बालगंधर्वचा वर्धापन दिन ठरला अविस्मरणीय
बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. वर्धापन दिनाचे अवचित्य साधून विविध कला क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. तसेच या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार श्री. राघवेंद्र (आण्णा) कडकोळ यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान करताना व्यासपिठावर माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेता सुशांत शेलार, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. चे अतुल शहा, सुरेश देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, उल्हासदादा पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार वितरण समारंभाच्या आधी नांदी व नाट्यसंगीत, तसेच तबला, पखवाज, सरोद यांची जुगलबंदी व बालगंधर्वांचे शिल्प साकारण्यात आले. त्यावेळी व्यासपिठावर महापौर प्रशांत जगताप व मेघराज राजेभोसले उपस्थित होते. पुरस्कार वितरण समारंभानंतर “रंग एकपात्रीचे” हा एकपात्री कलाकारांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यानंतर पुण्यातील कलाकारांनी कॉमेडी एक्सप्रेस पुणे फास्ट नावाचा कॉमेडी शो सादर केला. अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि राहुल रानडे यांच्या रंगलेल्या दिलखुलास गप्पांमध्ये सिने – नाटयसृष्टीच्या समस्या, आव्हाने यावर देखील चर्चा करण्यात आली. यावेळी मेधा मांजरेकर देखील आवर्जून उपस्थित होत्या. सायंकाळी प्रा. नितीन बालगुडे पाटील यांचे व्याख्यान झाले आणि रात्री संगीत रजनी (हिंदी गाण्यांचा) हा कार्यक्रम संपन्न झाला. महिलांसाठी लावणी शो, आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची प्रकट मुलाखत, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांच्याशी मुक्त संवाद, कॉमेडी एक्सप्रेस पुणे फास्ट आणि ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या दिलखुलास मुलाखतीने बालगंधर्व रंगमंदिराचा 49 वा वर्धापन अविस्मरणीय ठरला.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, मराठी कलाकारांनी केली तळजाई टेकडी हिरवी!
महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळावर तोडगा म्हणून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, पुण्यातील तळजाई टेकडी वर सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी एकत्र येऊन ‘वृक्षारोपण करून’ पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत केली आहे. पुण्यातील साहित्य, कला, खेळ आणि राजकारण इत्यादी क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आणि इतर सुज्ञ पुणेकरांनी देखील ह्या कार्यक्रमाला आवर्जून वर्णी लावली होती.
माननीय महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अलगुडे, स्थानिक नगरसेवक सुभाष जगताप, तसेच मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयवंत कुलकर्णी, ज्येष्ठ लेखक द. मा. मिरासदार आणि लेखक किरण यज्ञोपवीत, कवी-अभिनेता संदीप खरे, कवी वैभव जोशी शिवाय प्रवीण तरडे, विनोद खेडकर, सिद्धेश्वर झाडबुके, सुरेश विश्वकर्मा, शर्वरी जमेनिस, प्राजक्ता माळी, अश्विनी एकबोटे, देवेंद्र गायकवाड, रोहन मंकणी, शिवराज वाळवेकर, श्रीराम पेंडसे, आशितोष वाडेकर, चेतन चावडा हे कलाकार आणि संगीतकार विश्वजीत जोशी, दिग्दर्शक डॉ अंबरीश दरक, नितीन चव्हाण, अजय नाईक, बंटी-प्रशांत, रमेश परदेशी इत्यादी व्यक्तींनी वड, कडूनिंब, पिंपळ ह्यांसारखे मोठे वृक्ष लावून तळजाई टेकडी हिरवीगार केली आहे.
माननीय महापौर श्री प्रशांत जगताप आणि नगरसेवक श्री सुभाष जगताप ह्यांनी ह्या उपक्रमाचे खूप कौतुक केले आणि पुणे महानगर पालिका ह्या झाडांची निगराणी आणि जोपासना करेल हे आश्वासनही दिले आहे.
‘पिंडदान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!
