कलर्स मराठीवर ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेच्या विशेष भाग
गेलं वर्षभर अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ ह्या मालिकेने ५०० भागांचा यशस्वी टप्पा पार केलाय. या मालिकेला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संत देवतावतारी बाळूमामा या नावच एक वेगळंच वलय आहे. याच थोर संताची कथा कलर्स मराठी वाहिनीच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रासमोर मांडण्याचं शिवधनुष्य उचललं संतोष अयाचित यांनी. ५०० भागाचा उत्सवपर्वचा हाच आनंदमयी सोहळा येत्या रविवारी म्हणजेच १ मार्च रोजी संध्या ७ वा. पासून आपल्या कलर्स मराठीवर पाहायला मिळणार आहे
बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेच्या शीर्षक गीताने विशेष भागाची सुरुवात झाली आणि संपूर्ण वातावरण एकाएकी भक्तिमय झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांच्या लाडक्या तात्याच्या भूमिकेतील अक्षय टाक यांनी केले ज्याने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. हा उत्सव मोठ्या जल्लोषात आणि बाळूमामांच्या जयघोषात पार पडला यात शंका नाही. प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणारे बाळूमामा त्यांच्या लहानश्या भक्ताचा जीव कसा वाचवणार हे देखील बघायला मिळणार आहे.
‘जीव झाला येडापिसा': शिवादादा आणि सिद्धीमध्ये लवकरच फुलणार प्रेम!
कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय मालिकेमध्ये गौरवच्या परत येण्याने सिद्धी आणि शिवामध्ये दुरावा आला, भांडण झाली… दोघांमध्ये बरेच गैरसमज देखील झाले पण, प्रेमात खूप ताकद असते ते अगदी खरे आहे… याच प्रेमामुळे गौरवचं सत्य शिवासमोर आला आणि आता लवकरच शिवा गौरवचा खरा चेहरा सिध्दीसमोर आणणार आहे. शिवाला हे सत्य कसे कळाले ? तो सिध्दीसमोर ते कसे आणणार ? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.
शिवाने सिद्धीसमोर गौरवचे पितळ उघडे करताच आणि त्याचा अश्या वागण्यामागचा हेतु कळताच सिध्दीला राग अनावर झाला… आणि ती गौरवच्या सणसणीत कानाखाली मारते. सिद्धी गौरवला त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगते इतकेच नसून तुझ्यावर प्रेम केले याची मला लाज वाटते, माझ्या मनामध्ये फक्त शिवा आहे आणि शेवटपर्यंत तोच राहील असे देखील त्याला बाजावून सांगते… सिद्धीचे मन शिवाने कधीच जिंकले आहे, आणि तिचे त्याच्यावर प्रेमदेखील आहे याची कबुली तिने दिली आहे…
येत्या आठवड्यामध्ये ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत शिवादादा आणि सिद्धीमध्ये प्रेम फुलताना पहायला मिळणार आहे
अतुल गोगावले दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
आपल्या संगीतातून संपूर्ण संगीतप्रेमींना वेड लावणाऱ्या ‘अजय-अतुल’ या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत.अतुल आता छोट्या पडद्यावर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील भारतरत्नांची यशोगाथा उलगडणार आहेत. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनी वर प्रजासत्ताक दिनापासून ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर घेऊन येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जेआरडी टाटा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख, पांडुरंग काणे या सर्वांची नावं माहित असली तरी त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती अनेकांना नाही, ती देण्याचा प्रयत्न ‘आपले भारतरत्न’ या मालिकेतून करण्यात आला आहे. “भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत झालेल्या अभिवंदनीय व्यक्तीमत्त्वात महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे, त्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देणाऱ्या कार्यक्रमाचा भाग मला होता आले याचा खूप आनंद वाटतो” असे अतुल गोगावले यांनी सांगितले.
‘Jai Malhar’ fame Devdatta Nage turns ‘Doctor Don’
Devdatta Nage who played an important character of Khanderaya in popular mythological TV serial (Jai Malhar) will now be playing a contrasting title character of ‘Doctor Don’ in forthcoming Marathi serial on Zee Yuva. This serial is all set to be telecast soon. Though the title of this serial sounds strong, it will be a comedy subject according to the makers. With this serial Devdatta Nage will be making his comeback on television after two years.
It may be recalled that Zee Yuva channel has been presenting variety of subjects through various serial to entertain the home viewers. Some of the popular serials have been ‘Freshers’, ‘Bunmaska’, ‘Love Lagna Locha’, ‘Girls Hostel’ , ‘Ek Ghar Mantarlela’ besides offering reality shows like ‘Yuva Singer Ek Number’ , ‘Sangeet Samraat’ and ‘Yuva Dancing Queen’. So, it will be interesting to see what Devdatt Nage will offer through Dr. Don’?
