‘गोठ’ या मालिकेत नीलकांती पाटेकर साकारतायत ‘बयो आजी’
ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘गोठ ‘ या नव्या मालिकेत त्या ‘बयो आजी’ ही करारी व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.
आजही आपल्या समाजात पुरुषसत्ताक संस्कृती असताना या मालिकेतून ‘स्त्रीचे निर्णय तिच्याच हाती ‘ हा विचार मांडण्यात आला आहे. फिल्मफार्म निर्मित या मालिकेचे दिग्दर्शन विघ्नेश कांबळे करत आहेत. कथानकाला असलेली तळकोकणाची पार्श्वभूमी, तिथली संस्कृती, संस्थानिक घराण्यांचा प्रभाव, बदलते कोकणी जनमानस आणि युवापिढी हे या मालिकेचं वेगळेपण ठरणार आहे.
नीलकांती पाटेकर यांनी पूर्वी दोन टीव्ही मालिकांची निर्मिती केली. चित्रपट, रंगभूमीवर काम केलं. मात्र ‘गोठ ‘ ही त्यांची अभिनेत्री म्हणून पहिलीच मालिका आहे. “दर तीन चार महिन्यांनी मला मालिका करण्याबाबत विचारणा व्हायची. मात्र, एकही भूमिका मला पसंत पडली नाही. टीआरपीच्या गणितानुसार व्यक्तिरेखा बदलणं मला पटत नाही. मला रोबोसारखं काम करायचं नव्हतं. त्यामुळे चांगली भूमिका ही माझी मुख्य गरज होती. ‘गोठ ‘ या मालिकेसाठी विचारणा झाली. भूमिका संवेदनशील होती. कथानक समजून घेतल्यावर आणि दिग्दर्शकाशी बोलल्यावर काहीतरी वेगळं करण्याची ही संधी वाटल्यानं ही मालिका स्वीकारली,”असं त्यांनी सांगितलं.
“या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. मालिकेतली प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळ्या पद्धतीनं लिहिली आहे. सिनेमॅटिक पद्धतीनं मालिका होणं हे खूप वेगळं आहे. या मालिकेच्या संपूर्ण टीमला नेमकं काय करायचं हे माहीत आहे. त्यामुळे कथानक खूप वेगळ्या पद्धतीनं समोर येणार आहे. या मालिकेत काम करताना मला वेगळे काम केल्याचे समाधान मिळते आहे. अशी वेगळ्या पद्धतीची मालिका केल्याबद्दल स्टार प्रवाहचं कौतुक करावंसं वाटतं. प्रेक्षकांनाही ही मालिका नक्की आवडेल,” असं त्यांनी आवर्जून सांगितलं.
राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा
मराठी विज्ञान परिषद व सांस्कृतिक कार्यसंचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसहभाग वाढावा हा त्यामागील उद्देश आहे. वेज्ञानिक आणि शोध या मध्यवर्ती संकल्पनेवर हि स्पर्धा घेण्यात येत आहे. वेज्ञानिक आणि शोध यात शास्त्रीय शोधाच्या जन्मकथावर आधारित एकांकिकेचा समावेश यात असावा . शात्रज्ञांना संशोधन करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले अनेक प्रकारच्या विचारांची घालमेल व अथक प्रयत्न यांच्यावर आधारित एकांकिका असावी . हे शात्रज्ञांचे जीवनचरित्र नसावे.
हि स्पर्धा दोन गटात होणार असून पहिला गट हा आठवी ते पदवी तर दुसरा गट खुला आहे. दोन्ही गटासाठी प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम क्रमांकाला रुपये ३१ हजार द्वितियला रुपये २१ हजार तर तृतीयला रुपये ११ हजार अशी आणि लेखन, दिगदर्शन, अभिनेता, अभिनेत्री, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत यासाठीहि रोख रकमेसह बक्षिसे देण्यात येणार आहेत काही कारणाने प्राथमिक फेरीसाठी पुरेशा प्रवेशिका उपलब्ध न झाल्यास हि फेरी झोनल विभागात होईल . अधिक माहितीसाठी संपर्क मराठी विज्ञान परिषद- वि ना पूरव मार्ग, सायन चुनाभट्टी पूर्व मुंबई ४०००२२, ई-मेल :- office@mavipamumbai.org, संपर्क क्रमांक : – ०२२-२४५४७२०/ २४०५७२६८
अनाथ मुलांची हृदयस्पर्शी कथा सांगणारा ‘कन्फ्युज’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित
अनाथ मुलांची हृदयस्पर्शी कथा सांगणारा ‘कन्फ्युज‘ हा मराठी चिञपट येत्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होत आहे. अभिजीत सोनावणे, पुण्यकर उपाध्याय आणि रक्षंदा थुल हे मुख्य भूमिकेत दिसतील.