मराठी चित्रपटात अलीकडे सातत्याने वेगवेगळे विषय नाविन्यपूर्ण मांडणीतून आपणास पाहायला मिळत आहेत , अशीच एक वेगळी कथा ‘पिंडदान‘ ह्या आगामी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या नावावरून चित्रपट गंभीर असल्यासारखे वाटते पण ह्या चित्रपटात एक सुंदर प्रेमकथा आहे जी पिंडदानाच्या निमित्ताने उलगडत जाते. ह्या चित्रपटात सध्याचा आघाडीचा लाडका अभिनेता ‘सिद्धार्थ चांदेकर’ मुख्य भूनिकेत असून त्याच्या बरोबर ‘मानवा नाईक’ हि अभिनेत्री दिसणार आहे. या दोघांची जोडी प्रथमच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
फॅशन इंडस्ट्रीतील अनेक वर्षांच्या अनुभवानंतर प्रशांत पाटील पिंडदानाच्या माध्यमातून आपल्या दिग्दर्शकीय कारकीर्दीचा प्रारंभ करत आहे. चित्रपटातली गीते वैभव जोशी आणि मंदार चोळकर ह्यांनी लिहिली असून सागर धोटे याने ती संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटाची कथा पटकथा संवाद हे अविनाश घोडके यांनी लिहिले आहेत. फॅशन फोटोग्राफीमध्ये विशेष ग्लॅमर आणि प्रसिद्ध असलेला बंटी देशपांडे याने चित्रपटाचे छायाचित्रीकरण केले आहे.
उदय पिक्चर्स निर्मित आणि सारथी एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेला ‘पिंडदान‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
प्रख्यात नाट्यकर्मी डॉ विजया मेहता ह्यांची एक आधुनिक कार्यशाळा
जेष्ठ नाट्यकर्मी डॉ. विजया मेहता, ‘मॅजीक मोमेंटस – सर्च बाय अ परफॉर्मर अॅन एनकाऊन्टर वुईथ डॉ विजया मेहता‘ या नावाच्या पाच दिवसांच्या आधुनिक कार्यशाळेचे आयोजन करत असून त्याद्वारे त्या करियरच्या मध्यावर असलेले अभिनेते, दिग्दर्शक यांना विशेष प्रशिक्षण देणार असून रंगभूमीच्या निरीक्षकांसाठी एक अंतर्ज्ञान अनुभूती देणार आहेत.
ह्या कार्यशाळेमध्ये डॉ. विजया मेहता या आजच्या रंगभूमी कलाकारांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्या धारणा आणि दृष्टीकोन यांच्याबद्दल बोलणार आहेत. प्रत्येक सत्रामध्ये पंचवीस अभिनेते आणि पाच दिग्दर्शक तसेच कला जगतातील विविध क्षेत्रात निरीक्षक म्हणून काम करणाऱ्या वैविध्यपूर्ण अशा व्यक्तीमत्वांच्या सानिध्यात संवाद साधला जाणार आहे. त्याचबरोबर प्रश्न आणि उत्तरांचे एक सत्र असणार आहेत.
पुढील महिन्यात २ ते ६ मे २०१६ दरम्यान ही कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित केली जाणार आहे.
‘पसंत आहे मुलगी’ मालिकेतून रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस
लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात पण खाली त्या गाठी जुळवण्यासाठी अनेकजण आधार घेतात ते जन्मपत्रिकेचा आणि पंचागांचा. मुला मुलीच्या राशींपासून ते त्यांच्या कुंडलीत असणा-या ग्रहांची आणि गुणांची तपासणी करूनच लग्नाची ही बोलणी पुढे सरकते. परंतु ज्यांचं लग्न होणार आहे त्या दोघांची मने जुळलेली असतील तर मग पत्रिका जुळण्याची गरज खरंच उरते का ? पत्रिकेतील ग्रह एखाद्याच्या नात्याचं भविष्य ठरवू शकतात का ? या प्रश्नांवरच आधारित एक नवी मालिका ‘पसंत आहे मुलगी ’ झी मराठी ह्या वाहिनीवर २५ जानेवारीपासून दाखल झाली असून सोमवार ते शनिवार रात्री ८.०० वा. ही प्रसारित होणार आहे.
