राजा चित्रपटातून उलगडणार प्रेमातील नवे पैलू
‘राजा‘ या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने आजवर समोर न आलेले प्रेमातील नवे पैलू आपल्यासमोर येणार आहेत. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा‘ या सिनेमाची कथा सादर केली आहे.
निर्माते प्रवीण काकड यांनी ‘सत्यसाई मल्टिमिडीया प्रा. लि.‘ या संस्थेअंतर्गत ‘राजा‘ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शनासोबतच सिनेमाच्या लेखनाची जबाबदारीही शशिकांत देशपांडे यांनी सांभाळली आहे. ‘राजा‘ या सिनेमाची कथा एका पॅाप सिंगरच्या जीवनावर आधारित आहे. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून राजा’ ची कथा सादर केली आहे. राजाच्या जीवनात येणाऱ्या दोन्ही नायिका त्याला त्याच्या प्रवासात यथोचित साथ देतात.
नवोदित अभिनेता सौरदीप कुमार , स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे याखेरीज शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, मिलिंद इनामदार, पौरस आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत.
‘बिग बॉस’च्या घरामध्ये मेघा धाडे का चिडली अनिल थत्तेवर ?
कलर्स मराठीवरील सध्या गाजत असलेली ‘बिग बॉस‘ मराठी मध्ये बिग बॉसने घरातील प्रत्येक सदस्याला त्यांची संघर्षगाथा घरच्यांना आणि स्पर्धकांना सांगण्याची संधी दिली. या टास्क मध्ये एकएक करून प्रत्येक स्पर्धकाने त्यांची संघर्षगाथा सांगण्यास सुरुवात केली. हे सांगत असताना घरातील सगळे भावूक झाले. ‘बिग बॉस‘च्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारे अनिल थत्ते यांची वेळ येताच त्यांनी आपली संघर्षगाथा न सांगता आपला जीवनप्रवास सांगायला सुरुवात केली.
आपली संघर्षगाथा सांगण्याच्या टास्क मध्ये अनिल थत्ते यांनी बराच वेळ घेऊन अनावश्यक गोष्टी देखील स्पर्धकांना सांगितल्या. या कारणामुळे आस्ताद काळे अनिल थत्ते यांच्यावर चिडला आणि त्यांना खडसावून सांगितले कि, ईतका वेळ आपल्याकडे नसून त्यांनी लवकारात लवकर एक महत्वाचा क्षण सांगून आपले बोलणे संपवावे. अनिल थत्ते यांच्या अश्या वागण्यामुळे बाकीच्या स्पर्धकांना त्यांची संघर्षगाथा सांगायला पुरेसा वेळ मिळाला नाही. याच मुद्द्यावरून मेघा आणि आरती या दोघांनीही आपली नाराजी अनिल थत्तेकडे व्यक्त केली. मेघा आणि आरतीने त्यांना न पटलेली ही गोष्ट अनिल थत्ते यांच्या निदर्शनास आणून दिली.
प्रेमाची ‘रॉमकॉम’ गोष्ट लवकरच येणार पडद्यावर
वेगळ्या पद्धतीनं प्रेमाचा शोध घेणारा, ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट निर्मित आणि गोरख जोगदंडे दिग्दर्शित ‘रॉमकॉम’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा मुहूर्त दिमाखात करण्यात आला.
‘रॉमकॉम’ या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. चित्रपटांसाठी वेडा असलेला राहुल आणि सुसंस्कृत घरातली सुमन यांच्यातलं प्रेम यशस्वी होतं का, सुमनला मिळवण्यासाठी राहुलला काय काय करावं लागत हे मनोरंजक आणि धमाल पद्धतीनं या चित्रपटात पहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे छायाचित्रण अनिकेत करंजकर ह्यांनी केले असून साजन पटेल ह्यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे . ‘रॉमकॉम’ ह्या चित्रपटात किशोर कदम, छाया कदम, अशोक शिंदे, स्वाती पानसरे, मिलिंद गवळी, मृदुला वैभव ह्यां कलाकारांनी काम केले आहे. युवा अभिनेता सारंग दोशी आणि मधुरा वैद्य ही जोडी या चित्रपटाद्वारे पदार्पण करते आहे.