चिञपटाची कथा पटकथा आणि दिग्दर्शन प्रशांत चंद्रकांत सुर्वे यांनी केले आहे. सर्वा प्राॅडक्शन या बॅनर अंतर्गत सचिन साळुंखे आणि प्रशांत सुर्वे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सिनेमॅटोग्राफी मयुरेश जोशी यांनी केली आहे. संगीत मोनू अर्जामेरी, राजू म्हासेकर, गुरू मेहेर यांचे असून दर्शन सारोलकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. सुरेखा खुडची, माधव अभ्यंकर, राहुल लोहगावकर, प्रसाद सुर्वे, राहुल बेलापुरकर, शर्वरी लोकरे, धनंजय निकम, आशुतोष वाडेकर आदी कलाकारांचा या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटाची गीते सचिन तळे यांनी लिहिली आहेत.
‘माझी माय मुंब्रादेवी’ रसिकांच्या भेटीला
महाराष्ट्राला संगीत आणि संगीतप्रेमींची फार मोठी परंपरा आहे. इथला रसिकराजा जितक्या आनंदाने सिने-नाटय गीतं डोक्यावर घेतो तितक्याच भक्तीभावाने देवी-देवतांच्या भजनातही रमतो. आता भक्तीरसाने भरलेलं ‘माझी माय मुंब्रादेवी‘ हे गीत रसिकांच्या भेटीला येत आहे. श्री चंद्रछाया प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘माझी माय मुंब्रादेवी‘ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची महती वर्णन करण्यात आली आहे. ‘या कोळीवाडयाची शान…‘ फेम संगीतकार-गायक प्रविण कुंवर यांनी या गाण्याला संगीत दिलं असून समीर चंद्रकांत देसाई यांनी गीत लेखन केलं आहे. वैशाली सामंत आणि प्रविण कुंवर यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे. राजेंद्र पवार आणि प्रवीणा समीर देसाई यांनी या गाण्याचे व्हिडीओ दिग्दर्शन केलं आहे.
‘माझी माय मुंब्रादेवी‘ या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची कथा आणि महती ऐकायला मिळणार आहे. वैशाली सामंतच्या सुमधूर आवाजात मुंब्रादेवीचं गीत ऐकताना भक्तांंचा आनंद द्विगुणीत होईल याबाबत शंका नाही.मुंब्रादेवी हे अनेक भक्तांचं श्रद्धास्थान आहे. या गाण्यामुळे मुंब्रादेवीची महती सर्वदूर पोहोचण्यास मदत होईल अशी भावना दिग्दर्शकांनी व्यक्त केली.
‘रुस्तम’च्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये
बॉलिवुडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या आगामी ‘रूस्तम‘ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमात सहभागी होणार आहे . आज दि. ८ आणि उद्या ९ ऑगस्टला रात्री ९.३० वा. हे दोन्ही भाग प्रसारित होणार आहेत..
अक्षयच्या उपस्थितीतही ‘चला हवा येऊ द्या‘ मधील कलाकारांनी अक्षय कुमारच्या सुप्रसिद्ध ‘हेरा फेरी‘ चित्रपटाची आपली वेगळी आवृत्ती सादर केली ज्याला अक्षयनेही भरभरून दाद दिली. याचसोबत अक्षयच्या गाजलेल्या गाण्यांवर ‘चला हवा येऊ द्या‘ च्या कलाकारांनी ठेका धरला. या सर्व कलाकारंचे हे धम्माल परफॉर्मन्स बघून मग अक्षयनेही त्यांना साथ देत ‘झिंगाट‘ च्या ठेक्यावर डान्स करत एकच धम्माल उडवून दिल्याची आपल्याला पाहायला मिळणार आहे .