‘युवा डान्सिंग क्वीन’मधील ‘गंगा’चा हटके स्वैग
‘झी युवा’ वाहिनीवर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता रंगणारी ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही स्पर्धा आता मात्र एका वेगळ्याच उंचीला पोहोचली आहे . १४ क्वीन्सच्या जोरदार परफॉर्मन्स ने सुरू झालेलया या स्पर्धेत आता एलिमिनेशन सुरु झालीयं. या सगळ्याच स्पर्धक आपला अत्यंत बेस्ट परफॉर्मन्स देताना आपल्याला दिसतायेत, मात्र या सर्वांबरोबर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे या सर्व मुलींना या व्यासपीठावर घेऊन आलेली गंगा.
‘युवा डान्सिंग क्वीन’मधील स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांना करून देणाऱ्या गंगाचा एक वेगळाच स्वैग आहे . तिचे स्टाईल स्टेटमेंट असो किंवा ती मुलींना ज्या प्रमाणे प्रत्येक वेळी डिफेन्ड करत असो, ती प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं योग्य मनोरंजन होईल हे पाहत असते . गंगा या व्यक्तीबद्दल आता सर्वांच्याच मनात असलेली उत्सुकता अधिक वाढलेली आहे. गंगाचा ‘युवा डान्सिंग क्वीन’मध्ये असलेला रोल अजूनही नेमका कळलेला नाही. मात्र तीच्या म्हणण्याप्रमाणे अद्वैतपेक्षा ती जास्त चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं होस्टिंग करू शकते. कारण तिनेच या कार्यक्रमावर सगळ्या मुलींना आणलं आहे त्यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे मुलींची माहिती देऊ शकते त्याचप्रमाणे परीक्षक सुद्धा तिच्यावर खूप खुश आहेत कारण ती उत्तम नर्तिका सुद्धा आहे . तिच्या ठसकेबाज लावणीची परीक्षकांनी सुद्धा भरपूर तारीफ केली होती . या धमाकेदार लावणीचा तिचा विडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर वायरल झालेला आहे. त्यामुळे तिने अद्वैत दादरकरसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे . उत्तम होस्ट कोण या प्रश्नावर सर्व मुलींनी गंगालाच पसंती दिली आहे . त्यामुळे आता युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत राहतो की परीक्षक गंगा ला होस्ट बनवतात हे पाहणे मजेशीर ठरेल मंचावर अवतरलेली गंगा आता नक्की कुठल्या भूमिकेत पाहायला मिळणार.
‘युवा डान्सिंग क्वीन’ हा कार्यक्रम बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, ‘झी युवा’ वाहिनीवर पहायला मिळेल.
Shweta Shinde to return to small screen with Zee Yuva’s new serial
Having made her presence felt through her performances in past serials like ‘Avantika’, ‘Avaghachi Sansaar’, & ‘Vadalvaat’, popular actress Shweta Shinde had switched over to produce successful serials like ‘Lagira Jhala Ji’ and ongoing ‘Mrs. Mukhyamantri’. But now, she has decided to return to acting field once again on small screen with Zee Yuva’s forthcoming Marathi serial. This will certainly make happy her admirers.
Shweta who is originally from Satara came to Mumbai for her college education and because of her beautiful looks , soon received modelling offers. In spite of opposition from home, she accepted these offers to earn name and fame . Thereafter never looked back as she received offers from serials and films. Now, after experiencing the role of a producer, she wants to make a comeback in acting through this new forthcoming serial on Zee Yuva, which stars ‘Jai Malhar’ fame Devdutt Nage in the lead opposite her.
Their photo together has already become viral on social media. From the poster it clearly indicates that Devdatt is in a different get up with Police trying to catch him, while Shweta on the other side is pulling the muffler tied around his neck.
‘Tujhyat Jeev Rangala’ fame Raj Hanchanale ties his knot with Molly
Raj Hanchanale who plays the character of Sunny Da in popular TV serial ‘Tujhyt Jeev Rangala’ is no more a bachelor. He has tied his wedding knot with his girl friend Molly Deswal recently. While Raj is originally from Kolhapur and Molly belongs to Haryana . Raj met Molly six year ago in Mumbai as she too belongs to film industry and was into modelling . They friendship grew to result into marriage.
Raj Hanchanale first met Molly in 2013 during a play ‘Dushyant Priya’. At present Molly works for a production house. They had already decided to have a destination wedding and therefore selected the picturesque place Ratnagiri which also has a beautiful beach spread across the greenery and mountains. Both were so much engrossed into preparation for their marriage for the past 3 to 4 months and found two days for their destination wedding. Both have postponed their honeymoon till March 2010, as Raj has committed his dates till that time. They even could not invite their colleagues for this event.