‘पसंत आहे मुलगी ’ या मालिकेतून उर्मी आणि वासूच्या भूमिकेतून रेशम प्रशांत आणि अभिषेक देशमुख ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. याशिवाय मालिकेत डॉ. गिरीश ओक, मेघना वैद्य, पद्मनाभ बिंड, केतकी सराफ, नम्रता कदम यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. नितीन वैद्य आणि निनाद वैद्य यांच्या दशमी क्रिएशन्सची निर्मिती, समीर विद्वांस यांची संकल्पना असलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन राजू सावंत यांनी केलं आहे.
स्टाईलिश ‘गुरु’ २२ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस
मराठी सिनेमासृष्टीत दर वर्षी नवीन नवीन विषयांवर आणि वेग वेगळे प्रयोग होताना आपल्याला दिसतायेत. त्यातील अनेक सिनेमांना प्रेक्षेकांची चांगली पसंती मिळतीये. शिवाय मराठी तिकीट बारीवर सुपरहिट सिनेमांची सख्या सुद्धा वाढतीये.
दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे यांसारखे रोमँटिक सिनेमे देणारे संजय जाधव ह्या वर्षाची सुरवात आपल्या ‘गुरु‘ ह्या सिनेमाने करत आहेत. अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा अॅक्शन, रोमँटिक, ड्रामा असणार आहे . नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. इरॉस इंटरनॅशनल, बॅगपायपर सोडा आणि ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हन यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे. दुनियादारी नंतर, डबल सीट, दगडी चाळ अश्या सिनेमांतून , प्रेक्षेकांमध्ये स्टाईल आयकॉन म्हणून विषेश प्रसिद्ध असलेला अंकुश चौधरीची गुरूच्या ट्रेलरमधून आपली वेगळी ‘स्टाईल’ असल्याचे दिसून येते आहे.
अगदी साउथ तडका अॅक्शन सिक्वेन्स आपल्याला ह्यात दिसतो. अंकुश सोबतचा उर्मिला कानेटकर हीचा मँगोडॉली लूक ही आपल्याला यातून पाहायला मिळतो आहे. येत्या २२ जानेवारीला गुरु हा सिनेमा महाराष्ट्रासह सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. एंटरटेनमेंटचं कमप्लीट पॅकेज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करून, सर्वाधिक कमाई करत लोकप्रिय होईल अशी आशा करूया .
अभिनय कट्ट्याच्या किरण नाकतीचे सिने-दिग्दर्शनात पदार्पण
जवळपास पाच वर्षांपूर्वी एक चळवळ म्हणून सुरु केलेल्या ‘अभिनय कट्टा’ या कलेच्या बिजांकूराचा आज वटवृक्ष झाला आहे तो फक्त मायेनं अन आस्थेनं सिंचन करत राहिलेल्या कट्ट्याच्या सुत्राधारांमुळे म्हणजेच किरण नाकती यांच्यामुळे.
येथे दर रविवार न चुकता कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ नि रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कलाविष्काराची मेजवानी सादर होते . ज्यात ठाणेकरांसमवेत संपूर्ण महाराष्ट्रातील रसिका रविवारची एक सुखद संध्याकाळ अनुभवतात.
अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या आणि ओम श्री संकल्प फिल्म प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘सिंड्रेला’ या आगामी सिनेमात जास्तीत जास्त कलाकार हे अभिनय कट्ट्याचे आहेत. यावेळी कट्ट्याचे हे विद्यार्थी फक्त पडद्यावरील कलाकार म्हणूनच नव्हे तर पडद्यामागेही यशस्वी भूमिका सांभाळताना दिसतील.
जवळपास पाच वर्षांपूर्वी एक चळवळ म्हणून सुरु केलेल्या ‘अभिनय कट्टा’ या कलेच्या बिजांकूराचा आज वटवृक्ष झाला आहे तो फक्त मायेनं अन आस्थेनं सिंचन करत राहिलेल्या कट्ट्याच्या सुत्राधारांमुळे म्हणजेच किरण नाकती यांच्यामुळे.
येथे दर रविवार न चुकता कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ नि रसिक प्रेक्षकांसाठी उत्तमोत्तम कलाविष्काराची मेजवानी सादर होते . ज्यात ठाणेकरांसमवेत संपूर्ण महाराष्ट्रातील रसिका रविवारची एक सुखद संध्याकाळ अनुभवतात.
अभिनय कट्टा व कृपासिंधु पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या आणि ओम श्री संकल्प फिल्म प्रॉडक्शन्सची प्रस्तुती असलेल्या ‘सिंड्रेला’ या आगामी सिनेमात जास्तीत जास्त कलाकार हे अभिनय कट्ट्याचे आहेत. यावेळी कट्ट्याचे हे विद्यार्थी फक्त पडद्यावरील कलाकार म्हणूनच नव्हे तर पडद्यामागेही यशस्वी भूमिका सांभाळताना दिसतील.
“सिंड्रेला” या वैशिष्ठ्यपूर्ण सिनेमाचे शिल्पकार हे किरण नाकती आहेत. सदर सिनेमाची कथा आदित्य हळबे व किरण नाकती यांनी लिहिली असून पटकथा, संवाद व दिग्दर्शक या तिन्ही बाजूही त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळल्या आहेत.
“सिंड्रेला” या सिनेमाच्या नावातच या सिनेमाचे वेगळेपण दडलेले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे.
सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून आशिष म्हात्रे यांनी उत्कृष्टरित्या या सिनेमाचे संकलन केले आहे. येत्या ४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
“सिंड्रेला” या वैशिष्ठ्यपूर्ण सिनेमाचे शिल्पकार हे किरण नाकती आहेत. सदर सिनेमाची कथा आदित्य हळबे व किरण नाकती यांनी लिहिली असून पटकथा, संवाद व दिग्दर्शक या तिन्ही बाजूही त्यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सांभाळल्या आहेत.
“सिंड्रेला” या सिनेमाच्या नावातच या सिनेमाचे वेगळेपण दडलेले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे.
सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सुप्रसिद्ध कॅमेरामन राजा फडतरे यांच्या नजरेतून या सिनेमाचे चित्रीकरण करण्यात आले असून आशिष म्हात्रे यांनी उत्कृष्टरित्या या सिनेमाचे संकलन केले आहे. येत्या ४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
कलर्स मराठीवर ‘गणपती बाप्पा मोरया’ प्रेक्षकांच्या भेटीला
लहानापासून मोठ्यांपर्यंत, अगदी सगळ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पांची गाथा पौराणिक मालिकेच्या रूपाने सादर होत असून, या मालिकेचा शुभारंभ उद्यापासून (२४ नोव्हेंबर) होत आहे .‘जय मल्हार’ च्या यशा नंतर महेश कोठारे ह्यांच्या, कोठारे विजन द्वारा निर्मित ‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ‘कलर्स मराठी‘ ह्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका पार्वती – गणेश या मातापुत्राच्या ममतेच्या अलौकिक नात्याचे विविध पदरही उलगडणार आहे. या मालिकेत बाप्पांच्या प्रचलित आणि सर्वश्रुत असलेल्या गोष्टींसोबत काही अपरिचित कथाही बघायला मिळतील. या मंगलमय गणेशकथांसह शिवपार्वती आणि इतर देवदेवतांचे दिव्य दर्शन, तसेच डोळे दिपवून टाकणारे शिवालय, नयनरम्य नंदनवन ही पावित्र्याची प्रतीके सर्व महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करतील. असा विश्वास या मालिकेचा निर्माता आणि क्रिएटिव दिग्दर्शक आदिनाथ कोठारे ह्याने दर्शिवला.