‘चौर्य’ चित्रपट ५ ऑगस्ट ऐवजी १९ ऑगस्टला होणार प्रदर्शित
गेल्या अनके दिवसांपासून चर्चेत असलेला ‘चौर्य‘ हा मराठी चित्रपट येत्या ५ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता. परंतु, अवघ्या महाराष्टात सुरु असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशावेळी चित्रपट प्रदर्शित करणे असंवेदनशील असल्यामुळे ‘चौर्य‘ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असून आता हा चित्रपट येत्या १९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
‘चौर्य‘ चित्रपटात अभिनेते किशोर कदम, मिलिंद शिंदे, गणेश यादव, प्रदीप वेलणकर, दिग्विजय रोहिदास, दिनेश लता शेट्टी, जयेश संघवी, तीर्था मुरबाडकर आणि आरजे श्रुती आदीं कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘मौनांतर २०१६’ या मूकनाट्य स्पर्धेत ‘घनदाट’ प्रथम
‘मौनांतर २०१६‘ या मूकनाट्य स्पर्धेत ‘व्यक्ती पुणे‘ या संस्थेच्या ‘घनदाट‘ मूकनाट्याने प्रथम क्रमांक मिळविला . पीव्हीजी सीओईटी, पुणेच्या ‘खिचीक्’ला द्वीतीय क्रमांक तर ‘संवर्धन संस्थे‘च्या ‘संगत‘ने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल , १८ जुलै रोजी सायंकाळी भरत नाट्य मंदिर येथे क्षितीज पटवर्धन, समीर विद्वांस, अनीश जोग यांच्या हस्ते झाला. कुशल खोत ,सुनील चांदोरकर ,प्रदीप वैद्य ,डॉ दीपक मांडे ,श्री भैरव ,तसेच ‘वाय झेड ‘ मराठी सिनेमाची टीम या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित होती
भरत नाट्य मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ड्रीम्स टू रिअॅलिटी‘ आणि ‘रंगीत तालिम‘, ‘ऐलान ‘ या पुण्यातील संस्थांच्या वतीने या मूकनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते . स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. अभिनेत्री देविका दफ्तरदार, अभिनेता गिरीश परदेशी हे या स्पर्धेचे परीक्षक होते . ढेपे वाडा , कैलास जीवन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली.
शहरी जीवनातील शौचालयाची समस्या, कुचंबणा ‘व्यक्ती पुणे‘ च्या या ‘घनदाट‘ मूकनाट्यात मांडलेली आहे. मिथुनचंद्र चौधरी लिखित या मूकनाट्याचे दिग्दर्शन सुयश झुंजूरके यांनी केले आहे. आदीत्य बिडकर, महेंद्र मारणे, साहिल जाधव, वैभव पांडव, तेजश्री शिलेदार, अथर्व कानगुडे यांच्यासह २० जणांचा समावेश ‘घनदाट‘ मूकनाट्यात आहे. घनदाटमध्ये प्रकाश योजना सुयश झुंजूरके यांची असून, किरण ढमाले आणि विराज देशपांडे यांनी संगीत दिले आहे.
यावेळी बोलताना परीक्षक गिरीश परदेशी म्हणाले , “मराठी साहित्य समृद्ध असून मूक नाटकातून कविता ,हायकू ,कथा असे मराठी साहित्य दिसण्याची गरज आहे . त्यासाठी नव्या पिढीने वाचनावर भर द्यावा ‘असे प्रतिपादन स्पर्धेचे परीक्षक गिरीश परदेशी यांनी केले . मूक नाट्य सादर करताना ‘शांतता ‘-सायलेन्स ‘ चा वापर अधिक व्हावा ‘. लाईट्स चे वैविध्य ,रंगांचे वैविध्य उपयोगात आणले जावे . संगीताचा प्रभावी वापर हेही मूक नाट्याचे बल स्थान ठरते “असा सल्लाही त्यांनी दिला.