‘शिकारी’ नंतर नेहा खान आता ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर
बॉलिवूड चे बोल्डनेस आणि हॉटनेस मराठी चित्रपटसृष्टीला दाखवणारी ‘शिकारी’ फेम अभिनेत्री नेहा खान ही तिच्या चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली . प्रेक्षक बॉलिवूड मध्ये दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे पाहू शकतात तर आपल्या भाषेतील सुद्धा पाहू शकतील आणि असा सिनेमा भरपूर प्रेक्षक ही जमवू शकेल असा विचारही आधी कोणी केला नव्हता . मात्र नेहा खान नावाचं एक झंझावाती सौंदर्याने आणि अभिनयाने भरलेलं वादळ ‘शिकारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला दिलं आणि मराठी तरुण प्रेक्षकांनी ते अंगवळणी ही करून घेतलं.
झी युवावर वरील ‘युवा डान्सिंग क्वीन‘ या सेलेब्रिटी डान्सिंग रिऍलिटी कार्यक्रमाद्वारे नेहा खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी ती शिकार करणार आहे तिच्या नृत्यातील अदांनी. तिच्या सौंदर्याचा महाराष्टात भरपूर फॅन फॉलोवर आहे . आता ती डान्स या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना ती किती टॅलेंटेड आहे ह्याचं ही दर्शन देणार आहे .
झी युवा वाहिनीवर, बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होतो.
Mohiniraj Gatne finds another challenging role in new TV serial
Having played the role of Isha’s father convincingly in the popular TV serial ‘Tula Pahate Re’ and also the role of a Sarpanch in award winning Marathi film ‘Koti’ Mohiniraj Gatne has suddenly come into limelight. Today home viewers are talking about his natural way of acting. Every actor wishes that he finds variety of roles and Mohiniraj popularly known as Raj is no exception. And his wish has been fulfilled by Kothare Vision through their new serial ‘Prem Poison Panga’.
In this serial he is playing a responsible father of two children, who as a family head always feels that his family lives a happy life and therefore tries to be adjustive with every member of the family. Speaking about this serial, Mohiniraj says, “The subject of this film is different and it is being presented by a reputed banner . I liked the subject and therefore immediately agreed to play this role, when it was offered to me. Luckily for me, this serial is receiving good response from the home viewers.”
This serial is being telecast from Monday to Friday between 8.30 to 9 pm.
सोनी मराठीवर अनुभवा जिजा-शहाजीच्या लग्नाचा शाही थाट
हिंदवी स्वराज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनचा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र त्यांना घडवणाऱ्या माऊलीचा इतिहास तितकासा परिचयाचा नाही . अवघ्या ८ व्या वर्षी न्यायाच्या बाजूने उभी राहणारी जिजा लहानपणापासूनच कर्तबगार होती. शिवबांवर झालेल्या स्वराज्याच्या संस्कारांचा पाया जिजाच्या बालपणीच घातला गेला होता. स्वराज्याच्या मोहिमेचा मानबिंदू ठरला तो जिजा शहाजी यांचा विवाह सोहळा. जाधव आणि भोसले या राजघराण्यांमध्ये झालेली सोयरीक ही इतिहासातली खूप मोठी राजकीय घडामोड होती असे म्हणायला हरकत नाही. १५०० सालचा तो काळ त्याकाळची अनिश्चित अशी परस्थिती आणि त्यात पार पडलेला एक ऐतिहासिक आणि अजरामर सोहळा. सनई -चौघंड्यांचे सूर, केळीचे खांब आणि झेंडूच्या फुलांनी नटलेला दिव्य मंडप, शाही पक्वांन्नांनी सजलेलं ताट, दागिने, रोषणाई, सजावट, उंची वस्त्र असा शाही थाट होता जिजा-शहाजीच्या लग्नाचा.
या शाही सोहळ्याचं पान इतिहासात आपण वाचलं ही असेल पण सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘स्वराज्य जननी जिजामाता’ या मालिकेच्यानिमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे.
‘स्वराज्य जननी जिजामाता’ हा कार्यक्रम पाहताना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा विवाह तर संपन्न होईल पण ही सप्दपदी ऐतिहासिक का ठरावी. तुमचं उत्तर मालिकेच्या शीर्षकातच आहे. महाराष्ट्राच्या सर्वश्रेष्ठ माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिजामाता यांचा हा विवाह सोहळा आहे. या विवाह सोहळ्यानंतरच महाराष्ट्राच्या त्या वैभवशालीन इतिहासाला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. त्यामुळे हा विवाहसोहळा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्वाचा मानबिंदू ठरतो. तसेच ज्या आईने महाराष्ट्राच्या शौर्यवान मराठ्याला जन्म दिला. जिच्या संस्कारांचे गोडवे आजही पोवाड्यांतून गायले जातात त्या जिजामातेची मनस्थिती अवघ्या आठव्या वर्षी कशी बरं असेल हे पाहणे फारच रंजक आणि स्फूर्तीदायक ठरणार आहे.
अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्य जननी जिजामताा’ विवाह सप्ताह ४ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता पहा सोनी मराठीवर.