मराठी चित्रपट ‘शिकारी’ 20 एप्रिल पासून प्रेक्षकांच्या भेटीस
‘शिकारी‘ हा चित्रपट महेश मांजरेकर यांनी प्रस्तुत केला असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंटचे विजय पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. आनंद वैद्यनाथन हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मराठी मलिका ‘दिल दोस्ती दुनियादारी‘ने घराघरात पोहोचलेला आणि स्वतःचे असे वेगळे स्थान अभिनयाच्या क्षेत्रात निर्माण केलेला सुव्रत जोशी आणि नेहा खान या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. नेहा खान या चित्रपटातून चित्रपटसृष्टीतील आपले पदार्पण करत आहे. त्यांच्याबरोबर कश्मीरा शाह, मृण्मयी देशपांडे, भालचंद्र कदम, वैभव मांगले, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही महत्वाच्या भूमिका यात आहे.
अजित परब, समीर म्हात्रे, शैलेंद्र बर्वे आणि चिनार महेश यांचे संगीत ‘शिकारी‘ या चित्रपटाला लाभले आहे. श्रीरंग गोडबोले, गुरु ठाकूर, अखिल जोशी, जितेंद्र जोशी आणि कुमार यांनी चित्रपटाची गाणी लिहिली आहेत. ‘शिकारी‘ चित्रपटात पाच गाणी असून ती अवधूत गुप्ते, उर्मिला धनगर, आनंदी जोशी, जुली जोगळेकर, दिव्या कुमार, अपेक्षा धांडेकर आणि रिंकी गिरी यांनी गायली आहेत.
‘कुंकू टिकली आणि टॅटू’ सोमवार पासून कलर्स मराठीवर
कलर्स मराठीवर युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. या मालिकेमध्ये गुरुराज अवधानी, विष्णुपंत कुलकर्णी ही भूमिका साकारणार असून, सारिका निलाटकर – नवाथे विभा कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. यांच्यासोबत निवोदित भाग्यश्री न्हालवे, आदिश वैद्य, श्वेता पेंडसे, अमोल बावडेकर, राजेश देशपांडे, राजश्री निकम, प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
‘कुंकू, टिकली आणि टॅटू‘ मालिकेच्या शीर्षक गीताचे नुकतेच रेकॉर्डिंग झाले असून बॉलीवूड तसेच मराठी सिनेमांमध्ये गाणी म्हंटल्यानंतर सुनिधी चौहान आता मराठी मालिकेकडे वळाली आहे. या मालिकेचे शीर्षक गीत सुनिधी चौहानच्या आवाजामध्ये स्वरबध्द करण्यात आले आहे. शीर्षकगीता मधूनच प्रेक्षकांना मालिकेच्या कथेविषयी माहिती मिळते. शीर्षक गीत मंदार चोळकर याने लिहिले असून रोहन – रोहन यांनी या गाण्याचे संगीत दिग्दर्शन केले आहे. शीर्षक गीताचे नृत्यदिग्दर्शन मराठीतील सुप्रसिध्द नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारे यांनी केले आहे.
‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ मालिकेतील शीर्षक गीतामध्ये सारिका निलाटकर, श्वेता पेंडसे आणि भाग्यश्री न्हावले तसेच मालिकेमध्ये आजी यांवर चित्रित केले आहे.
‘जगा वेगळी अंतयात्रा’ चित्रपट आज पासून सर्वत्र प्रदर्शित
‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमाद्वारे, आपल्या विशेष विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे भाऊ कदम ह्यांची मुख्य भूमिका असलेला ‘जगा वेगळी अंतयात्रा‘ हा मराठी चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. या चित्रपटात स्ट्रगलर्ससाठी भाऊ हे स्टगलर्सना मार्गदर्शन करतांना दिसणार आहेत .
इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट असे उच्चशिक्षित असून नोकरीसाठी स्ट्रगल करणाऱ्या चार तरुणांची गोष्ट या चित्रपटात उलगडली आहे. सुशिक्षित बेकारीच्या यक्षप्रश्नावर हे तरूण, नंदू काका (भाऊ कदम ) ह्यांच्या मदतीने कशा पद्धतीनं मार्ग काढतात हे आपण ह्या चित्रपट पाहायला मिळणार आहे.
डॉ. नितीन श्याम तोष्णीवाल यांच्या अल्टिमेट फिल्म मेकर्स प्रा.ली. या निर्मिती संस्थेने ‘जगा वेगळी अंतयात्रा‘ चित्रपटाची निर्मिती केली आहे. अमोल लहांडे यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता भाऊ कदम, माधव अभ्यंकर, राजन भिसे, सुहास परांजपे यांच्यासारख्या अनुभवी कलाकारांसह सुप्रीत कदम, ओंकार पुरोहित, विनम्र भाबल, डॉ. विशाल गोरे या नव्या दमाच्या कलाकारांनी चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत. रोहन रोहन या आजच्या पिढीच्या संगीतकारद्वयीनं चित्रपटाचं संगीत केलं आहे. चित्रपटाचं शीर्षक जरी गंभीर वाटलं, तरी हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार आहे.
‘बालरंगभूमी अभियान’ संघटनेचा उदघाटन सोहळा
महाराष्ट्रातील बालरंगभूमी चळवळ परिपूर्ण होण्यासाठी बालरंगभूमी संघटनेची निवड आम्हाला प्रकर्षाने जाणवली. यासाठी आम्ही महाराष्ट्रातील या क्षेत्रात कार्यरत असलेल्या २५ रंगकर्मींना एकत्र घेऊन अनुभवी ज्येष्ठ रंगकर्मींचा सल्ल्याने आणि त्यांच्या मार्गदर्शनात ‘बालरंगभूमी अभियान‘ या संघटनेची दि. ५ जुलै २०१७ रोजी स्थापना केली. नुकतेच ‘बालरंगभूमी अभियान‘ संघटनेचा रीतसर उदघाटन सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी मा.सौ.वर्षाताई विनोद तावडे तसेच ज्येष्ठ रंगकर्मी मा.श्री. विजय केंकरे, बालरंगभूमी अभियानाच्या अध्यक्षा मा. कांचनताई सोनटक्के आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
बालरंगभूमी विषयक विविध उपक्रमांची संख्या, व्याप्ती व दर्जा उंचावून बालरंगभूमी सकस व समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे. शालेय शिक्षकांना नाट्यप्रशिक्षण देणे. बालनाट्य किशोरनाट्य कुणारनाट्य सादरीकरणासाठी येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, जिल्हा समिती स्तरावर प्रयत्न करणे. बालनाट्याच्या प्रयोगांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळविण्यासाठी प्रयत्न करणे. शासनाच्या सह्याद्री आणि इतर खाजगी वाहिन्यांवर बालनाट्यासाठी वेळ राखून ठेवण्यासाठी तसेच रंगभुनीच्या इतर पुरस्कारांबरोबर बालनाट्याला पुरस्कार ठेवण्यासाठी व मिळविण्यासाठी प्रयत्न करणे, दर्जेदार बालनाट्य संहिता संग्रहित करणे. बालनाट्य मार्गदर्शनपर पुस्तिका छापून शासनाच्या मदतीने त्या शालेय शिक्षकांपर्यंत पोहचविणे ही बालरंगभूमी अभियानाची उद्दिष्टे आहेत.
लहानग्यांचा आयुष्याचा प्रवास उलगडणार ‘फिरकी’
स्पॅाटलाईट प्रोडक्शनच्या ‘फिरकी‘ या आगामी मराठी चित्रपटातून ‘पतंगा’ च्या चित्रचौकटीतून लहानग्याच्या भावविश्वाचा आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरेखरीत्या उलगडण्यात आला आहे. येत्या ९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मौलिक देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन व दिग्दर्शन सुनिकेत गांधी यांचे आहे.