एकंदरीतच उत्तम अभिनय, अभ्यासपूर्ण कथा आणि उच्च तंत्राद्यानाच्या सहाय्याने मांडलेल्या अश्या पौराणिक कथा नक्कीच प्रेक्षेकांमध्ये लोकप्रिय होतात. गणपती बाप्पांची हि नव्या स्वरूपातील तेजोमय गाथा, इतर पौराणिक मालीकेंच्या तुलनेत हि नवी मालिका प्रेक्षेकांना किती पसंतीची पडते ते लवकरच कळेल.
एका ‘डोमा’च्या आयुष्याचा संघर्षपूर्ण धगधगता जीवनप्रवास
अनेकदा समाज व्यवस्थेकडून दुर्लक्षित केला जाणारा, माणसाच्या अंतिम क्षणांना मोक्ष देणारे काम करणारा महत्वाचा घटक म्हणजे ‘डोम’ समाज.एका डोमाच्या आयुष्याचा विस्मयकारक – संघर्षपूर्ण धगधगता जीवनप्रवास ‘डोम’ या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्री .आर. एल. तांबे ह्यांनी ‘सह्याद्री पिक्चर्स’ द्वारे ह्या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रदीप दळवी ह्यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
डोमाच्या संघर्षपूर्ण आयुष्यावर प्रकाश टाकणाऱ्या ह्या समाज प्रधान चित्रपटात वेगळी प्रेमकथा बरोबरच सहस्यमय पटकथासुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. चित्रपटात डॉ . विलास उजवणे, अंजली उजवणे व मोहन जोशी ह्यांच्या मुख्य भूमिका असून सोबत अनिता नाईक, प्रदीप दळवी, प्री .आर. एल. तांबे, दीपज्योती नाईक, गीतांजली कुलकर्णी,प्रदीप पटवर्धन हि कलाकार आहेत .
छायांकन राजू कडूर, संकलन सचिन नाटेकर ह्यांनी केले आहे. प्री .आर. एल. तांबे ह्यांनी लिहिलेल्या गीतांना स्वप्नील बांदोडकर, साधना सरगम, शकुंतला जाधव, वैशाली सामंत ह्यांच्या आवाजतील गाणी संदीप डांगे ह्यांनी संगीतबद्ध केले आहेत.ऑक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षेकांच्या भेटीस आहे.
जगण्याची नवी उर्मी देणारा ‘उंच माझा झोका’ पुरस्कार
विविध क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्याही पेक्षा एक पाऊल पुढे जात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणा-या आणि प्रसिद्धीचा सोस न बाळगता अव्याहतपणे आपले कार्य करणा-या कितीतरी महिला आपल्या आजुबाजूला आहेत. अशा कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची नुसती दखल न घेता त्यांच्या कार्याचा य़थोचित सन्मान ‘उंच माझा झोका पुरस्कार’ द्वारे करण्यात येतो. यंदाच्या वर्षी देशात आणि जगात आपल्या कार्याचा ठसा उमटवणा-या दहा कर्तृत्वशालिनींचा गौरव नुकताच ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर सभागृहात बुधवारी एका शानदार सोहळा करण्यात आला.
ह्या वर्षी ज्येष्ठ समाजसेवी मीराताई लाड ह्यांचा ‘उंच माझा झोका जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बरोबर रझिया सुलताना यांना सामाजिक कार्यासाठी, डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांना पर्यावरण जागृतीसाठी, आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणा-या धावपटू कविता राऊत, ज्येष्ठ लेखिका कविता महाजन यांना साहित्य विभागासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. सीमाताई साखरे, स्वीटी पाटेला, वैशाली बारये, वैशाली मोरे, पूजा घनसरवाड ह्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास ज्येष्ठ रंगकर्मी अरूण काकडे, धनराज पिल्ले व अनेक कलाकार मान्यवरांची उपस्थिती होती. अभिनेते अतुल कुलकर्णी आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी पुरस्कारांचे निवेदन केले.
येत्या १३ सप्टेंबरला सायंकाळी ७.०० वा. झी मराठीवर हा पुरस्कार सोहळा प्रसारित होईल.