मात्र आता तिने तीच आयुष्य मोबाईल मध्ये रेकॉर्ड करून अभिजीत ला पाठवले आहे. पण अजूनही अभिजीत ने तो ऑडिओ ऐकला नाही आहे . या लग्नात काही भयंकर घडेल का ? अभिजीत सोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मिनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचं नातं टिकून राहणार का? असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात उठत आहेत .

मराठी चित्रपट ‘छत्रपती शासन’ १५ मार्च रोजी प्रदर्शित

प्रबोधन फिल्म्स प्रस्तुत ‘छत्रपती शासन‘ सिनेमा येत्या १५ मार्च २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या विचारांची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘छत्रपती शासन‘ चित्रपट होय. महाराजांचे विचार हे आजच्या काळात प्रत्यक्षात आचरणात आणण्यासाठी साकारण्यात आलेला प्रयत्न म्हणजे ‘छत्रपती शासन‘. या सिनेमाचा पोस्टर लॉँच सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मा.खा.श्री. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते नुकताच पार पडला. उत्कर्ष कुदळे, प्रियांका कागले आणि खुशाल म्हेत्रे यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन खुशाल म्हेत्रे यांनी स्वतः केलं असून कथा, संवाद देखील त्यांचेच आहेत.

Marathi Film Chhatrapati Shasan
पोस्टर रिलीज करताना मा. खा. उदयनराजे भोसले यांच्या समवेत चित्रपटाचे लेखक_दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे व सहनिर्माते अमर पवार

अभिनेता मकरंद देशपांडे, किशोर कदम, संतोष जुवेकर, अभिजीत चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका असून सायली काळे, धनश्री यादव, किरण कोरे, सायली पराडकर, मिलिंद जाधव यांचा अभिनय देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. गीतकार डॉ. विनायक पवार, नंदेश उमप, दीपक गायकवाड, राजन सरवदे यांच्या लेखणीतून सजलेल्या गाण्यांना नंदेश उमप, रोहित नागभिडे, सचिन अवघडे, अभिजित जाधव, राजन सरवदे यांनी संगीत दिलं आहे. गायक नंदेश उमप, उर्मिला धनगर, जान्हवी प्रभू अरोरा, अभिजित जाधव, राजन सरवदे या गायकांच्या विविधांगी आवाजांचा स्वरसाज सिनेमातील गाण्यांना चढला आहे.

ध्वजारोहण सोहळ्यामध्ये संदीप कुलकर्णी यांची उपस्थिती

प्रजासत्ताक दिनी ‘डोंबिवली रिटर्न‘ या चित्रपटाचा नायक अनंत वेलणकर अर्थात संदीप कुलकर्णी यांची डोबिंवली रेल्वे स्टेशनवर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये विशेष उपस्थिती लाभली होती. चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई निर्माते महेंद्र अटोले डोंबिवली रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर, सहायक स्टेशन मास्तर, रेल्वे प्रवाशी संघटना, जनरल रेल्वे पोलीस, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स, उपस्थित होते.

Actor Sandeep Kulkarni
Actor Sandeep Kulkarni

नियतीने जशा गोष्टी जुळून येतात तसा योग खरंतर आज जुळून आलाय. माझ्या माध्यम आणि सिनेमाच्या निमित्ताने डोंबिवलीशी माझा जवळचा संबंध आहे.माझे मित्र नातेवाईक ही डोंबिवली मध्ये राहतात. आजचा हा दिवस अभिमान, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.
डोंबिवली रिटर्न‘ या चित्रपटात संदीप कुलकर्णी यांनी सर्वसामान्य नोकरदाराची भूमिका केली आहे. हा अनंत वेलणकर लोकलमधून धक्के खात रोज प्रवास करत असतो. त्याच्या आयुष्यातल्या एका घटनेमुळे काय घडतं याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. करंबोला क्रिएशन्सची निर्मिती असलेला, महेंद्र तेरेदेसाई दिग्दर्शित हा चित्रपट २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान एकत्र दिसणार ‘शिमगा’ चित्रपटात