शिवानी रांगोळे ‘&’ तिची ‘जरा हटके’ भूमिका
गेल्या वर्षाभरात मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवीन चेहरे पहायला मिळतायेत, इरॉस इंटरनॅशनल च्या क्रीशिका लुल्ला प्रस्तुत ‘& जरा हटके‘ या चित्रपटात अशीच एक नविन अवखळ आणि तितकीच चुलबुली अभिनेत्री शिवानी रांगोळे आपल्याला दिसणार आहे. शिवानीने ह्या आधी केलेल्या चित्रपटांपेक्षा आगामी ‘& जरा हटके‘ ह्या चित्रपटातील तिची भूमिका जरा वेगळी आणि मध्यवर्ती असून, ती आपल्या भूमिकेबद्धल खूप उत्सुक असल्याचे सांगते.
मुळात आंतरमहाविद्यालयीन नाट्य आणि एकांकिका स्पर्धेतून तिने अभिनयाचे धडे गिरवले आहेत. अनेक नाट्यस्पर्धेतून स्वतःला सिद्ध करणाऱ्या शिवानीने सर्वप्रथम ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी‘ या मालिकेतून छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती. शिवानी रांगोळे सोबत मृणाल कुलकर्णी, बंगाली अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता, सिद्धार्थ मेनन हे कलाकारही आपल्याला या सिनेमात पाहता येणार आहेत. नात्यांमधले बदलते स्वरूप दाखवणारा हा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘चौक द रियालिटी’ या सिनेमाचा मुहूर्त संपन्न
गाव असो कि शहर कित्येक उलढालीचा जणू माहेर. मात्र काही ठिकाणी हाच चौक गुन्हेगार बनविण्याची आणि बनण्याची शाळा होऊन बसल्याच दिसत. अश्या संवेदनशील विषयावर भाष्य करणारा, चिंतामणी निर्मित ‘चौक द रियालिटी’ या नवीन मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात पार पडला.
आजच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाला संबोधित करण्यासाठी संदेश भोंडवे आणि नरेश भोंडवे यांनी चित्रपटाची निर्मिती करत आहेत . ‘चौक द रियालिटी’ चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद भरत महाडिक यांनी लिहिले असून दिग्दर्शनही भरत महाडिक हेच करणार आहेत. चित्रपटात नवोदित कलाकार राज शेटे, राजू उघडे, संतोष शिंदे, अमित देवकर हे मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या चित्रिकरणास लवकर सुरुवात करण्यात येणार आहे.
सुलतान झळकणार ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये
लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या‘ ची हवा आता केवळ मराठी मनोरंजनसृष्टीपुरती मर्यादित राहिली नाहीये. यात सहभागी झालेल्या कलाकारांची आणि त्यांच्या कलाकृतीची हमखास चर्चा होणार हे ठरलेलं आहे. या कार्यक्रमाची हीच लोकप्रियता बघून यात आता बॉलिवुडची मंडळीही हजेरी लावत आहेत. आजवर या कार्यक्रमात शाहरूख खान, रितेश देशमुख, सोनम कपूर सारख्या अनेक लोकप्रिय हिंदी स्टार्सने हजेरी लावत या कार्यक्रमाला चार चांद लावले आणि या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. बॉलीवुडचा सुपरस्टार सलमान खानही या कार्यक्रमात सहभागी झाला निमित्त होतं त्याच्या सुलतान या आगामी प्रदर्शित होणा-या चित्रपटाचं. येत्या सोमवारी आणि मंगळवारी म्हणजेच ४ आणि ५ जुलैला रात्री ९.३० वा. सलमान खान सोबत थुकरटवाडीतील मंडळींनी केलेली धम्माल बघायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते सलमानचं मराठमोळं रूप. या पूर्ण कार्यक्रमात सलमानने जास्तीत जास्त मराठीतच बोललाय. यावेळी कलाकारांच्या विनंतीवरून सलमानने झिंगाट आणि शांताबाई या गाण्यावर अगदी मराठमोळा ठेकाही धरला.