फिरकीच्या मदतीने पतंगाचा प्रवास कधी उंच भरारीचा तर कधी हेलकावण्याचा असतो. आयुष्याचे ही असेच असते. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष आहे. ‘फिरकी‘ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या गोविंदला (पार्थ भालेराव) व त्यांच्या मित्रांना पतंग उडवण्याचा खूप नाद आहे.
अनेक राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलेल्या ‘फिरकी‘ चित्रपटात पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर, अभिषेक भाराटे, अथर्व उपासनी, अथर्व शाळीग्राम या बालकलाकारांसोबत हृषिकेश जोशी, ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, किशोर चौघुले या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. पटकथा व संवाद सुनिकेत गांधी, आदित्य अलंकार, विशाल काकडे यांनी लिहिले आहेत. छायांकन धवल गणबोटे तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.
रेश्मा कारखानीस यांचा शब्दांचा सुरेल काव्य प्रवास
कविता ही फक्त आपल्या स्वत:पुरतीच असते तर कधी तिचा सामूहिक आविष्कार होत असतो. व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर असलेल्या रेश्मा कारखानीस यांच्या मनातील अलवार भावनांना शब्दरूप लाभले आणि त्यातून साकार झाला ‘मी शून्य‘ या शब्दांचा सुरेल प्रवास.
साहित्याची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या रेश्मा यांना कविता स्फुरायला लागल्या आणि त्यातून साकार झाला विविध कवितांचा अनुभव देणारा ‘मी शून्य’ हा कविता संग्रह. कवितेला सुरांची साथ मिळाली तर तिचे सौंदर्य आणखी झळाळून येते. रेश्मा यांना गायक केतन पटवर्धन यांची चांगली साथ लाभली असून कवितांची सुरेल मैफल साकारणारा हा प्रवास सहजसुंदर आणि आनंददायी झाला.
प्रत्येक गोष्टीचं असणं अथांग अश्या नसण्यात आहे. असणंच काढून घेतलं तर उरतं नसणं या नसण्याचा प्रवास म्हणजेच ‘मी शून्य‘. या काव्यसंग्रहाला मधु मंगेश कर्णिक व संगीतकार कौशल इमानदार यांची प्रस्तावना लाभली असून सुलेखनकार अच्युत पालव यांची सजावटीने या संग्रहाचे मुखपृष्ठ सजले आहे.
‘नवरा असावा तर असा’ कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकत आहे
आजपर्यंत आपण गृहलक्ष्मींना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी खेळताना बघितलं पण आता पहिल्यांदाच आपल्या लाडक्या गृहलक्ष्मीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचे नवरे या खेळात भाग घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा खानविलकर करत आहेत. नुकताच सुरु झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांची मने जिंकत आहे. कार्यक्रमामध्ये आलेल्या जोड्या हर्षदा ताईशी मनमोकळे पणे गप्पा मारतात, त्यांच्या कडू-गोड आठवणी, त्यांचा प्रवास सांगतात. प्रेक्षकांनी दिलेल्या पसंती आणि प्रेमानेमुळेच ‘नवरा असावा तर असा‘ या कार्यक्रमाने नुकतेच ५० भाग पूर्ण केले आहेत.
‘नवरा असावा तर असा‘ कार्यक्रमामध्ये बायको नवऱ्यासाठी आव्हान ठरवते आणि नवरा हे आव्हान पूर्ण करतो आणि जो पूर्ण करतो तोच त्या भागाचा विजेता ठरतो. यामध्ये गंमत अशी आहे कि, जिंकतो नवरा आणि बक्षीस मिळते बायकोला. या आगळ्यावेगळ्याने संकल्पनेमुळे हा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकत आहे.
अशीच धम्माल मस्ती, संसारगाथा आणि प्रेमकाहाणी हर्षदा ताई तुमच्यासाठी घेऊन येणार आहे कलर्स मराठीवर