शिमगा… कोकणातील सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेचं दर्शन घडवणारा हा सण. होळीचा सण म्हणजे मनातलं, दारातलं, घरातील सर्व वाईट, अमंगळ, अभद्र जाळून टाकायचा सण. एकंदरच कोकणात उत्साहाचं, जल्लोषमय वातावरण असतं. अशीच जोशपूर्ण कथा आपल्याला श्री केळमाई भवानी प्रॉडक्शन निर्मित ‘शिमगा‘ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर लाँच झालेल्या पोस्टरवरून या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली असतानाच आणि कोकणात शिमग्याचा उत्स्फूर्त माहौल असतानाच म्हणजेच १५ मार्च रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Marathi movie 'Shimga'
Bhushan Pradhan and Rajesh Shringarpure in Marathi movie ‘Shimga’

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गणेशवाडी येथील कोकणचे सुपुत्र निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा दिग्दर्शित व लिखित या चित्रपटात राजेश शृंगारपुरे आणि भूषण प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरवरून तरी या चित्रपटात प्रेक्षकांना ‘शिमग्या’चं वेगळं रूप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ‘शिमगा‘ चित्रपटाचे संगीत पंकज पडघन यांचे असून गुरु ठाकूर आणि वलय यांची गीते आहेत. चित्रपटाच्या छायाचित्रीकरणाची धुरा अनिकेत खंडागळे यांनी सांभाळली आहे.

‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमातून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा

Uddhav Thackeray and Aditya Uddhav Thackeray
Uddhav Thackeray and Aditya Uddhav Thackeray

कलर्स मराठी प्रस्तुत ‘मानाचा मुजरा‘ कार्यक्रमातून राजकारण, क्रिकेट, संगीत, अभिनय अशा निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे, युवा शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, विनोद कांबळी, राजू कुलकर्णी, गायक सुरेश वाडकर अभिनेता सुबोध भावे यांसारख्या विविध क्षेत्रातील रथी-महारथींना एकाच वेळी एकाच स्टेज वर स्तुत्यभाव रेखाटताना पाहण्याचा विलक्षण योग अद्वितीय आहे. बाळासाहेब ठाकरे यांना ‘मानाचा मुजरा’ या कर्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, संपूर्ण ठाकरे कुटुंबिय एकत्र उपस्थित असणं ह्या कार्यक्रमाचे विशेष औचित्य दर्शवते. सुधीर गाडगीळ, द्वारकानाथ संझगिरी, अवधूत गुप्ते यांसारख्या अवलियांच्या प्रश्नांनी कधी भावनिक करून तर कधी नर्मविनोदांनी कार्यक्रमास रंगत आणली.

बाळासाहेबांच्या आठवणीत रममाण होताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युती चर्चेत येणाऱ्या अडचणींवर बाळासाहेब मोठ्या मनाने निर्णय घेत व त्यामुळे युती टिकून राहिल्याचे सांगितले. बाळासाहेबांचे जीवश्च कंठश्च मित्र व राजकारणातील पारंगत व्यक्तिमत्त्व शरद पवार बाळासाहेबांना ‘दिलदार शत्रू’ची पदवी देत लहानातील लहान माणसाचे कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करायच्या बाळासाहेबांच्या वृत्तीची ओळख करून दिली. एरव्ही महाराष्ट्रातील झंझावतं वादळ म्हणून ओळखले जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राटांमधील एक वडील व आज्या उलगडताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे भावुक झाले.

Avadhoot Gupte Music Director
Singer, music Avadhoot Gupte

बाळासाहेबांचे क्रिकेट वरील प्रेम कधीच कोणापासून लपून राहिले नाही. वेळोवेळी बाळासाहेबांनी दिलेले धिराचे शब्द आजही हृदयात कोरले असल्याचे सांगत षटकारांचा बादशाह सुनील गावस्कर बाळासाहेबांच्या आठवणींत विलीन झाला. सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त पित्यासमान बाळासाहेबांच्या असीम प्रेमाचे दाखले देताना सांगतो की,”मी जेल मध्ये असताना जेव्हा सर्वांनी माझी साथ सोडलेली तेव्हा, ‘काळजी नसावी, मी आहे इथे’ बोलणारे साहेब एकचं होते.”
संजय राऊत प्रस्तुत, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, कार्निवल मोशन पिक्चर्स आणि राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी निर्मित ‘ठाकरे‘ येत्या २५ जानेवारी ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.

‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेमध्ये अनु आणि सिध्दार्थ नातं तोडण्याचा प्रयत्न

He Man Baware Serial
Mrunal Dusanis and Shashank Ketkar In Marathi serial ‘Sukhachya Sarini He Man Baware’

कलर्स मराठीवरील ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे‘ मालिकेला वेगळेच वळण मिळाले आहे. अनुची चिंता दूर झाली आहे कारण तिला आता जॉब लागला आहे. प्रणयला याबाबत कुठलीही कल्पना नाही. अनुच्या वाईटावर असलेला प्रणय अनुला दुर्गच्या मनातून उतरवण्यासाठी आणि दुर्गाच्या मनात अनु विषयी गैरसमज निर्माण करण्यासाठी थेट दुर्गाच्या ऑफिस मध्ये जाऊन पोहचतो. दुर्गाला तो अनुविषयी बऱ्याच वाईट गोष्टी सांगतो. सिद्धार्थने अनुपासून त्याची ओळख लपवली असून तो हरी बनूनच अनुला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. हे सत्य दुर्गासमोर आल्यावर तिचा विश्वास बसत नाही. सिध्दार्थ आणि अनुमधले नातं तोडण्यासाठी दुर्गा एक कट रचते.

दुर्गाला अनु अजिबात आवडत नसल्याने आणि अनुबद्दल दुर्गाच्या मनामध्ये पहिल्यापासून असलेले गैरसमज या सगळ्यामुळे त्या दोघांमध्ये असलेले मैत्रीचे नाते दुर्गाला खटकत आहे. ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे‘ या मालिकेत पुढील भागांमध्ये प्रेक्षकांना बऱ्याच रंजक घटना बघायला मिळणार आहेत. दुर्गाला हे माहिती आहे कि, जर तिने सिध्दार्थला अनु पासून तोडण्याचा प्रयत्न केला तर सिध्दार्थ तिच्या विरोधात जाऊ शकतो. आणि म्हणूनच दुर्गा अनुला सिध्दार्थचे सत्य लवकरच सांगणार आहे कि, तो हरी नसून सिद्धार्थ म्हणजेच तिचा मुलगा आहे.

घाडगे & सून मालिकेमध्ये उषा नाडकर्णी यांची एन्ट्री

Marathi serial 'Ghadge And Suun'
Usha Nadkarni, Marathi serial ‘Ghadge And Suun’

कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘घाडगे & सून‘ या मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. मालिकेमध्ये घराची विभागणी झाली आहे… अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये परतल्यानंतर अमृता घर सोडणार अस सांगते यामुळे अण्णा आणि माई अमृताला संपत्तीमधला काही हिस्सा द्यावा… आणि यावरूनच वसुधा भांडणाची एक ठिणगी पाडते. आणि आता या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये एक वेगळेच वळण येणार आहे… कारण घाडगे सदन मध्ये एक नवी एन्ट्री होणार आहे… महाराष्ट्राच्या लाडक्या आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी या एका महत्वाच्या भुमिकेमध्ये मालिकेमध्ये दिसणार आहेत. या मालिकेमध्ये त्यांची भूमिका कशी असेल ? हे बघणे रंजक असणार आहे.

घाडगे & सून‘ या मालिकेमधील घाडगे सदन मध्ये माईची चुलत सासू म्हणून उषाजींची एन्ट्री होणार आहे… आणि त्यांच्या स्वागताची लगबग आता सुरु झाली आहे… कियारा आणि अक्षयचे लग्न झाले आहे याची माहिती येणाऱ्या पाहुण्याला नसल्याने पुन्हाएकदा साडी आणि मंगळसूत्र घातलेली अमृता प्रेक्षकांना दिसणार आहे… या नव्या पाहुण्याच्या येण्याने विभक्त झालेले घाडगे कुटुंब एकत्र येईल का ? कोणाची मकर संक्रांत साजरी केली जाणार अमृता कि कियारा ? मकर संक्रांत निर्विघ्नपणे पार पडेल का ? हे बघायला विसरू नका ‘घाडगे & सून‘ मालिकेमध्ये उद्या रात्री ८.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर.